ahirani kavita

ahirani kavita

अहिराणी कविता मानमोड्या

मानमोड्या
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
.. नानाभाऊ माळी

कच्च्या लुच्च्या पोक्कय बाता
तू कवलुंग करशी रें
मव्हरे उजायें मांगे अंधारं
त्याम्हा कवलोंग तरशी रें.. 🌹

गाव गौतरलें फसाडी ऱ्हायना
कितलं पोट तू भरशी रें
खया वाढगा उलगी गयात
आते बोट कोन धरशी रें…. 🌹

मलई टक्कानी खायी ऱ्हायना
पोट टरबूज व्हयन रें
बीपी,शुगर तुन्हा वाढी ऱ्हायना
  घरन्ह सुख पयनं रें…….. 🌹

आरे चाठ्ठयं डंग्रा तुकडा तोड्या
दखस पापनपाड्या तूं
जग दुन्यानां घर फोड्या रें
से वाकडतोंड्या तूं………. 🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹
**********************
…नानाभाऊ माळी

ahirani kavita

अहिराणी कविता सुख दुखनां काला

सुख दुखनां काला
🌹🌹🌹🌹🌹


… नानाभाऊ माळी

सुख दुःख मांडालें
आरसा भेटी जास
दाबायेलं हुंडूक मंग
चिखूल व्हयी व्हास!🌹

तयतय बयबयीस्नी
दुख तें मरन मांगस
कोन कितलं बुडेलं
डोयांन्ह डाबरं सांगसं!🌹

मरन काय सस्त से
आरसा हासी पडस
सोता झामलीं झूमलीं
आखो साटावर चढस!🌹

राम पाह्यरानं कोंबडं
बांग दी जागे करस
सुख दुख कालायेंल
मंग उखली पोटले धरस!🌹
💐💐💐💐💐💐


नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे)
ह.मु.हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१७ जुलै २०२५