अहिराणी बोली कवी
डाव रडीना…
न्यारा चेहरा जगना
माले ये नी ते शिकाड
कोन कधय पलटी
खुप उशीरा देखाड…!!
जग जस दिसस हो
तस ते नहीच र्हास
साधापना ना सोगोंबा
म्हनीसन जग फसस…!!
जीवनमा साधापन
गर्व तर नही कया
गोड बोली पाठवर
मन्हावर वार झाया…!!
डाव रडीना तुमना
व्हतु बेसावध मीच
तरी अश्रु साफ कया
तरी अपेक्षा हो तीच…!!
सुख दुःखना वाटमा
स्वार्थ नही देखा बर
करा वागा मजार खे
क्षणमा परक कर…!!
वाटा काटेरी भलत्या
काटा पायले टोचेत
हिम्मतथीन चालनू
बठा गंमत देखेत…!!
खचाव नही कधय
मन भलत खंबीर
संघर्ष नशिबी खरा
वाट मन्ही खडतर
ताकदथीन चालत
परत उभा रायनू
नशिब संगे लढा मन्हा
सदा सामोर चालनू…!!
गणिमी कावा तुमना
नही कयन रे माले
कपटीना डाव भारी
नही ऊना हो ध्यानले…!!
✍️Psi विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =३०-११-२०२४