खान्देश रतन दाजीसाहेब रोहिदास पाटील
” १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी हा निर्णय ज्यांच्या कारकिर्दीत झाला आणि आज केवळ महाराष्ट्राताच नव्हे तर देशात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा होतो या कार्याबद्दल ज्यांच्या पुढे नतमस्तक व्हावे असे नेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या हस्ते.माझा सत्कार होत आहे हे मी माझे भाग्य समजतो. “
– डॉ. आ. ह. साळुंखे ( जागतिक विचारवंत )
” महाराष्ट्रनं भल करानं काम दाजीस्नी कयं “
-कवी ना. धो. महानोर.
आसां सब्देजम्हा दाजीसाहेबना गौरव डॉ. साळुंखे आनि कवी ना. धो. महानोर यास्नी करेल से. त्यास्नी आपली राजकीय कारकीर्दम्हा आफाट काम करेल से ते तोटका सब्देजम्हा मांडता येवाव नही तरी त्यास्ना कामना आलेख आते आपुन दखुत. त्यास्नी वयख करी ल्हीऊत.
दाजीसाहेब यास्ना जनम १३ जून १९४० म्हा मोहाडीना शेतकरी कुटुंबम्हा झाया. त्यास्ना वडील स्वातंत्र्य सैनिक चुडामण आण्णा पाटील ह्या मिलमजुरेस्नी संघटनाना नेता व्हतात तसज काँग्रेस पक्सना कार्यकर्ता व्हतात. त्यास्नी देसनी स्वातंत्र्य चयवयम्हा सहभागी व्हवामुये इंग्रज राजवटम्हा जेलनी सिक्सा भोगेल व्हती. देस स्वतंत्र व्हवावर त्या खासदार बनी दिल्लीले गयात. तसज राजकारनम्हा खानदेसना भिष्म पितामह म्हनिसन वयखायेत.
दाजीसाहेब यास्न सुरुवातन सिक्सन धुयालेज झाय. त्या १९६७ म्हा इंदोरना श्री.गोविंदराव सक्सेरिया इन्स्टिट्यूट आँफ टेक्नॉलॉजी कालेजम्हाईन मेक्यानिकल इंजिनिअरिंगनी पदवी ल्ही धुयाले उनात. धुयाले येवावर यामा मोटार सायकलनी एजन्सी ल्हीधी. तव्हय मोठा नी धाकटा ह्या दोन्ही भाऊ सहेरना नी देसना बाहेर जायेल व्हतात. त्यामुये घर मायबाप बरोबर त्या यकटाज व्हतात. खेतीना माल बाजारम्हा इकानी तसज खेतीना दूसरा कामेस्नी जबाबदारी त्यास्नावरज व्हती. त्या वखतले मोहाडी गरमपंचायतनी निवडणूक लागनी. तठे आण्णास्नी कधीज लक्स घाल नव्हत. दाजीस्नी आण्णास्नी संमतीखाल पँनल उभं कय. ती निवडनूकम्हा त्यास्ना प्यानलना त्यास्नासमेत तिन आनि इरोधीस्ना सहा उमेदवार निवडी उनात. त्या निवड व्हवावर गावम्हा जायी इजयी उमेदवारेस्न सरपंचन अभिनंदन करी उनात. वडील धुये लोकसभाना खासदार आसामुये मतदार संघम्हाना लोके भेटाले,आडचनी सांगाले येयेत. तव्हय दाजीस्ले खूप काही सिकाले भेटनं. १९७२ म्हा त्या जिल्हा परिषद निवडनूकम्हा मुकटी गटम्हाईन निवडी उनात. त्यास्नी राजकारननी सुरुवात मव्हाडी ग्रामपंचायत पासीन झायी व्हती आते जि.प. सदस्यना नाताखाल जिल्हाना राजकारनम्हा त्यास्ना प्रवेस झाया. त्याच येयले धुये तालुका दुधसंघनी निवड व्हयनी नी त्या निवडी उनात.मव्हरे काँग्रेसन इभाजन झाये आनि त्यास्ले १९७८ नी इधानसभा निवडनूकम्हा कुसुंबा मतदार संघम्हाईन उमेदवारी मियनी. त्या तठे निवडी उनात आनि महाराष्ट्र इधानसभाम्हा प्रवेस झाया. तसज महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेसनना निवडनूकम्हा उत्तर महाराष्ट्र म्हाईन संचालक पदवर निवडी उनात. तव्हय त्यास्ना वडीलनी लोकसभानी तिसरी टर्म ( १९७२- ७७ ) पूरी व्हयनी व्हती. आण्णास्नी राजकारनम्हाईन निव्रुत्ती ल्हीधी नी त्या दाजीस्ना पाठमांघे भक्कम उभा राह्यनात.
दाजीसाहेब मव्हरे १९८० ,८५ , ९०, ९५, १९९९ आनि २००४ ह्या इधानसभान्या सहा निवडनूकीजम्हा काँग्रेसना उमेदवार म्हनिसन निवडी उनात. ह्याच कायम्हा १९८६ ते ८८ महसूल राज्यमंत्री, १९८९ ते ९० ग्रुह व संसदीयकार्य राज्यमंत्री, १९९१ ते ९२ क्रुसी फलोत्पादन आनि ग्रामविकास मंत्री, १९९२-९३ कामगार स्वंयरोजगार फलोत्पादन आनि ग्रामविकास मंत्री, १९९४ ते ९५ पाटबंधारे मंत्री, १९९९ ते २००१ ग्रुहनिर्मान संसदीय कार्यमंत्री, २००१- २००३ क्रुसी आनि संसदीय कार्यमंत्री म्हनिसन काम दख. कै.शंकरराव चव्हाण, श्री शरदरावजी पवार, कै. सुधाकरराव नाईक, कै. विलासराव देशमुख ह्या चार मुख्यमंत्रीस्ना मंत्रीमंडयम्हा काम करानी संधी दाजीस्ले भेटनी. काँग्रेस पक्सवर त्यास्नी अढय निष्टा से. काँग्रेस पक्सनीज देस गुलामगिरी म्हाईन सोडासाठे लढा दिन्हा. त्या पक्सना दिग्गज नेतास्ना आदर्स त्यास्ना डोयाम्होरे व्हता. तसज त्यास्ना वडिलेस्नी कै. चुडामण आण्णास्नी पुरी हयाती काँग्रेसम्हाज गयी.हाऊ वसा त्यास्नी म्होरे चलाढा. त्यामुयेज हयातीभर
दाजीसाहेब यास्नी काँग्रेस पक्सना पाईक म्हनिसन जिव तोडी काम कय. काहीजन म्हनतस मुख्यमंत्री पदना हकदार लायक मानुस गुटबाजीमुये त्या पदपासीन वंचित राह्यना. दिल्लीना काँग्रेस मुखीयास्ले वाटे हाऊ मानुस मुख्यमंत्री पद दिध नै तरी पक्स सोडाऊ नही आनि हायी अढय निष्टामुयेज घात व्हत गया आनि यकदाव नही तं दोनदाव सायेब मुख्यमंत्री व्हता व्हता राह्यनात. आपला घरना मानुस मुख्यमंत्री म्हनिसन दखानं खानदेसन सपन आपूर राह्यन मातर तरीबी सायेब राजकीय कारकीर्द बाबत खूप खूप समाधानी सेत. मुख्यमंत्री व्हवाबाबत सायेब म्हनतस, तो नसिबनाभी भाग रहास. ” काँग्रेस पक्सनी माले भरभरीसन दिध, सहादाव इधानसभावर आमदार यकदाव इधान परिषदवर आमदार, महाराष्ट्र प्रदेस काँग्रेसना उपाध्यक्स. बराजदाव चांगला खातास्ना मंत्रीपदे भेटनात. त्यामुये पक्सवर मी कधीच नाराज व्हयनू नही. ”
दाजीस्नी यक सुत्र कायम ध्यानम्हा ठेव ते म्हंजे तयगयना आखेरना मानूसलोंग पोहचानं त्यान्हा सुखदुकम्हा त्यान्हामांघे उभ राव्हानं. सामान्य मानसेस्ले न्याव मियाडी देवासाठे त्या झटत राह्यनात. त्यामुये हजारो लोकेस्ना चेहरावर त्यास्ले हसू दखता उनं हायीज त्यास्ना राजकारनम्हाना यसस्वी जिवननं गमक से.
धुये तालुकाना सिंचन सेत्रम्हा वाढ व्हवासाठे बराज योजना राबाड्यात. तालुकाना पश्चिम भागसाठे आक्कलपाडा धरनं, दक्सिन भागम्हा गिरना डावा कालवानं पानी आनं पुरमेपाडा धरनम्हाना गय काढी साठवन शक्ती वाढायी. उत्तर भागसाठे जवाहर क्रुतज्ञता ट्रस्टना माध्यमम्हाईन दाजीस्ना सल्ला ल्ही आ. कुणाल पाटील यास्नी मोठ काम उभ कयं. जवयपास ६५ गावेस्ले नाला रुंदीकरन, खोलीकरनना कामे कयात. दाजी मंत्री व्हतात तव्हय तालुकाना चारी बाजूस्ले केटी वेअर,सिमेंट बंधारा, लघुपाटबंधारा प्रकल्प उभारी खेतीले पानी मियाडी दिध. १९७८ म्हा पह्यलीदाव निवडी येवावर इधानसभा आधिवेसनम्हा दाजीस्नी पांझरा नदीवर साक्री तालुकाम्हा एक मध्यम प्रकल्प उभाराबाबत ठराव मांडा आनि पाठपुरावा करीसन टप्पाटप्पाखाल तो पूरा करी ल्हीधा. आक्कलपाडा प्रकल्पना प्रवासम्हा भूसंपादन, पुनर्वसन याबाबतम्हान खूपज आडथया उनात. मातर खुद राष्ट्रपतीना आध्यादेस काढी जमीन संपादन करानी प्रक्रिया ले नी सायेबेस्ना प्रयत्नले यस उनं. समधाम्हा महत्वानं म्हंजे ” पह्यलेंग पुनर्वसन मंग धरनं ” हाऊ महाराष्ट्रम्हा पह्यलाज प्रयोग ह्या धरनसाठे त्यास्नी कया आनि तो यसस्वी झाया. इस्थापीतेसवर भी अन्याव झाया नही मातर काम पूर व्हवाले थोडा ये लागना हायी समजाडाले त्यास्ना कार्यकर्ता आपूरा पडनात.
धुये तालुकाम्हानी जनताना हातम्हा दोन पैसा येवोत, बेरोजगारेस्ना हातेस्ले काम मियो म्हनिसन १९८० म्हा जवाहर सहकारी शेतकरी सुतगिरनी सुरु कयी मंग टप्पाटप्पाखाल जवाहर रोटो सुतगिरनी, जवाहर पसुखाद्द, जवाहर कुक्कुटपालन, जवाहर मेडीकल फाऊंडेशन, जवाहर सिक्सनसंस्था, जवाहर सामाजिक क्रुतज्ञता निधी ट्रस्ट आस्या आनेक संस्थास्नी उभारनी कयी. तसज धुयाले एस.एस.व्ही.पी.एस. संस्थाना तंत्रनिकेतन आनि आभियांत्रिकी महाइद्दालय, जवाहर मेडिकल फाऊंडेशननं वैद्यकीय, नर्सिंग आनि डेंटल कालेज, जवाहर सिक्सन संस्थान्या गरताड, बेंद्रेपाडा, तरवाडे,धाडरा, वडजई, चिंचवार, मोराणे, सडगावं ह्या गावेस्ले माध्यमिक उच्चमाध्यमिक साया सुरु कयात. म्हंजे के.जी ते पी.जी लोंगनी सिकानी सोय धुयाम्हाज. नवी मुंबई ले आभियांत्रिकी महाइद्दालय सुरु कयं. ह्या समध्या संस्थासम्हा जिल्हाभरम्हाना सिकेल बिगर सिकेल तरुनेस्ले रोजगार मियाडी दिधा. त्यामुये ग्रामीनं भागम्हाना लोकेस्नी परगती व्हयनी.
मातर त्यास्नी मंत्री म्हनिसन फकत जिल्हानाज इचार कया नही. राज्य मंत्रीमंडयम्हा न्यारा न्यारा खातास्ना कारभार दखताना त्या त्या खाताम्हा भरीव दमदार काम कयं. कवी ना. धो. महानोर आमदार असताना जव्हय जव्हय दाजीसाहेब कडे सेतीसुधारन्या योजना लयी येयेत तव्हय तव्हय त्या योजनास्ना आभ्यास करी त्या राबाडानं काम सायेबेस्नी कयं. फलोत्पादन मंत्री व्हतात तव्हय सेतकरीस्ना भलासाठे फयबाग रोजगार हामी योजनासंगे जोडी मदत कयी. ग्रामविकास मंत्री व्हतात तव्हय जि.प. आध्यक्सले राज्यमंत्रीना दर्जा दिन्हा. पाटबंधारा मंत्री व्हतात तव्हय राज्यभरना प्रकल्पेस्न काम मार्गी लाव. जिल्हाम्हान्या तसज राज्यभरना बराज प्रकल्पेस्नी उंची वाढायी. पाटबंधारे खाताम्हा भ्रष्टाचार व्हनार नही यासाठे डोयाम्हा तेल घाली नजर ठी. ये वखतले कठोर बनी संबधीतेस्वर कारवाई कयी. तसज ” एकत्रित पाणलोट क्षेत्र विकास योजना ” महानोर यास्ना ३६ गावेजम्हा राबाडतांना त्यास्ले मदत कयी. निर्नय ल्हीसन सचिव पातयी पासून राज्यम्हा पोहचाडानं काम दाजीसाहेब नी कयं. महानोर त्यामुये सांगतस, ” खेतीइकासना समधा निर्नय दाजीस्ना कायम्हा झायात. ” महाराष्ट्रन भलं करानं काम दाजीस्नी कयं.” सेतकरीस्नी रोपवाटिका तयार करान्या नी त्यास्ले आनुदान देवानं काम दाजीस्नी कयं. दाजीस्नी तव्हय राज्यम्हाना सेतकी आधिकारीस्नी बैठक बलायी बराज चांगला निर्नय ल्हीधात . मनमोहनसिंग आर्थमंत्री व्हतात तव्हय ठिबकनी सबसिडी मियाडी आनी. पानीनी बचत करासाठे १९९० म्हा जलसंधारन खात नवीन कय. त्यालेज आते जलयुक्त सिवार योजना म्हनतस.
खान्देसना वारसा जतन करानं बहुमोल कामभी दाजीस्नी कयं.त्यास्नी खान्देस विकास प्रतिष्ठानना माध्यमम्हाईन धुयाले खान्देस महोत्सव भराडा. खानदेसी कलाकारेस्ले कला सादर करानी संधी दीसन प्रोत्साहन दिध. खान्देसी लोकेस्नी मायबोली आहिरानीवर दाजी भलत पिरेम करतस. त्या सोता अस्खलित आहिरानी बोलतस.आहिरानी भास्याना प्रचार प्रसार व्हवो यासाठे त्यास्नी धुयाले तीन दिननं पाचवं अ.भा. आहिरानी साहित्य संमेलन भराड. आमदार बाबासाहेब कुणाल पाटील त्या संमेलनना स्वागताध्यक्ष व्हतात तं नासिकना चौथा अ.भा. साहित्य संमेलनना स्वागताध्यक्ष सोता दाजीसाहेब व्हतात. पाचवं साहित्य संमेलन मोठा झोकम्हा पार पडनं. तीन दिन साहित्यिक आनि आहिरानी रसिकेस्नी कथा कवितास्नी मेजवानीना आंनद लुटा तसज श्रीखंडनी गोडी चाखत समारोप झाया. दाजीसायेबले दुवा देत समधा परत गयात.
दाजीसाहेब यास्न वाचन भी दांडग से. कोनती भी समस्याना त्या संदर्भ मियाडी, साधक बाधक पुरावास्ना आभ्यास करी निर्नय ल्हेतस. महाराष्ट्र मंत्रीमंडयना म्होरे शिवजयंती उत्सव कव्हय म्हंजे कोनता दिवस साजरा कराना आसा प्रस्न निर्मान झाया. तव्हय दाजीसायेबना आध्यक्सताखाल समिती गठीत झायी. तव्हय दाजीसाहेब यास्नी १९ फेब्रुवारी ले शिवजयंती साजरा करानी आसा योग्य निरनय दिधा त्यामुये शिवप्रेमीस्ना आंनदले भरत उन. आज महाराष्ट्र म्हाज नही तं पुरा भारतम्हा १९ फेब्रुवारी ले शिवजयंती उत्सव मनाडतस.
दाजीसाहेब यास्नी ह्या त्यास्ना राजकीय प्रवासम्हा कधीज तब्येतकडे कानाडोया कया नही. रातले येयवर झोपानं पाह्यटे पाच वाजता उठीसन न्यारा न्यारा प्रकारना यायाम कराना. हाई पथ्य कायम पाये. ऐसी वलांडी तरी आजभी त्या तरुनेस्ले लाजाडी आसा उत्साहम्हा कामे करतस.धुयाले मुक्कामे आसनात म्हंजे मतदार संघम्हा सकायले चार नी संध्याकायले चार गावेस्ले भेटी दी लाकेसन्या आडीआडचनी जानी ल्हेतस, रडनारेस्ना आसू पुसतस. सहादाव आमदार म्हनीन निवडी येवामुये त्यासना मंत्रालयम्हा दबदबा से.लोकेस्ना वाजवी कामे त्यास्ना नुसता फोनवर व्हतस.
दाजीसाहेब आसा चौफेर यक्तीमत्वना धनी सेत. त्यास्ना मार्गदर्सनम्हा आ. कुणाल बाबा तसज धडाडीम्हा काम करी राह्यनात. दाजीसाहेबेस्ले माय तुळजाभवानी आंबरना पाटा देवो आसज हसतमुख ठेवो.
( माहिती स्रोत – तात्यासाहेब प्रकाश पाटील / चुडामण जिभाऊ पाटील )
रमेश बोरसे
संपादक
” खान्देशनी वानगी “
तारीख १५/१२/२०२१
2 thoughts on “खान्देश रतन दाजीसाहेब रोहिदास पाटील”
Comments are closed.