मन्ही वाघीन ahirani language

ahirani language

मन्ही वाघीन
नानाभाऊ माळी

निस्ता कोल्ला मोल्ला पोखतंस तुम्ही!हारभरानां झाडवर चढालें लावतंस नीं दूरथीन गंम्मत दखत बठतंस!मी भी येडांगी तुमन्ह भरसे लागी जास!तुम्ही आते कितलं भी गोड बोलशात!पानीं लावशात तरी ध्यान देवावू नयी मी!मी यडांगी आक्सी तुमन्हा गोडंब्या सभावम्हा फसी जास!मी बांगी तुमन्ह आयकी निस्ट्या दगडवर बठी मोठायकी कराले जास!मी सोती निस्टी जास!बठ्ठ मन्हाचं माथे पडस!मी उस्न पास्न मांगी लयी येस!टाइमवर किराणा भरो नयी!तुम्ही खुशाल आंग चोरी निस्टी जातंस!बट्ठी गोठ वात्रायी जायेल सें!घरमा सें!नही सें यांनी कायजी नही तुम्हले!बठ्ठ गावं उखली लयतस!इतला इत्रायी जातंस तुम्ही!त्या वातरतसं!संगे वात्रायेलस्लें लयी येतंस!तुमन्हा वखरायेलस्ना भरसे लागावू नयी आते!’ बाई तोंडंन्हा रेडू बंद करी मांगलदारें चालनी गयी!च्यानां कोप दंनकरी आदयी चालनी गयी!आर्धा च्या बसीम्हा सांडायी गयता

लगीनम्हा नवरदेव नवरी पानीन्ही गुयींनी फक्कनं तोंडंवर टाकतस तशी बाईं भस्कन मन्हा आंगवर, तोंडवर सबद गुयीनी टाकी चालनी गयी!जाता जाता मन्हा तोंडले कुस्टायें लायीं गयी!कव्हयं मव्हयं बाई आशी आंगवर धायी येस!आपुन समजी लेवो उपाधी व्हयी गयी सालं!सोताव्हयी खरूज काढी आपुन!उब्याम्हा कोल्ला खटक लाकडे तडकतीन आते आनी उब्या दिनभर चेटत ऱ्हायी!त्यान्ही शेक दिनभर लागत ऱ्हायी!धग निरानाम म्हलांवांवू नही!खरचं वाघीन सें हो ती!कामम्हा वाघीन,गावमां वाघीन,गल्लीमा वाघीन!वावरम्हा काम व्हडाम्हा वाघीन!तिन्हा हात आनी तोंडं कोनी धरस नही!आनी तोंडे भी कोनी लागानी हिम्मत भी करत नयी!

Khandeshi Ahirani language
Ahirani language

एखादालें चिमटी लेवानीं आदत पडी जायेल ऱ्हास!धीरेजकरी चिमटी लींस्नी तिबाक काने व्हयी जावो!मी भी हातना दोन्ही बोटे एकजोगे आनातं!इतुलुशी जागा ठी, दोन्ही नखें एक दुसरालें भिडनात नि धीरेस्करी बाईलें चिमटी काढी लिधी!वाघीन ती वाघीनंच ऱ्हास!ती जोरम्हा लंल्हायी पडनी!रवसडी आंगवर उनीन्हा!वाघीननां नखें मुलूकन्हा मोठा ऱ्हातंस!मोठ्ठा पंजा मारी आंगवर उनीन्हा!!मी काय करतू?
आज आशीच जोर जोरम्हा डरकायी फोडी, फिस्कारीस्नी आंगवर यी लाग्नी!घर डोकावरं धरी घुर्रर्र घुर्रर्र करी ऱ्हायंती!तिन्हा आवतार दखी धीरेस्करी पडमथ लीं गुच्चूप पुल्ला दारे निंघी गवू!त्यान्ह कारन भी तशीच घडनं व्हतं!

शिरपूरनी जत्रा पुनी फाइन सुरू व्हयी जायेलं सें!नाता गोतानां बठ्ठा पाव्हनापयी यी जायी ऱ्हायंनात!जत्राम्हा कोनी आटा साठानां भेटनातं का त्यास्लें सरकडी घर लयी येवानी आपली रीत भात सें!जेवने खावने व्हवाशिवाय जावू देवानं नयी हावू पहिलेंग फाइन रीवाज सें!पन घरमा सें,नही सें,अजिबात इचार वाचार नही ऱ्हास!आपले लोकेस्ना संग्रो करांनी आदत पडी जायेल सें!जत्राम्हा येल आटा साठान्हा,लंगोटी दोस्त, सगासाईस्लें पोटभरी जेवाडी धाडो, भरेलं पोटे त्यास्ना ‘आन्नदाता सुखी भव’ आसा सबद कानवर पडो आशी वाटतं ऱ्हास!याम्हा त्यास्न पोट आनी आपलं मन गरायी जास!माले घरमाम्हानां साफ्टान्हा आंदाज येत नही!

बाई काय बोलस यान्हा सुमारा नही!आडी भीतवर पडी भीत व्हयी जास!बठ्ठा एकखट्टे काला मोडी लेवानी आदत सें!आज जत्राम्हा येल पाव्हनास्लें घर लयी उनू आनी काय सांगो!भांडा खनकाडी कान ठनकाडी घरन्ही जागल करी ऱ्हायंती!मनगंम निस्ती मट मट दखी ऱ्हायंती!माले आर्धा खावू का पुरा खावू आशी करी ऱ्हायंती पन बाईंजातलें उज्जी लोक लाज ऱ्हास बरं!!परकांमव्हरे नवरानी झाकेल मूठ सव्वा लाखनी ठेवस

ती!मांगे कोपरा दखी तोंडं सुख लीं ल्हेस!तोंडवरी चांगलचं कुमचाडी काढस!पोक्कय टोकरन्हा टकोरा हाना तें चालस पन तोंडंन्हा टकोरा!मानोसले कायेनिय्ये करी टाकस!पन मनसंगें जत्राम्हा येल सगासाई व्हतात!मी वाची गवू आनी खानदानी बाईनीं नवरानी इज्जत झाकी ठी!तिले नवरानी इज्जत प्यारी ऱ्हास!दुसरांमव्हरे मानोसलें देवपन दि पूजा करी ल्हेस!खरचं नारी महान ऱ्हास हो!

आज भी जत्राननां पावन्हा लयी उंथू!आम्ही वट्टावर बठी गप्पा कुटी ऱ्हायंतुत, तितलाम्हा बाई धीरेजकरी मांगलदारथून,आंगेन्हा घरम्हा घूसत दिखनी!आट्रम सट्रम काय तरी उसनवार लयी उनी!तें मातरं मन्हा नजरे पडनं व्हतं!पाचं दहा मिंटाम्हा मगमगात वास नाकम्हा घुसी ऱ्हायंता!शेगडीवर कढाय ठेयेलं व्हती!उकयता तेलम्हा भजी तयायी ऱ्हायंती…भजी, पोहे,शिरा भरी ताटंल्या आम्हना मव्हरे उन्यात!जीभलें पानी सुटेल व्हतं!मगमगात वास अन जीभलें पानी सुटेल व्हतं!भजी कटबन भारी लागी ऱ्हायंती!बठ्ठास्नी कुमचाडी दोन दोन प्लेटास्वर ताव मारा!तितलाम्हा खरंबेल दुधन्हा च्या हात म्हा !फुकी फुकी,फुरका मारी च्या लिधा!आम्ही गप्पा कुटत, फुरका मारत च्या सरावा!बठ्ठास्नी भजी खादी!बाईनीं तारीफ करी!श्याभास्की भेटावर बाई भी खुश दिखी ऱ्हायंती!

पाव्हना चालना ग्यात नि बाईनीं पहिलेगं मझारम्हायीन दार लायी लिधं!कडी व्हडी लिधी!भाहेर कोनी आयकाले नको,गाजावाजा नको,माले मझारनीं खोलीम्हा बलायी लयी गयी!आथायीन तथायीन घरन्हा भितडा उभा व्हतात!सासूल लेव्हालें, कानपाडी आयकालें कोनी नही व्हतं!बाई आवाज चढायी तोंडंन्ह घोडं दामटाडालें लाग्नी,’तुमल्हे  डोकं बीकं सें का नही हो?

दरखेपे हावश्या नवश्यास्लें सरकडी लयतसं!धल्ली वटका करी ऱ्हायंती!तरी भी मी नरमायीनं धोरन ल्हेस यांना आर्थ काय झाया?आपला घरमा डबोलं ठेयेलं सें का?दर टाइमलें हात पसरी आंगेनांस्लें तरास देवो!आयीन टाइमले इतुलसं धाकलं तोंडं करी भीक मांगनी पडस!उसनवार करी लयन पडस!लाज वाटस माले आते!घरम्हा सें,नही सें यान्हा अंदाज नही तुम्हले!वाटस,मी सोतान्हा झितरा व्हडी डोकं ठोकत ऱ्हावो!तुम्ही उपादिखोर सेतस!सोता निचीतवार ऱ्हातंस!मी पयापय करी मांगी लयेस!जत्रालें येणारास्ना गये भरत ऱ्हास!किरांना भरी लयी या पहिलेंग!मंग जत्राना पाव्हनास्लें बलावा!’

बाई लांबल्ला हात करी बोली ऱ्हायंती!मन्ही दातखीयी बठी जायेल व्हती!मी कानपाडी आयकी ऱ्हायंतू!मी पडमथ्यांमायेक आयकी ऱ्हायंतू! ती सभागतथून सांगी ऱ्हायंती!मझारम्हाचं तिन्ह तोंडं चढ-उतारवर चाली ऱ्हायंतं!घरन्हया चार भितडा भायीस्नी कांनपाडी आयकी ऱ्हायंत्यात!माले डोयांमव्हरे जत्रा दिखी ऱ्हायंती!गोलगिटिंग फिरनारा पायना दिखी ऱ्हायंतात!मी बट्ठी जत्रा एखला फिरी ऱ्हायंतू!जत्रालें येल पाव्हना पयीस्लें नजर टायी, पाट दखाडी पयी ऱ्हायंतू!मन्ही शिरपूरन्ही वाघीनन्ही तोंडंन्हा झापडावरी कानशील शेका व्हतात!मी तोंडंपाडी वट्टावर यी बठनू!आंधारं पडी गें तरी तठेचं बठेल व्हतू!बाई सयपाक करी उठनी!

मन्हा रावन्या करत बोलनी,’ दखा मन्ह चुकनं व्हयी तें हातमा टिपरं लिस्नी माले झोडी काढा!पन सूत्तक धरी बठू नका!’ मन्हा हात धरी घरमा लयी गयी!धाकला पोऱ्याल्हे बलका तोंडम्हा खावाडो आशी खावाडी ऱ्हायंती!दोनीस्ना डोयांस्मझार डाबरां भरी येल व्हतात!आंधारांम्हा दुरतीन जत्रान्ही लाइटिंग चमकी ऱ्हायंती!पायना खालेवर फिरी ऱ्हायंतात!मन्ही वाघीन जेवन करी भांडा घसडी ऱ्हायंती!मी तिन्हा कायेजम्हा घुसी तिन्हा सभावन्हा ठाक लीं ऱ्हायंतू!

नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१८ फेब्रुवारी २०२५