Ahirani Article Poem टोचे सवसारनां काटा

Ahirani Article Poem टोचे सवसारनां काटा

“काटा येची टुची

नाकं मोडत ऱ्हावो

सवारी सुवारी रस्ते

हयाती निंघी जावो…!

काटाया सवासारनां

कोनी लागना रें नांदे

काटायें राजमहाले

भोयी सीतामाय नांदे..!

सवसार से काटा

आंग डोयावरी धोये

आंसू रंगतनीं मया

भरे काटासनी खोय..!

रोज चाली काटावर

पाय बधीर तो व्हये

मन बेजार रें झायें

मासा आडकना गये..!”

काटाया झाडले न्यामीन वरदान

काटाया झाडले न्यामीन वरदान भेटेल ऱ्हास!वरदान से का शाप से ते देव जाने!झाड कितीलं का झोपाये ऱ्हायें नां,त्यांना सभाव टोचानाचं ऱ्हासं!जलमनांसंगे सभाव आनी शरीर मव्हरे सरकत ऱ्हास!काटानां सभाव सापना मायेक ऱ्हास!सापनां सभाव डसानां ऱ्हास!चावानां ऱ्हास!काटा काटाया ऱ्हास!त्यांन्हा नांदे

लागू नई!हात-पाय रंगतेभोम करो नई!आपुन आक्सी म्हंनंत ऱ्हातस,.. ‘शिलगावनां त्यानं दर्शन!उज्जी टोचास तो!हेन्कयनां जात नां से रें तो!’ त्याले भ्यायीभुई शानलां-सुरता दूरदूर पयेत ऱ्हातस!सवसार काटाया ऱ्हास!काटा येचीटुची,काटा टायीटुयी सुखनां धागा इनत इनत मव्हरे सरकत ऱ्हास तो सवसार ऱ्हास!तो काठले लागी जास!तो पार पडी जास!आख्खी हयाती निंघी जास!

बाभुई,हेन्कय,हिव्वर,खैर या नावनां झाडे,आपला सभावगुन संगे जित्ता जगत ऱ्हातस!वाढत ऱ्हातस!दिखत ऱ्हातस!येयंवर त्यास्नी परचोदी येत ऱ्हास!काटायी फननीं फांटी आपले जबरी झोडत ऱ्हास!व्हडत ऱ्हास!ती सापनां फनथून बेक्कार ऱ्हास!उज्जी झामलायी सोडस!आंग तोंडं बठ्ठ रंगतेभोम व्हयी जास!आंगनीं आगीन व्हतं ऱ्हास!तरी भी सुटत नयी!काटाये झाडनां सभाव टोचत ऱ्हावानां ऱ्हास!त्यांनफाईन चांगली गोठनीं अपेक्षा कोनीं ठेवो बरं!.. एक म्हन से ना..’बीज बोया बबुल का आम कहा से आवे….’सवसारम्हा झामलायीस्नी हुभा ऱ्हायनां,तो नय्या पार करी तथांनं काटलें भिडी जास!काटा टोचात ऱ्हातंस!दुःख मोठं ऱ्हास!रडता येत नई!आंसू गायता येत नई!काटा मनन्हा मझार निस्ता चुबत ऱ्हास!टोचत ऱ्हास!सांगता येत नयी ना बोलता येत नयी!

“काटा काटालें टोचे

फांट्या भेटन्यात गये

रक्तेभोम सवसारनं

रोज उपटी धोनं धोये..!

काटा सवसारनीं धार

व्हाये डोयें पानी भार

मासा कोल्ली चिरीवर

उखली लयी जाये घार.!

चेंदेंलं चुंदेंलं काटाकुटा

हावू सवासार से हुभा

उख्खय मुस्सयंनां खेयमां

ठेचायी ऱ्हायना रें खुबा..!

हावू सवसार से धांड्या

टोचेल काटा लयी पये

.. डुरक्या मारतं रें जाये

पाय रंगतेभोम व्हाये…!”

बकऱ्या बाभूइन्या शेंगा,पाला खायीस्नी तटतुंब व्हयी जातीस!

दोन्ही कुखा तट व्हयी जातीस!शेंगा बकरीसले उज्जी सवाद देतीस!बगर बगर खात ऱ्हातीस!धव्याबरफ काटानीं आग्री टायीटुयी बाभुईनां पाला बकऱ्या खात ऱ्हातीस!बगर बगर खात ऱ्हातीस!धव्याबरफ काटानां नांदे लागेलं बकरीनं तोंडं सोलायी जात ऱ्हास!काटा त्यान्हा रंग रूप लिसनी जगत ऱ्हास!काटास्न्या फांट्या तोडीताडी,भर व्हडी व्हडी वडांग व्हयी जास!हावू काटास्ना गाडभरेलं ‘भर’ सवसार से!काटास्ना भरवर बठेल आपुन सवसार व्हडत ऱ्हातसं!काटा कव्हयं येय दखी जखमी करस!कव्हयं उठ-पडस!आखो व्हडा धरी,जखम पुसीपासी मव्हरे पयेत ऱ्हावो!सवसारनं गाल्ल हाकलतं,गाल्ल तंगाडतं,बैल बनी, शेपटी मोडी,झुंगीबन मव्हरे जात ऱ्हावो!जिंदगीनां यांय माव्यानां पहिले नेम्मन तठे पोहची जावो!

“सवसार काटायां रें !

काटांसंगे झटत ऱ्हातस

जखमा मझारन्या मोजी

संगेसंग खेटत ऱ्हातस

काटा काटाले टोची

आन्या मुडतं ऱ्हातीस

काटा टोचें रें फांटीलें

जखम नाता तोडी जातीस. 

बीन जिव्हायीनां खेय…

हानी पाडी झूलू ऱ्हातीस

बोलीबाली नाया पाडी

ठोकरा सवसारलें देतीस!”

हेन्कयनां काटा व्हवो का बाभुईनां

दुसरांले टोचासं तव्हयं त्यान्ह मोल ध्यानमां येत नई!सोतालें टोची दखो!परचोदी ली दखो!हेन्कयनां ताठा कायेजलें भिडी मानोस आल्लातं ऱ्हास!..बोरंनां काटा वाकडा तिकडा ऱ्हातस!बोरं मातारं चवलें गोडचीटिंग ऱ्हास!काटा मासानां गयनांमायेक वाकडा-तिकडा ऱ्हातंस!आकडांगत ऱ्हातंस!बोरंन्ह झाड झोपाये ऱ्हास!पांटा बकऱ्या खातीस!गोड चीटिंग बोरें कोनी भी खात ऱ्हास!बोरें तोडालें गये का हेंगडा-वाकडा काटा बोटे-आंगलें झूली रंगतेभोम करी टाकतंस!सवसार बोरेस्नागत चवलें आंबट गोड ऱ्हास!काटा नको वाटस!काटा कव्हयं काटावरी काटा काढी टाकस! तें उमजी येत नई!सवसार….हानी पाडी,रंजिस करी,वरखडा व्हडीस्नी ठायकाचं गुमसुम व्हयी चाली ऱ्हास!याले सवसार म्हंतंस!सवसारसंगे सुख-दुःखनां पंधा येरमांगे येर येत ऱ्हातस!चांगलं तें धरी काटाये सोडी मव्हरे जानं ऱ्हास!

सार काटाकुटा संगे

सवसार लागनां रें मांगे

दिन लागी ग्यातं रांगे

काठ यी लागा आंगे..!

बाभुई हेन्कयनां संगे

सवसार चाली ऱ्हायना नागे

जपेललें करी करी जागे

दिमुई यी ऱ्हायनी जोगे..!

काटा कुटाले टायी टायी

गव्हार करी ऱ्हायनु वायी

……काही दिननीं रें भुई

आखरी लयी चालनू मुई

Ahirani Article Poem
Ahirani Article Poem टोचे सवसारनां काटा

जिंदगीनी हालकी वडांग दखी कोणी भी पाय देत ऱ्हास!

हेन्कयनां काटानीं ऱ्हायनी तें पाय देणारा,पाठ दखाडी पयेत सुटतसं!आते पाय देणारास्नी गिनती कितली आनी कसी करो?जथा बन तथा त्याचं दिखी ऱ्हायंनातं!दिनेदिन वडांग चेपायी चुपायी हाडके मुडो तसा मुडी ऱ्हायन्यातं!पायमां घुसनारा हेन्कयलें भी गुदारा दि नई ऱ्हायनात!काटा घुशी घुशी पायलें भरपुटे यी जायेल सेतस!पन लत पडेल,भरपुटे व्हयेंल पायसले हेन्कय भी नरमी ऱ्हायना !काटा भ्यायी ऱ्हायना!वडांग तुटी ऱ्हायन्यात!वडांग उलगी ऱ्हायन्यात!

…. ‘उधी’ व्हयीस्नी हेन्कयलें बिलगेलं काही पडमथ्या काटानं नाकं पोच्चय करी ऱ्हायनात!गावे गावं लागेल हायी ‘उधी’ आते वडांगनीं मायेक मानोस्ना मेंदूलेंचं कोरी ऱ्हायनातं!समाजलें कोरी ऱ्हायनातं!

उधी लाकूड आनी जमीन पोखरी ऱ्हायनी!भरीम समाजले लाकूडनामयेक पोक्कय करी ऱ्हायनी!पोच्चय करी ऱ्हायनीं मानोसना मननां मझारथून कोरी कोरी नासाडी ऱ्हायनी!काटानं नायट आसंच ऱ्हास!भर सवसारम्हा कव्हयं मव्हयं हायी उधी उमयी भरीम सवसारले खायी टाकतीस!सवसार टांगनिले लागी जास!काटानां जिव्हायीथीन बेकार ऱ्हास!काटा टोचायी रंगत काढस!उधी पोखरी भुस्सा करी टाकस!असा काटावर सवसार टोची टाची मव्हरे सरकत ऱ्हास!

“सरी गयी रें आक्खी हयाती

दिमुईनां उरेल सुरेल दिन यां

…….काटानं भी नाकं तोडी

मव्हरे चाली ऱ्हायनात दिन यां

त्या परचोदीनां दिन गयात रें

बुडता यांयनां ऱ्हायेलं दिन यां

भरीम टायनीम्हा काटा चुबे

डोयाम्हा पानी भरानां दिन यां!”

नानाभाऊ माळी

(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे)

ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८

मो.नं-९९२३०७६५००

दिनांक-१५मार्च २०२३

खान्देशी अहिराणी कविता

Khandeshi Ahirani poem

thorn of tree
Ahirani Article Poem टोचे सवसारनां काटा

1 thought on “Ahirani Article Poem टोचे सवसारनां काटा”

Comments are closed.