!!काकूयीदी!!
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
************************
बांधवर निमन्ह झाड व्हतं!त्याले बिलगी आंबान्ह झाड हुभ व्हतं!हायी देवबानी कमाल व्हती!त्या दोन्ही धाकल्पनफाइन संगेमांगे बुंधडालें बुंधडं चिटकी हुभा ऱ्हायेल व्हतात!दोन्हीस्न्या फांट्या नाग-नागीण सारखा एक दुसराले गोलगोल फिरी वाढी ऱ्हायंतात!नेम्मन वर अभ्रायांगंम दखी सरकी ऱ्हायंतात!आंबा-निमन्या फांट्या येरायेरम्हा घुसी ऱ्हायंत्यात!बिलगी मव्हरे सरकी ऱ्हायंत्यात!एक दुसरीले धरी वाढी ऱ्हायंत्यातं!येरायरन्ह्या झितरा व्हडी बाले इचरी ऱ्हायंतात!फनी फिरायी ऱ्हायंतात!निम व्हता कडू!आंबा व्हता गोड!कडू-गोड बठ्ठ एकजीव व्हयी ऱ्हायंत!एक दुसरा शिवाय आपोरा व्हतात!एक दुसरा मुचूक अधुरा व्हतात!

आतेचं मांगे महाशिवराती चालनी गयी!तोंडवर व्हइ हुभी व्हती!आखो दहा-बारा दिनम्हा गवऱ्या, लाकडे गोया करांनी तयारी चालू व्हती!त्यानंपहिलेंग सूर्यदेव तपाडी ऱ्हायंता नि उन आपलं रंग दखाडी ऱ्हायंता!वावरे खेतस्मानां झाडे,जुना पांटा गायी ऱ्हायंतातं!नव्वा डिर फुटी ऱ्हायंतातं!बठ्ठ निय्ये जंगल पिव्वे सुकायी,झडी ऱ्हायंत!तरीभी निमन्हा झाडेस्लें गय्यऱ्या निमून्या येल दिखी ऱ्हायंत्यात!गय्यरं फुल्लर येल दिखी ऱ्हायंतं!उंडायानां चटकाम्हा निय्या पाने नाची ऱ्हायंतात!आंबान्ह्या फांट्या निंबून्या सुंगी ऱ्हायंत्यात!आंबा भी निय्ये लुगडं नेसी आथा तथा बारीक सारीक मोहोर दखाडी ऱ्हायंता!दोन्ही झाडे एक दुसराल्हे धरीधुरी हुभारीम्हा हुभा दिखी ऱ्हायंतात!वावरन्हा बांधवर झोपायी सावली करी हासी ऱ्हायंतात!
महाशिवराती चालनी गयी!नि सूर्यदेव हातमा उब्या धरी फिरी ऱ्हायंता!चटकाडी ऱ्हायंता! ‘तीsss’ …निम-आंबान्हा येटोया झाडखाले जागा सवारी-सुवारी बठेल व्हती!तठेचं बैलगाडं सोडेल व्हतं!आंबा-निमन्हा झाडना बेचाया बुंधडांलें झोयी बांधेल व्हती!झोयी हाली ऱ्हायंती!लेकरू झोयीम्हा गायीगायी करी ऱ्हायंत!उन भी टुक्कारपना करी ऱ्हायंत!उंन निमन्ही सावलीम्हा येवालें भ्यायी ऱ्हायंत!सूर्यदेव वरतीन निम-आंबान्हा निय्यागारा पांटास्मझार ढुकी ढूकी दखी ऱ्हायंता!वाच्चाय वार्ग फांट्यास्मा घुसी उलगेलपना करी ऱ्हायंत!फांट्यास्मझार पांटा हालायी नाची ऱ्हायंत! ‘ती’ आथी तथी दुरपावूत नजर लायी दखी ऱ्हायंती!बठ्ठा झाडेस्नी जुना साज-शिनगार काढी ठेयेल व्हता!सुकायेलं पांटा गयी ऱ्हायंतात!पांदडां उडी उडी नव्वा कव्व्या निय्या पाने फुटेल दिखी ऱ्हायंतात!🌹

दुपारनाभरे झाडेस्वर बठेल हाड्या चिड्या आपापला आवाजम्हा बातचित् करी ऱ्हायंतात!उंनन्हा चटका वाढेल व्हता!’तोsss’ झाडखाले बैलगाड सोडी,तथा बांधवरनी वडांग सवार-सुवार करी ऱ्हायंता!वावराम्हा पहिरेल पसाद हरभरा,गहू, दादर हुभ पीक दिखी ऱ्हायंतं!ढोरे-ढाकरेस्नी भीतीदखी दोन्ही जिवडा वावरम्हा येल व्हतात! पानींनी कयसी ठेयेल व्हती!कयसीन्हा तोंडवर गिरमी ठेयेलं व्हती!
‘तो’ आंगे पांगे जंगलन्ह्या काटाया झाडेस्न्या फांट्या तोडी वडांगलें लायी ऱ्हायंता!’ती’ लेकरून्हा सासूल ली आवर सावर करी ऱ्हायंती!दोन्ही जिवडा हाय उपस करी ऱ्हायंतात!दुपारन्हा भरे निम-आंबानां झाडेस्ना डोकावरतून सूर्यदेव ढूकी दखी ऱ्हायंता!किर्रर्र किरकोडास्ना आवाज कानवर पडी ऱ्हायंता!गावनां आंगे वावराम्हा उंडायांनं व्हात वार्ग आंगवर झेली,दोन्ही जिवडा पोटगुंता राबी ऱ्हायंतात!झटी ऱ्हायंतात!आपला लेकरूले झोयीम्हा टाकी वावरम्हा राबी ऱ्हायंतात!
उत्तरन्हा बांधकडतीन चार-पाच डुकरे दादारनां वावरम्हा घुसी दादर आडी पाडी कनसे खायी ऱ्हायंतात!डुकरे पुल्ला दोन पायस्मझार हुभा तोटालें मव्हरे सरकत आड पाडी कनसें खायी ऱ्हायंतात!आशी आडी पाडी पाडी दादरनी वाट लायी ऱ्हायंतात!डुक्कर मूक्ल चत्र आन हुशार जनावर ऱ्हास!!!दोन्ही जिवडा दगडे मारी मारी डुकरेस्लें हुस्कायी ऱ्हायंतात!सावलीले बैलगाडावर बठेल कुत्तलं एकदम दादरम्हा पयत सुटनं!डुकरेस्वर भुकी भुकी हुस्काडी ऱ्हायंत!डुकरे वावराम्हायीन बाहेर पयी ऱ्हायंतात!🌹
कुत्तलानां भुकामुये झोयीम्हा जपेल लेकरू जोरम्हा भेमकायी उठनं व्हतं!बठ्ठा डुकरेस्ना मांगे लागेलं व्हतात!डुक्कर भलतं चत्र आन सासुले जनावर ऱ्हास!सासूल लागताच पयत सुटना व्हतात!देड वरीसन्ह लेकरू जोरजोरमा रडालें लाग्न व्हतं!आऱ्हाळ्या मारी झोयीम्हायीनं खाले पडी गयतं!नेम्मन झाडेस्ना बुंधडास्ना खाले जमीनवर पडनं व्हतं!’ती’.. लेकरूना आवाज कानावर पडताच तथायीन पयत सुटनी!बांधवरतीन आंबाना झाडकडे पयत सुटनी व्हती!लेकरू खाले पडेल व्हतं!जोरजोरम्हा रडी ऱ्हायंत!हात तोंडले लागेल नही व्हतं!लेकरूले उखलीस्नी छातीलें लायी रडता लेकरूनां जोर जोरम्हा मुक्कू ली ऱ्हायंती!मायनीं मया आशीच खरबेल ऱ्हास!पोऱ्याले छातीलें लायी,वरतीन पलो झाकीस्नी दुध पाजाले लाग्नी व्हती!लेकरू हुंदका दि रडीरडी दूध पी ऱ्हायंत!’ती’त्याले उग करता करता सोतान्हा डोयाम्हायीन आंसू गायी ऱ्हायंती!’तो’ डुकरे हाकलीस्नी पोऱ्यांगम पयत सुटना!पोऱ्यांगंम दखतं सकत लागी हुभा व्हता!लेकरू हुंदकी हुंदकी दूध पी ऱ्हायंत! 🌹
‘तो’ तिगंमं दखी ऱ्हायंता!’ती’ लेकरूले छातीला लायी आसूं गायी ऱ्हायंती!तिले दखी त्यान्हा आसूं डोयाम्हाचं जिरी गयतात!बाप व्हता!कोनल्हे आंसू दखाडता? लेकरू चुटूचूटू दूध पी ऱ्हायंत!तथा कुत्तलांना आखो भुकांना आवाज काने पडना तशा तो तथा पयत सुटना!डुकरेस्लें कनीसनी चव लागी जायेल व्हती!हुभ पीक वाचाडागुंता जीव धरी पयी ऱ्हायंता!हाते-तोंडे येल पीक वाचाडागुंता तो आन ती कायपात करी जीव काढी पीकन्ही राखनदारी करी ऱ्हायंतात!काकूयीदी करी जगी ऱ्हायंतात 💐
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
**********************
… नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा, जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०४ मार्च २०२५