Ahirani boli kavita

Ahirani boli kavita

उठाना टाईम त्याना,
पाहेटणा साडेतीन,
आंग तोंड धोईसन,
देव पूजा करीसन,
दिस उजाडाना पहिले,
वावरमा फिरीसन,
बांदे बांद जाई उना,
असा व्हता,आज्जा मना,
असा व्हता,आज्जा मना.

एक रेडिओ घरमा,
त्याना आवाज जोरमा,
बातम्या त्यानावर येयेत,
त्याच टाईमले कॉफी लेयेत,
मंग वाजेत मराठी गाना,
असा व्हता,आज्जा मना,
असा व्हता,आज्जा मना.

त्याना नंतर चक्कर,
गाव चावडीवर जरा,
गच्ची कयात रोजना,
न्याय निवाडा त्या बारा,
शब्द वलांडा नयी कुणी,
माणूस राव्हो नवाजुना,
असा व्हता,आज्जा मना,
असा व्हता,आज्जा मना.

संस्कृत वाचीसन करे,
अहिराणीमा तो फोड,
सारा गावमा त्याले,
नव्हता कोणी जोड,
पोथी पुराण मझार,
त्याले माहीत साऱ्या खुणा,
असा व्हता,आज्जा मना,
असा व्हता,आज्जा मना.

गोष्ट सांगाले बसाडे,
सगळा नातूसले हसाडे,
परी,राजा,राक्षस,
डोयासमोर दिसाडे,
तो जाताच घर-वाडा,
व्हयना भलताच सुना,
असा व्हता,आज्जा मना,
असा व्हता,आज्जा मना.

कवी कैलास,नामपूर.