गाव खाटलावर शहेर पाटलावर  Ahirani language story

गाव खाटलावर शहेर पाटलावर  Ahirani language story

‘गाव खाटलावर शहेर पाटलावर’
   (अहिराणी भाषेत एक
      (सत्य अनुभव कथन)
   लेखन:-‘संजय धनगव्हाळ’
         (अर्थात कुसुमाई)

ज्या दिन मोबाईल ना जन्म व्हयना आनी लोकेस्ना कानले मोबाईल लागना त्या दिनपाहिन गोडीगुलाबीना जमानाच ऱ्हायना नै बठ्ठी जग दुनिया बदली गयी.माणूस माणूस म्हझार अंतर पडाले लागनं,माणसे बोलाले भारी व्हैग्यात तोलीमापीसन बोलाले लागनात,राम राम शाम शाम ते जाऊच द्या दखाले भी तयार नैत भो सुख दुःख ना गप्पा इसरीग्यात एकमेकनी राजीखुशी कोनी इचारत नै इतली काय या मोबाईलनी जादू करी मानसेस्वर कोन जाने.बाया भी तशाच,पोरी भी तशाच बै भला मोठं बंगलाम्हा ऱ्हातस पन घरम्हा घरपण दखात नै एक त्या खोली म्हा,दुसरा दुसरी खोली म्हा कोंडाई जातस येरायेर संगे बोलतस नै म्हणीसन संस्कृतीनी बठ्ठी नासधूस व्हैजायेल शे.

घरम्हा कोन येस कोन जास काही कोनले लेनं देनं नै,कोनलेच गोडी नै शे.बस दखी लेतस आनी कानम्हा गुंड्या घालीसन कोपराम्हा जायी बठ्तस.माणूसले माणूसनी गोडी ऱ्हायनी नै ते माणुसकी ऱ्हायीन का बरं.!कोना सगा आनी कोना सोयरा आतेनास्ले सांगता येस नै.कस इन बरं घरनास्नी सांगाले जोयजेना. सांगथीन तवळते नातं गोत समजीन ना.पन नै आतेना शिकेल सवरेल पोरे नोकरी लगावर त्या कोठे गावम्हा ऱ्हाथस् त्या शहेरमाच पयतस्ना.

म्हनीसन नातं गोत गये चुलाम्हा आपलापुरता दखान  हायी मानसिकता आजकालना लोकेस्मा,माणसेस्मा,परिवारम्हा दखास.त्यामुळे माया,ममता,आपुलकी जिव्हाळा हायी आपलापंन्न,प्रेम, मोहमाया नष्टच व्हैजायेल शे.कारण आते काळ बदलना,माणसे बलदीग्यात आचार विचार,बदलीग्यात संस्कृती बदली गयी रहेनसहेन कपडालत्तास्नी ठेवन बदली जायेल शे आते फाटेल कपडा घालीसन पोरे पोरी फिरतस आनी त्याले फेशन म्हणतस. कोन कोन्ता टाईमले घरना बाहेर पडस कोन कोन्ता टाईमले घर येतस् कोन्लेच खबर लागत नै.

आते कोन्ले कसाना धाक ऱ्हायेल नै शे म्हनीसन कोन काय कता जातस काय करतस कायी कोनी ध्यान ठेवत नै.घरम्हातला जुना जानता वडिल जेठा बोलाले लागनात ते आखो त्यास्नावरच रूबाब करतस तुमले काय करान शे बरं आप्पा! पोऱ्या या वयम्हा मज्या हाज्या नै करावूते ते मंग कवळ करथीन?जशी जग दुनिया शे त्या परमाने त्यास्ले ऱ्हान पडस वागन पडस तुम्हना जमाना गया आते.तुमेन फक्त दखान काम करा गड्या.खर शे भो

Ahirani language story
Ahirani language story


आम्हंना जमाना ग्या
आते नवा जमाना उना
कोन्ले कसानच धरबंध ऱ्हायन नै
कोनीच ऱ्हायन नै तुना आनी मना


अशी गत व्हैयी जायेल शे.बठ्ठ हातम्हाईन सुटी गये,जमाना हातना बाहीर,विचारना पलीकडे चालना ग्या  म्हंजे कितल भी वटका करा कोनत्या पोरी पोऱ्या कोन आयकत्सका बरं. या  व्हाट्सअप,फेसबुक,इन्स्टाना आडे दपिसन जे काही स्वैराचार चाली ऱ्हायना शे ना ते भलत खराब शे बरं. तवळ एक सांग सांगस की


आते काईच ऱ्हायननै खरं
जुना नी सर नवाले येवावू नै बरं

कितला गोडं माणसे व्हतात हो त्या काय मा,बै राम पायऱ्हामा उठेत, झाडीझुडी शेनपुंजा,आवरी सावरीसन दुध धोयी चोयीसन गोरे ढोरे चराले जंगलम्हा लै जायेत काही नदीवर लैजायेत धुवाचुवाले.न्याहरी भांदीसन, गाड जुप की चालनात मानसे उनतांनम्हा वावरम्हा निंदाले,वाखराले पाणी भराले.मगं दुपारना पायऱ्हे चिच ना झाड खाले निवांत बठान कांदा ठेचीसन मस्त खुडा भाकरवर ताव मारान.तवळनी मातीम्हजार कस व्हता म्हनीसन भाकर भी गोड लागे आनी तसाच मानसेभी वागेत चांगल बोलेत इचारपुस करेत. आते काय हायब्रीडना जमाना हायब्रीडन खान आनी हायब्रीडना मायेक वागानं म्हनिसन माणसे माणसेस्मा गोडी ऱ्हायनी नै.

अरै भौ त्या टाईमले बाया भी माणसेस्ना बरोबरीखाल  कामे करेत  रामपायऱ्हामा  उठीसन धान्य आखडेत पाखडेत,शेणपुंजा फेकेत,वावरम्हा निंदाले जायेत, गाडगाम्हा मूरन लायेत,दही लोणी काढेत,गाणा म्हंन्ता म्हंन्ता जातावर दयन दयेत.इतल करिसनभी आखो संध्याकायले जुपन्यात त्या चुल्हाना जोडे.कटाया ते नैज रे भो.कायम चेहरा हासराच ऱ्हाये तिस्ना कितलाका थेकेल ऱ्हायेना चेरावर्ल हासु काही जावू देत नै.

कारण तवळ आजनामायेक फेसबुक व्हाट्सअप इन्स्टाग्राम सारखा धांगडधिंगा थोडीज व्हता!. दिनसरे नै तवलगून काम पुर व्हये नै ते तवळ रिकामा चाळा कराले टाईम ऱ्हाये का बर.सासु,सुना जेठाण्या नंदा समद्या काम कराम्हाच ऱ्हायेत.तवळ कसं खटला न घर व्हत पाच पाच आठ आठ भाऊ एकत्र ऱ्हायेत ते भी गोडीम्हा.संगेच उठान संगेच काम करान आख्ख खटल एकसाथ जेवाले बठेत.आते एव्हढा माणसेस्न ऱ्हांदांन म्हंजे काही साधी गोष्ट व्हती का.आते ना बायास्ले दोन माणसेस्न ऱ्हांदांन जिव्वर येस. छोटं कुटुंब छोटा परिवार म्हा ऱ्हावानी सवय पडीजायेल शे म्हनीसन आतेना पोरी खटलान घरमा काय काम करीन बरं.तवळ कशे


ऱ्हावाले माडी फिराले बैलगाडी
तरी भी ऱ्हाये एकमेकले गोडी
नै कडुकपट नै हेवादावा
राग रूसवा ते नैच करते
एकमेकना संगे समजी उमजी ऱ्हायेत

दिनभर काम करीसन थकीभागी संध्याकायले घर उनात म्हणजे च्यानी फुर्की मारी की बठ्ठा माणसे चावडीवर बठेत एकमेकना सुखदुःख चावळेत. येळप्रसंगले मदतही करेत.भजन किर्तन करीसन भाव भक्तीम्हा गुंगाईजायेत.गावना बठ्ठा माणसे तोंडपाठ ऱ्हायेत हो,म्हंजे कोन कोठे ऱ्हायेत हायी नेम्मन माहीत व्हत. गावम्हा कोना घर पाव्हणा उनात म्हंजे गावम्हा पाय ठेवताच गावना माणसे राम राम शाम शाम करीसन त्यास्नी बठ्ठी इचारपुस करी टाकेत. म्हणजे गावम्हा येयेल‌ पाव्हनाले अर्धातास लगून काही सोडेत नै इतला उभारीबन माणसे व्हतात त्या कायम्हा.

पाव्हना येत नै तवलगुन ते ऱ्हांदाई जाये हो बाईस्न.आते ते पाव्हना उना म्हणजे बाया कप्पायम्हा आढ्या आनतीस. आढ्या देखताच घर येल पाव्हणास्ना मुड आफ व्हैजास.अरे जवळ पाव्हणा येत ना तवळ शेजारपाजाना चार घरेस्ना माणसे च्या पेलावे बलायेत इतली गोडी व्हती त्या काय ना लोकेस्मा.म्हणीसन त्या दिननी सर आते यव्हावू नै.याह्यीबाही कोना का ऱ्हायेतना पन आपला घर बलाईसन च्याना घोट पाजीसनच धाडेत.अशी माणूसकी व्हती.तशेच कोना घर काही कार्यक्रम राहू द्या बरं आख्ख गाव तठे राबेत ज्याना घर कार्यक्रम ऱ्हायना म्हंजे त्याले काहीच दखान काम नै ऱ्हाये.

हातेपाते येरायेरना संगे हातभार लायीसन कोठे कार्यक्रम व्हैजाये पत्ताभी लागे नै.जातपात दुजा भाव नव्हताच ना कोना मनम्हा. त्याना घर कार्यक्रम शे ना मगं तो आपलाच शे हायी भावना ठेयीसन बठ्ठ गाव राबेत हो.ऱ्हांदान काम भी गावना लोकेच करी टाकेत.सांगान मतलब आशे की एकी ऱ्हायनी की कोठे काहीच कमी पडस नै.आजभी काही काही गाव म्हा एकी दखाले भेटस ती शहेरमा दखात नै.


जीभो,शानाभो,नानाभो,मोठाभो, सायबूनाना,दगातात्या,भिका आप्पा भुऱ्हानाना आखो न्हानमाय सोनमाय मोठमाय,जिजी,वनी आक्का,वेणूताई,धुरपताकाकू, सुपाडा माय,जिजा आक्का अशा नावे आयकेल भी नै व्हनार आजना  पोऱ्यास्नी.या कशा बठ्ठा माहितगार मान्से,मरण धरण लगीनयाव न संम्दकाही माहिती ऱ्हाये यास्ले.प्रत्येक कामले याच पुढे ऱ्हायत.कोठे काही का व्हयेना यास्नाच हातम्हा कारभार सोपी देत. यास्ले मोठा मान ऱ्हाये. म्हंजे त्या काय मा गावना एक कारभारी ऱ्हाये त्याले मेढ्या म्हंतस मी जवळ मना मामांना गावले जाऊतना सुट्यासम्हा सामोडाले तठे नामा आप्पा म्हणीसन एक कारभारी व्हतात वज्जी दरारा व्हता त्यान्सा.गावम्हा कोनी गोट्या कवड्या पत्तापुत्ता खेयताना भी दिखीग्या म्हंजे नामा आप्पाले देखताच पोऱ्या धुम ठोकेत इतला दरारा व्हता.आवाज वर चढायीसन बोलानी कोनी हिंमत ते करे नामा आप्पाना पुढे.नै….रे….भो… आजाबात नै.

त्यामुळे बठ्ठाजनी नामा आप्पाना आदर करेत,त्यास्ले घाबरेत त्यास्ले मान,देयेत,आप्पा जे सांगेत ते आयकनचपडे म्हणीसन गावमझार काहीपण कार्यक्रम ऱ्हायेना आप्पा बठ्ठास्ले कामे सोपी देत.आनी ज्यान त्यान काम जो तो गुपगुमान प्रामाणिकपणे करेत कोनी कोना दुसराना कांम्हा लुडबुड करे नैत.

येळ परसंगले नामा आप्पा गाठना पैसा खर्च करी टाकेत पण काम थांबाडेत नै.म्हणजे शिस्तबद्ध नियोजन आणि काम करानी दानत व्हती म्हनीसन कोठेच काही अडचन येत नै व्हती‌. काही का ऱ्हायेना शेती वाडी ना बटवारा इस्टेट नी वाटनी नामा आप्पा ले बलाईसन बराबर समजोताखाल वाटण्या करीसन बठ्ठास्ले लाडीगुलाबीथीन हाशीखुशीथीन वाडे लायेत.तशीच न्हानमाय भी व्हती अशा मोठ्ठा आवाज व्हता ना तिना इचारूच नका आल्ली गल्लीन्या घरन्या बाया ते थर्रकापेत.

निट नेम्मन डोक्यावर पदर टाकीसनच न्हानमाय समोर  जरा आचकाई दचकाईसन बठेत.काही झाये म्हंजे आख्खा गावना बाया न्हान मायले बलायेत. दुखन्,सुखन्.वडा पापडना सिजन उना म्हंजे कितल पिट लेवान तिखट मीट कितल टाकान पिट कसं घेऱ्हानं बठ्ठ न्हानमाय सांगे.आनी मंग बाया अशा  कायी जोर लायीसन पिट घेरेत ना ईचारूच नका

उन्हनी तिरीप तपनी व माय
जल्दी जल्दी पिट घेरा
मळाईगये वडास्न पिट
हातम्हा झारा धरा

वडापापडना वास ते हाय गल्ली ते ती गल्ली दौडे हो.पिट घेरायी सारायी गये की मंग आंगेपांगेना आयाबाया हातभार लायीसन कता वडा पापड करी टाकेत काही खबर लागे नै.पाटलावर्ना शेवाया ते सरसर उतरेत.
हात चालावा सरसर केसर काढा भरभर न्हानमाय शेवायास्ले केसर म्हणे.रातपाठना दवाखाना म्हंजे न्हानमायच ऱ्हाये ना. न्हानमायले सगळा रोगना इलाज माहिती व्हता म्हनीसन न्हानमायलेच इचारेत. बायतपन ते घरचं करी टाके हो न्हानमाय,चोयचाय कराले न्हानमायलेच बलायेत आख्खा गावले सल्ला देत ऱ्हाये न्हानमाय. न्हायमाय आनी नामाआप्पा शिवाय कोनच गाड पुढे सरके नै रे भो.आते अशा कारभारी ऱ्हायना नैत.

आते एकत्र कुटुंब दखात नै.त्या दोन आनी त्यास्ना दोन बस यालेच परिवार म्हणतस आते.म्हनिसन खटलान घर ते नैच ऱ्हायन. जो तो वायला व्हैसन एकला दुकला दार लायीसन घरम्हा बठतस्  कोनलेच कोना धाक नै आनी दरारा ते नैच.तवळ कसे नुस्ता डोळा वटारा म्हणजे माणूस मांगे फिरी जाये‌.नुस्ता नावना दरारा व्हता.

म्हनीसन गावम्हातला माणसे घाबरीसनच ऱ्हायेत आनी आयाबाया ते डोकावर्ला पदर खाले पडू देयेत नै सुनाबेटी. पोरीसोरी चबचबर करे ते खरं.घरम्हा कूरबुर चाले ते नै.गावम्हातला कोनी पराया माणूस घर उना म्हणजे कोनी मजाल काय त्यास्ना पुढे बाई जायी ते.दारना आडे उभी ऱ्हायीसन घरन्ना माणूस ना हातम्हा पाणी ना तांब्या आनी च्या ना तबक देये बाई.आतेना आयाबाया लेकी सुना ते गाऊन घालीस नै ते. ड्रेस घालीस भसकन पराया माणसेस्ना पुढे बठतीस.पोरे सोरे बरमुडा घालीस इरावतीस मिरावतीस.कोन काय बोली यानी भिडभाड भी ठेवतीस नै त्या.

बाजारहाट कोठे गावले जान ऱ्हाये ते  ते घरनी बाई व्हवूबेटी खाले मान घालीस गावना बाहेर जायीसन पायमा चप्पला घालेत.परत घर येवाना टाईमले हातम्हा चप्पल धरीसनच घर येत.इतला वचक व्हता त्या काय म्हा.आतेना सुनाबेटी पोरे करथीन का आशे.वडीलजेठास्ना धाक व्हता वचक व्हता म्हनीसन जो तो घाबरीसन ऱ्हायेत.अनी भलतसलत भी काही घडे नै.काही झाये की लगेच पंचमंडळी येईसन न्यायनिवाडा करीस वाद मिटाडी टाकेत.गावनी आब्रु आनी संस्कार वर कोनी बोट ठेवाले नै जोयजे यांनी कायजी वडीलजेठास्ले व्हती म्हनीसन.

गाव ते गाव ऱ्हास
गावनी सर शहेरले येत नै
गाव सारखं सुंदर जग
शहेरमा दखात नै

आते बठ्ठ बदली जायेल शे मोबाईल ना जगमा सख्खा सोयरा वळख दखाडतस नै ते दुसराथीन काय अपेक्षा करांनी.तवळ नुस्ती कानगी जरी लागनी ते लगेच शेजारल्या बाया दखाले इजाये‌त. आते शेजारना घरम्हा काय व्हस हायी कोनलेच पता लागस नै हावू फरक शे शहेरना आणि खेडाना.आजभी काही काही गावसम्हा जिभाऊ शेतस,न्हानमाय शे आजही त्यास्न सांगेल आयकतस, त्यास्ना सल्ला लेतस.सनवार प्रथा परंपराना सन्मान करतस.आजभी गावम्हा शील,सभ्यता,संस्कार,संस्कृती शाबूत शे.काही थोडाफार बदल झाया व्है ते सोडी दिन ते आज भी वडिल जेठास्ना दरारा शे धाक शे. आयाबाया,माणसे घाबरीसनच ऱ्हातस.

शयेरना संस्कृतीना ईचार करा ते जी काही संस्कार आनी संस्कृती व्हती ती हळूहळू कमी व्है ऱ्हायनी. आजना तरूण पिढीले कमी वयम्हा नै त्या सवयी लागी जायेल शे.मुसडामा  तंबाखू गुटकाना डुच्चा भरीसन नुस्ता पचपच करीऱ्हातस.बाप कमाईवर तिस तिस हजारेंना मोबाईल लाख रूप्यानी गाडीवर याले त्याले लै फिरतस नै त्या उद्योग करतस कोन हाटेलमा कोन सायबर कॅफे टाईमपास करतस.म्हंजे इज्जत आब्रुले काही किंमतच ऱ्हायनी नै.ज्या मायबाप दिनरात कष्ट किरीसन,जिव लायीसन पोरेस्ले मोठं करतस.शिकाडतस हाऊस मौस करतस त्याच पोरे जरासा भी मायबापना इचार न करता  दुसराना हात धरीसन पयी जातस.

मोठा पगारनी नौकरी लागताच बंगला बांधथीन गाडी लेथीन आनी त्याच पोऱ्या मायबापस्ले वृध्दाश्रमा धाडी देतस.कोठे शे संस्कृती कोठे शे संस्कार.घरनास्ले वाटस पोर,पोऱ्या  जायेल शे कालेज म्हा पण त्या कालेजम्हा नै शे हायी घरनास्ले कोठे माहित ऱ्हास. म्हनीसन पोऱ्या राहो नै ते पोरं एक  नजर त्यास्नावर ठेवानी धाक जरा राहू देवाना.आते पैल्हा सारखा जमाना ऱ्हायना नै बठ्ठ नाशी जायेल शे पोऱ्या शिकेल शेतस पन नोकऱ्या मिळतीस नै म्हनिसन तरूण पोऱ्या चोऱ्या माऱ्या कराले लागनात. दिनधव्या अत्याचार व्हतस कोनीच सुरक्षीत नै शे.

म्हणीसन आपली आब्रु आपुनलेच झाकनीपडी शिल सभ्यता  संस्कारम्हा ऱ्हायनात ते कोनी डोळ्या वर करीसन दखावू नै.आपलाच जर पाय चुकायना ते आपुनले कोनी चांगलं म्हनथीन का?कारण आते आशे व्हैजायेल शे की गाव खाटलावर म्हंजे गाव रिकाम व्हैजायेल शे बठठा नवतर्ना पोरे शहेरमा स्थायीक व्हैनात.शहेर पाटलावर म्हंजे शहेरना भाव वधीग्या शहेरना विकास व्हैना प्रगती व्हैनी. त्या अर्थी गाव खाटलावर शहेर पाटलावर म्हंजे गावांना मान कमी आणि शहेरना मान मोठा झाया त्यामुळे जो त़ो उठसुट गाव सोडीनस शहेरमा जायी ऱ्हायनाशेतस.

शहेरमा जायीसन कोन काय करस कशा ऱ्हास कोनले माहित ऱ्हास का बरं.म्हनिसन सतर्क ऱ्हावान डोयामा तेल घालीसन दखान.कोनी कोठे का ऱ्हायेना घरबठीसन दरारा राहुदेवाना,धाक दखाडान.म्हंजे कोनी वाट चुकावू नै आनी आपला मायबापानं गावंन आनी आपली संस्कृतीन नाव खराब व्हनार नै काय…..
Ahirani language story
संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)
९५२२८९२६१८
९५७९११३५४७