जंगल तोड
जंगल तोड…
रान पेटन हिरव
चारीकडे हाहाकार
घर झाय रे उध्वस्त
मुडना मन्हा संसार…!!
मुका प्राणी ना डोयामा
अश्रू निरागस पडे
डोळ्या देखत कटाई
तूटेत हिरवा झाडे…!!
कोण से का वाली आते
बठ्ठा जंगल तूटना
आते जाऊ कोठे आम्ही
प्रश्न एकच पडना…!
चिव ताई खारू बाई
बाघोबा हरिण ताई
कशासाठे झाई याले
जंगल तोडानी घाई…!!
फौजफाटा झाया गोया
अत्याचार मन्हावर
अन्याय कारक पापी
चालन बुलडोझर…!!
ठाम चारशे एकर
रातोरात खेळ झाया
सांगू कोनले व्यथा मी
करस मी गयावया…!!
न्याय मागू सांगा कुठे
देखा हो हाल आमना
कर तुम्ही घोर पाप
हाल व्हतीन तूमना..!!
घर आमनं मोड रे
घर तून्ह तू उभार
ऑक्सिजन करता
आयुष्य तून्ह सरन….!!
✍️Psi विनोद सोनवणे धुळे
दिनांक = १०-०४-२०२५


