ahirani kavita खेडाम्हाना येडा आम्ही
॥श्री॥
खेडाम्हाना येडा आम्ही
प्रेमबिम करं नही भलताज येडा व्हतुत
खेडाम्हाना येडा आम्ही कथाईन प्रेम करतुत
शाळा सुटनी म्हंजे आम्ही थेट घर गाठूत
घरना बाहेर पडानं नही मायबापनं ऐकूत..
डोयानात्या धाकम्हा व्हतूत नजर राहे खाली
टोपलं लईन घरम्हां ये ये आमनी भाजीवाली
माईन आत्या घरमां बठी मायले भाजी देये
मोबदलाम्हा बाजरीनं ती गठोडं लई जाये…
कुम्हार येये सुतार येये सोनारबी घर येये
चम्हार चपला घरबठी आम्हले दी जाये
बारा बलुतेदार व्हतात घरपोच सेवा करेत
हंगाम म्हा त्या त्यासना वाटा खयाम्हा लई जायेत…
कपडाना तागा बी दखाडाले येतेत
बाया तवयं घरनाबाहेर दुकानम्हा नही जायेत
पडदानी ती गाडी म्हा माय खेतम्हा जाये
गवार भेंडी वायके तोडीन तांदुयकाभी लये….
हातमोड्यानी बाजरी खुडेत मंग उपास करेत
चौठाम्हां मंग बठ्ठा मिसन ऊस नी खोपडी करेत
साधंसुधं व्हतं जीवन पार करी गवूत
पायठाम्हा उठे सालदार मंग जोडे देखा औत..
सयरम्हां मंग शिकाले मामाना घर गऊत
दर साल वर्गाम्हा मंग पास हुई जाउत…
अठरावरीस व्हताच बापनी लगीन करी दिधं
असं व्हतं जीवन आमनं भलतंज साधंसुधं…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: १८ जानेवारी २०२५
वेळ: रात्री ८/१७