नही इसरता येत ahirani song lyrics
🌹नही इसरता येत🌹
सांगी गयी बहिणाई
मन जसं का खाकसं
आभायम्हा बी म्हायेना
मन आसं मन तसं॥धृ॥
मन कसं मन कसं
काय सांगू यानी बात
दिन काय आपुरीच
पडी सांगाले व रात॥१॥
मन्हा संगे निभस वं
यानं जलमनं नातं
सुख काय दुखम्हा बी
नही सोडस व साथ॥२॥
असा भेटता मैतर
काय चिंता नि से बात
हिरा जडसं सोनाम्हा
तसा हाऊ कायजात॥३॥
यानावर जे बितसं
हाऊ नही इसरतं
मांगे टाकस पुढेनी
चालू र्हास कसरत॥४॥
कधी रिकामपनम्हा
बससबी उगायत
ऊन तान पाऊसम्हा
कसा काटा टोचायतं॥५॥
काटा बिगर गुलाब
नही फुलीसनी येत
काटा टोचायेल पन
नही इसरता येत ॥६॥
निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,प्लाॅट नं. ७ अ, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३
.