अहिरानी मायबोलीना निस्ता गोंधयच गोंधय
आपली अहिरानी मायबोलीना हिसाबथीन जर दखाले गये, ते त्याम्हा निस्ता गोंधयच गोंधय दखावस माले!
खानदेस, खान्देस, कान्हदेस ह्या सब्देसम्हा माले मोगलकायना मुस्लीम राजवटीसना भू भारी आसर दखावस. १९५८-५९ साले जधय आमीन चवथी यत्ताम्हा व्हतूत तधय खानदेस, खान्देश म्हनजे खानांचा देश, (खानांचा प्रदेश) आसा उल्लेख करीसनी इतिहास शिकाडेत आम्हले. आन हाई गोट पटालाईकबी से, कारन त्या काळम्हा आंध्रप्रदेसफाईन ते पार तथा मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आन भारतना कानाकोपरासना बराच भागम्हा मोगलेसनं, मुसलमानेसनं राज्य व्हतं.

निझामशाही, मोगलशाही (मोगलाई) बादशाही, आदिलशाही, कुतुबशाही, आसा नारा नारा नाये व्हतात, आन त्याच नायेसवरथीन तो तो प्रदेस वयखाये. संभाजीनगर आपीन ज्येले म्हनतस ते औरंगाबाद व्हतं!
खान्देश ह्या सबतनीबी तीच गत माले सपस्ट दखावस, त्येले कान्हदेस म्हनेल माले आजिबात सुसंगत वाटत नई.
तसं जर दखाले गये, ते खान्देसनाबी सरय सरय दोन भाग व्हतात. एक पूर्व खान्देश दुसरं पश्चिम खानदेस मी १९६० ते १९७०-७५ या दरम्यान विदर्भम्हाईन खानदेसना नातलगेसले मी पत्रा धाडू, ते जयगाव (पूर्वखानदेस) आन धुयाले (पश्चिम खान्देस) आसाच पत्ता लिखू. त्या कायम्हा तसी लिखीत पद्धतच व्हती ती! यान्हा आर्थ आपला देसवर जवयपास सव सातसे वरीसलगून आलग आलग मुस्लीम राजासनीच राज्य करेल व्हतं, तेन्हाबादम्हा इंग्रज, डच, फ्रेंच आन पोर्तीगीज वनात, तधय आखो नारा नारा भूप्रदेस ज्यासना कोन्हा ताबाम्हा व्हतात तसा तसा नाये पडत गयात. मुंबईनं बॉम्बे देहलीनं दिल्ली कोलकातानं कॕलकटा. गोमंतकनं गोवा.
भारतना इतिहासना जर खूप खोललगून ईच्यार जर कया ते आठला नालंदा विश्वविद्यापीठसारखी जागतिक दर्जानी शैक्षिनिक संस्था व्हती यान्हा सरय सरय आर्थ आसा निंघस का भारतीय संस्कृतीले जगम्हान आजिबात तोडच नई व्हती.
भारतम्हझार येवागुन्ता, जलमार्ग आन खुश्कीनामार्गसवरी सहजच येता येये. इंग्रजेसना काळफाईन विमानसेवा म्हन्जे वायुमार्गबी सुरु व्हई जायेल व्हता!
वास्को डी गामा आन ईतर जगप्रवास करन्हारा लोकेसनी भारतना तसा सोधबी लायेल दखावतस. छत्रपती शिवाजी महाराजना इतिहासबी आसाच भायरना लोकेसकडथीनच आपले म्हाईत व्हयना!

आपला भारतना आव्हढा मोठा व्याप जरी व्हता तरी त्या काळना ज्या राजा व्हतात त्या मातर एकसंघ नई व्हतात, म्हनीसनी आठे भायेरथीन ज्या वनात त्येसनीच भारतना तुकडा तुकडा करी काढात.
इंग्रजेसना कायम्हा जी वैज्ञानिक प्रगती झाई तेन्हामुये जो बदल घडना तोच खरा भारतना निर्मानले कारनीभूत व्हयेल दखावस.
ढाल, तलवारी, भाला, त्रिशूळ, तीरकामठा, गुल्लर, बरछीसना जागावर बंदुका, रायफली, पिस्तुली, बामगोया, रनगाडा वनात.
त्येसनी सोतानं राज्य चलाडानासाठे आन ते नेम्मन टिकाडानासाठे शाया कॉलेज जर नही काढ्यात आन त्यासना ते शिक्षनना प्रचार प्रसार व्हनंबी भू कठीन हुई जातं!
ते ते, ते आखो ह्या आख्खा भारतम्हा त्या कायले ज्या राजा, महाराजा व्हतात, त्येसनीबी निस्ता आपला आपलाच मतलब दखा, खरं ते आखंड भारतना तुकडा त्या ऐयाश राजा रजवाडासनीच पाडात. त्या राजा रजवाडा १८५२ नंतर चुकीसनबी कधी संघटीत व्हयनातच नथीन.
पुढना इतिहास सांगानी माले आवश्यकता नई वाटंस.
वर लिखेल जो इतिहास से ना त्या हिसाबथीन माले आपला देसम्हातली गरिबी, अडानाच्योटपना आन जो आठे वुना आन राज कराले लागना त्येलेच आपला मालक समझानी जी हुजूरीमुये आपीन आझूनबी पुरापाठा सुधरेल नथीन. आन सुधरावतबी नथीन. गुलामगिरी पुरीपाठी आपला पाचवीलेच पुंजेल से!
दूर कसाले जातंस, मांघना बारा तेरा वरीसनाच ईच्यार कराना, कितला यडपट आन गयबान्या सेतंस आपन, पन हाई आपला ध्यानम्हा तरी येस का? कथा गये ते संविधान, ते आरक्षन, ती लोकशाही?
शे का त्येन्ही फिकीर कोनले? निस्ता तोंड दाबीसनी बुक्कासना मार खात खात मुक्का बनी बठेल सेतंस आपन, कधी धरम, जात-पात कधी त्या लाडक्याबहिनीसले लोभ दाई दुईसनी, पथंभेदना मुलामा चढाईचुढाईसनी नयतरना पोर्हे पोर्हीसना डोका भडकावाना कामे सुरु शेतंस! आहो एक भावड्यानी ते गनपतीलेबी दूध पाजी दखाडेल से आपले! आन आपीनबी तसा अन्नाडूपना करेलच से ना!
फक्त सत्ता कसी मियावानी, त्येन्हासाठे साम, दाम, दंड, भेद नितिना वापर कसा कराना, खून, राजकीय नेतासवर वाट्टेल तसा खोटानाटा आरोप लावाना, विरोधकेसनी टिंगलटवाई करीसनी त्येले नेस्तनाबूत करानं, बिल्डरेसले ठेका दीसनी वरथीन त्येसनाकडथीनच खंडनी ल्हीसनी आरबोपती बनानं, बलात्कार, खून-खराबा यासना खटलासना निकाल सालोगिनती नई लागू देवाना, आसा मनमानी, (अनागोंदी) वायबार कारभार सुरु शेतंस! कालदिसना न्यायाधीश आज राजकीय पुढारी बनी र्हायनात, राज्यकर्ता आन राज्यपाल बनी र्हायनात !
आन आपीन आपला प्रादेशिक, बिनकामन्या भानगडीसम्हा गुती बठेल सेतंस!
आरे! आतेलगून अहिरानी मायबोलीनं विद्यापीठ सुरु व्हुई जावाले जोयजेल व्हतं, नाटक कंपन्या, सिनेमा कंपन्या, निंगाले जोयजेल व्हत्यात, तमासासम्हान काम करनारेसले रितसर मानसन्मान दी सनी मानधन सुरु व्हुई जावाले जोयजेल व्हतं! त्या बिचारा कथा झक मारत बठेल सेतंस, से का त्येसनी काही सुदबुद? खानदेसनं एक येगळं राज्य व्हुई जावाले जोयजेल व्हतं, बोलीभाश्या हाई अहिरानीमाय मावलीनी लिपी निंगी जावाले जोयजेल व्हती!
त्या खान्देसभागना भाडखाऊ आमदार खासदारबी निस्त्या आपल्याच पोया शेकीसनी आपलीच —- लाल करी ल्ही र्हायनात! काय बोलो आखो सांगाना?
बरं भावड्यासहोन! थांबस आते!
शिवाजीआप्पा साळुंके.
#AhiraniLanguage #AhiraniCulture #PrideOfAhirani #AhiraniPoetry #AhiraniHeritage #RuralTradition #LinguisticPride #FolkCulture #MarathiDialects #CulturalRoots
#अहिराणीभाषा #अहिराणीसंस्कृती #अहिराणीगौरव #अहिराणीसाहित्य #ग्रामीणपरंपरा #भाषेचाअभिमान #लोकसंस्कृती #मराठीउपभाषा #संस्कृतीचीमुळे #काव्यविश्व