कसा शेतंस? ahirani language
भावड्यासहोन नमस्कार!
कसा शेतंस? मज्याम्हान शेतंस ना?
मज्याम्हा काब्रं नई व्हशात तुमीन! तथा पॕरीस आलिम्पिकम्हा नेमबाजीना खेयम्हा ती मनूताई भाकर आन तो सरज्योतनंतर आपला महाराष्ट्राम्हातला कोल्हापूर जिल्हाम्हातला एक खेडागावम्हातला स्वप्निल सुरेश कुसळेनी कास्यपदक जीकीसनी भारतनं नाव भारतम्हाज ऊच्च कयंना! म्हनीसन तुम्हनी छाती छप्पन इंच नाबी वरलगून फुगी जायेली व्हई! शे ना?
तसं दखाले गयं ते, खरंबी शे म्हना! मी त्या आॕलिंपिक खेयेसनी पदक तालिका चार पाच दिवसफाईन डोयासम्हा तेल घाली घाली दखी र्हायन्थू पन, सलं आपला भारतना समोर एकबी सुवर्न पदक आन रजत पदक दखाये नईत माले! ते, ते दूरज र्हायनं, पन एखांन्द कास्यपदकबी दखाए नई हो! बहे मी चस्मा पुसी पुसी पुनाईन पुनाईन ती पदकतालिकाम्हा डोया खुपसी खुपसी दखू पन आपला भारतना नावना मव्हरे तिन्हीन तिनी पदतालिकासम्हाईन एकबी पदक माले दखाए नई तठे! मातंर परोनदिन ती मनू भाकरनं आन त्या सरज्योत दादानं नाव दखायनं तधय जराखा मन्हा जीवम्हा जीव वना हौ!
चला गड्या म्हन्तं, नई सुवर्न नै ते नई ,आन रजत पदकबी नई ते नई, पन निदान कास्यपदकम्हा तरी आपला भारतनं नाव शे, म्हनीसन मी वज्जी मोठा सुस्कारा टाकीसनी दुधनी तीस ताकवर भागाडीभुगाडीसनी त्या सुरेश कुसळेनं मनम्हान मनम्हा कवतिक करत बठनू.
भावड्यासहोन!
माले सांघिक आन वैयक्तिक खेयेसम्हान भलता इन्ट्रेस्ट व्हता आन आतेबी शे बरका! हां ते बुद्धीबयनं तवढं खुई मन्हा डोकाम्हा आजलगून तरी घुसनं नई नै ते नईज घुसनं! त्येम्हानबी मी बक्षिस पटकावाबिचूक नई र्हातू हाई मी तुम्हले कोरा टॕमपेपरवर लिखी देस. तसा डोका खाजाडीखुजाडी खेवाना खेय काई माले वनातच नईत! त्येले एक आनुवौंशीक कारन शे, आन ते आसं, का तुम्हना आज्ला म्हन्जे मन्हा ताथ्या याने की, मेरा बाप, फादर, वडील, पिताजी, अब्बूजान! ह्या पहिलवान व्हतात, आन आनुवौंशिकताना हिसाबखाल पहिलवानेसनी आक्कल कथी र्हास?
तुम्हना आंदाज बरबर शे, पहिलवानेसनी आक्कल त्येसना घुटनाम्हा र्हास! पन मन्हाबाराम्हा हाई गनित एकदमच आल्लग व्हतं. मन्हा ताथ्यानी आक्कल हाई थोडीभूतज घुटनाम्हा व्हती हाई तुम्हले समजाडीसनी सांगा साठे हावू एक मजेदार किस्सा आयकाडंस!
तो मन ताथ्यानत्यासनी सिनेमाथेटरम्हातली हानामारीना सिन आझू मन्हा डोयासम्हवरे त्या सिनेमाथीनबी क्लियरकट गरगर गरगर गरगर फिरताना दखावस. ते झायं आसं, का मी मस्तपैकी मन्हा दोन्ही हात मांघे जिमिनवर ठीसनी सिनेमा दखत बठेल व्हतू (भावड्यासहोन!
आम्हना जमानाम्हा जिमीनवर बठीसनी सिनेमा दखानी जी मज्या येयेना तशी मज्या आते एयरकंडीशननी ती बालकनीम्हानबी नई येस! मायन्यान भो कधी!!!) तधय अचानक कोन्हातरी पाय मन्हा हातवर पडताखेपेस मी जोरम्हा आल्लाई उठनू! तसा मन्हा आल्लायेलना आवाज आयकताज मन्हा ताथ्यानी त्या मानूसनं बखोटं धरीसनी त्येले जे दनादन दनादन शेपालनं लाये का नई, ते ईच्यारुज नका!
मनताथ्यानी आन त्या मानूसनी ती झटापटीनी कुस्ती दखीसनी तठला तो गेटकीपर केशव पैलवान पयतच वना, आन मन्हा ताथ्याले, आन मन्हा हातवर पाय ठेवन्हारा मानूसले आन माले थेटरना मॕनेजरनी थेट घर्ना रस्ता धराले लावा. तो आर्धानिरधा सिनेमा सोडीसनी आमीन धाकुलसं तोंड करी घर भिडनूत!
आते हाई झाई तुम्हना आज्ला आन मन्हा ताथ्यानी आक्कलहुशारी, आते मन्ही आक्कहुशारीना हाऊ जबरदस्त नमुना दखा!
ती साले मी भुतेक दहावी यत्ताम्हा व्हतू. हंन्ड्रेड मीटर डॕशम्हा मी नेहमी मी ज्या गटम्हा र्हावू त्या त्या गटम्हा जिल्हाम्हाईन पह्यला नै ते दुसरा नै ते निदान तिसरा तरी ईवूज ईवू! हाई तुम्हले जर खोटं वाटत व्हई, ते तुमीन मन्हा त्या जमानाना ज्या जवयपास ईस पंचीसथीन ज्यास्ती सर्टिफिकटे शेतसना त्या मनघर ईसनी दखीसनी खात्री करी ल्ह्या!
ते मी काय सांगी र्हायन्थू? हां वनं बरका याद वनं! रनींगरेसम्हा शंभरमीटरनी शर्यतना आखरी राउंड व्हता आन तथा त्या स्टेजवर त्या कायना तो कायामटक क्रीडामंत्री नरेंद्र तिडके आन बाकीना डझनभर पाव्हना आम्हनी ती रेस मोठा आवडखाल दखी र्हायन्थात. मी मन्ही ट्र्याक न सोडता पहिला नंबर येवाना जीदखाल जीव तोडीसनी वारानिगत सुसाट पई र्हायन्तू , आसा पई र्हायन्तू जसा काई मन्हामांघे वाघच लागेल व्हता आसं समजी ल्ह्या घडीकभर! आन मी समदासथीन मव्हरे व्हतू बरं! , पन त्या न्यू इंग्लीश हायस्कूल चंद्रपूरना मास्तरनी त्येसनाच श्यायाम्हातला पोर्याना हात धरीसनी तो पह्यला नंबरवरच व्हता आसा बनाव करीसनी माले दुसरा नंबर दिधा. हाऊ आन्याव सैन करानी दुर्बुद्धी मनताथ्यानी माले निरानाम शिकाडेलज नयथी.
वरथीन माले मनताथ्यानत्येसनी ती सिनेमाम्हातली हानामारीनी, फ्रीस्टाईल कुस्तीनी घटनानी याद येताज मी त्या मास्तरनी कॉलरसमेत गच्चीच धरी पाडी भो! मन्हा तो रुद्रावतार दखीसनी, *’काय झालं रे साळुंके? काय झालं?* आसं म्हनीसनी आम्हना कवायतना आंबुलकर सर मनजोगे पयतच वनात, पन मी त्या मास्तरनी गच्ची आन कॉलर काई सोडूज नई. मी आम्हना सरेसले आन रेफरीसले ती शर्यत पुनाईन ल्हेवाले आखेरशेवट भाग पाडंज पाडं!

भावड्यासहोन!
ती शंभर मीटरनी शर्यत पुनाईन व्हयनी आन मन्हा पह्यला नंबर येताखेपेज आंबुलकर सरेसनी माले शाबासकी दिन्ही. त्या स्टेजवर बठेल पाव्हनासनीबी मन्ह जाहीररित्या भू अभिनंदन कयं! तठे जर मनताथ्या र्हातात ते त्या माले डोकावर ल्हीसनी मैदानभर दौडत मिरावत सुटतात! याले म्हनतंस आनुवौंशिकता! पिव्वर आह्यरानी मायबोलीवालासनं खान्देशी रंघत शे आम्हनं हव!
जो जिल्हाम्हाईन पह्यला येस त्येन्ह सिलेक्शन राज्यस्तरीय स्पर्धाससाठे व्हस हाई ते तुम्हले म्हाईतज व्हई. पन तथा पुनाले राज्यस्तरीय टुर्नामेंटम्हा मातर मी काई टीकनू नई, कारनकी मन्ही उंची पाच फुट साडेचार इंज व्हती ती उंचीना मानथीन मी मव्हरे जाऊ नई सकनू. ज्येन्हा पह्यला नंबर वना तो चांगला पावनेसहा फुटना उच्चा पुरा जिवान व्हता. हाई माले नंतर कयनं का तो एकवीस वरीसथीन मोठा व्हता. येजबार व्हता! हाईच गोट जर का माले पह्यलेज म्हाईत र्हाती, ते मी तठेबी झगडी पडतू मायन्यान!
ते दखा भावड्यासहोन आपुनले ह्या खेयेसम्हातलं कितलकबी ग्यान व्हई पन त्येन्हा तधयबी आन आजना जमानाम्हाबी काही म्हन्ता काहीज उपेग नई शे! कारन याम्हातलं जे गंधपटंक राजकारन शे, ते दखीसनी मन्हा जीव आजबी भडकेल उबयानागत निस्ता बयस, पन काय करे?
चला आते शेवट आखीरम्हा त्या नेमबाज सुरेश भावड्यानं कवतीक करूत. त्यानी आजलीले जधय त्येन्हा कास्यपदकनी बातमी लागनी ते ती काय बोलनी? ती बोलनी का, *’माझा नातू घरी परत आल्यावर मी त्याचा मुका घेईल!’* हाई मातर माले आज्याबात नई पटनं भो. नही पटन माले! तिनजागे जर का मन्ही आजली र्हाती ते, ती मन्हा मुक्का ल्हेवाना बदले मन्ही पाठवर दोनच्यार बुक्का हानती बुक्का! कारन, खान्देशी माटीम्हा पैदा व्हयेल जिगरबाज, जांबाज बाई व्हती ती! ती उलटी मालेज म्हनती का, *’तुले मनपोरगानी कर्जमिर्ज काढीकुढी तथा ट्रेनिंगले धाडं ते, हाई कासापित्तयनं पदक जिकासाठे धाडेल व्हतं का? कारे वय गधडा! चाल शिलग व्हय तथा!’
आन ह्या वायबार सरकारले आते उपरती सुचनीका! एक कोटी रुपया जाहीर करानी? जधय मन्हा नातूले चांगलं ट्रेनिंग ल्हेवागुन्ता पैसासनी आन त्येले धीर देवानी गरज व्हती तधय का झोपेल व्हतात का मरीजायजो ह्या मंत्री संत्री?
ते आशी गम्मत शे भावड्यासहोन!श्यायाम्हातला मास्तरेसफाईन ते थेट त्या क्रीडाआधिकारी ह्या बठ्ठान बठ्ठा एकथीन एक भ्रष्टाचारी शेतंस, ज्यासनाजोगे वशिलाना धाक बिक शे आन ज्यासन्हाजोगे बख्खय, म्हामूल पैसाआडका शे ना, त्यासनीज ह्या खेयेसम्हा, राजकारनम्हा आन साहित्यक्षेत्राम्हा उड्या ल्हेवो! बाकीनासनी ह्या तुम्हना शिवाजीआप्पानासारखं उगंमुगं चुपचाप एकठायके बठी र्हावो!*
चला ते मंगन भेटूत आसाज कधयमधय! मन्ह पित्त खवयनं तधय!
तुम्हनाज
शिवाजीआप्पा साळुंके
गाव तेच बिनकामनी चावय करनारेसनं हाई च्याईसगाव! आन उठसुठ कोन्हावरबी जयनारेसनं ते तथा पलं ते, जयगाव
आन आते तुमीन समदानसमदा खा पी के चुपचाप सो जाव!