नवरात्रीनी अंगाई अहिरानी

नवरात्रीनी अंगाई अहिरानी

नवरात्रीनी पहिली माळ
घर बलावा घटलक्ष्मी
शक्तीरुपनी आराधना
        जो बाळा जोरे जो—-
नवरात्रीनी दुसरी माळ
घर बलावा आदिलक्ष्मी
शील कर्तव्यनी आराधना
       जो बाळा जो रे जो—-
नवरात्रीनी तिसरी माळ
घर बलावा धनलक्ष्मी
सन्मार्गानी आराधना
      जो बाळा जो रे जो—-
नवरात्रीनी चवथी माळ
घर बलावा धान्यलक्ष्मी
धान रासीसनी आराधना
     जो बाळा जो रे जो—-
नवरात्रीनी पाचवी माळ
घर बलावा गजलक्ष्मी
पशुधननी आराधना
     जो बाळा जो रे जो—-
नवरात्रीनी सहावी माळ
घर बलावा संतानलक्ष्मी
सदविचारसनी आराधना
     जो बाळा जो रे जो—-
नवरात्रीनी सातवी माळ
घर बलावा वीरलक्ष्मी
धीर शौर्यानी आराधना
    जो बाळा जो रे जो—–
नवरात्रीनी आठवी माळ
घर बलावा जयलक्ष्मी
घवघवीत यशनी आराधना
    जो बाळा जोरे जो—–
नवरात्रीनी नववी माळ
घर बलावा विद्यालक्ष्मी
ज्ञान कलांसनी आराधना
    जो बाळा जो रे जो—-
दहावा दिननं सिम्मोलंघन
सत्यमेव् जयना विजय
सुखसमृद्धीनी विजयादशमी
     जो बाळा जो रे जो—–
    
प्रा.अशोक दगाजी शिंदे.
मु.पो.सामोडे ता.साक्री
जि.धुळे