Ahirani language poetry
लबाडन जग…
आयुष्यावर बोलू थोड
सोप नही सध्यान जगन
कसट जेसना नशिबमा
तेसना जीवनमा नही हसन…!!
लुच्चा मारतस मज्जा
दोन नंबरन तेसन जगन
अंतर मनले ईचारा त्यासले
खुशीथीन नही त्यासन राहन…!!
भुलथापा देत बेईमान
लुट जनतानी करतस
येस ये जधय वाईट
कुत्र्यागत रस्त्यावर मरतस…!!
गोर गरीब बळीले लुटत
बँका भयान लुटतस
त्याच चोर गुन्हेगार खरा
आते शाव बनीसन जगमा मिरतस…!!
कर्म वाईट लपाडत भामटा
जनताले दोन पैसान मोह दावतस
आपलीच नगरीमा मार खात
ठाण मांडी परत बाहेर गाव र्हातस …!!
भोयेपन आंगे देखाडत
कर्म कधयच नही लपत
जवय भरस पापना घडा
खाकी तवय पाप नही झाकस…!!
Psi विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =०२-१२-२०२४
