आखाजी सण आते बुध्दस्ना सण नही शे.म्हणीसन यानामाइंन बाहेर निघा Khandeshi Akhaji
आखाजी सण आते बुध्दस्ना सण नही शे.म्हणीसन यानामाइंन बाहेर निघा Khandeshi Akhaji
खरच आखाजी सण हावू आतेनां नवबौध्दना सण नही शे. पण बुध्दना तत्व अनुसरनारा पुर्वजस्ना हावू सण शे…..
शंकर -पार्वती या मुलनिवासी देवगणस्नी आराधना करनारा लोकस्ना सण शे.
हजारो वरीस पुर्वीना सुजलाम सुफलाम तापी खोराम्हाना खान्देशम्हा जवय परप्रांती वूनात तवय त्या नंतर खान्देकरस्वर रामायण महाभारतना प्रभाव दिसाले लागना. पण हजारो वरिसपाइन तेस्ना आराध्य म्हणजे शंकर पार्वतीच! कारण कधीकायले खान्देशना मुख्य भाग असनारा वेरूळन्या बौद्ध लेणी सोबत भव्य कैलास लेणी साक्षले शे.

हावू “आखाजी” सणनी संस्कृती पाच हजारपेक्षाबी जास्त पुराणी संस्कृती शे. या सणनां आराध्य देवत या शंकर गौराईज शेतस. कारण इतिहास संशोधकस्नी हायी सिध्द करेल शे की महाराष्ट्रनी प्रगत शेतीनी सुरवात १ लाख वरीस पहिले खान्देशना तापी खोरामां सूरू व्हयनी व्हती. या भागमां शेतकरी वसाहती होत्यात. खान्देशवासीस्न दृष्टीथी महत्वानी गोष्ट म्हणजे “सावळदा (शिरपुर -धुळे मार्गवर) आठे हडप्पन कायनी संस्कृती विकसित झायी आणि ती सावळदा संस्कृती म्हणीसन ( इ.स. पुर्व २२०० ते १८००) म्हा प्रचलित व्हयनी . या कायम्हा खान्देशनी एक स्वतंत्र संस्कृतीनां उदय व्हयना.आसा ऐतिहासिक वारसा प्राचिन काय पासून धुये – नंदुरबारले लाभना. खान्देशना लोक प्रगशील शेतकरी व्हतात. त्यास्नी आपली स्वतंत्र संस्कृती होती. त्या फक्त निसर्गले आपला विधाता मानेत. म्हणीसन खान्देशना सर्व समाज शेतीनंसंगे जुडेल सणवार साजरा करेत .

बैल-पोया, भालदेव-भाद्याना सण, कानबाई , गुलाबाई आणि या समदास्तुन महत्वाना सण म्हणजे “आखाजी” पुर्वजस्ले याद करी तेस्ना स्नेह , आशिवाद ,शिकवण आठयीसन आपल एकत्र कुटुंब, परंपरा संस्कृतीना वारसा आपली पुढली पिढीलेबी भेटो. म्हणिसन सगळ कुटुंबले एकत्र करी आपला पुर्वजस्ले याद करी आमरसपुरीनी घास आंगारी करेत. यान्हमांगे कोणतीच अंधश्रध्दा नव्हती. आख्खी विधी त्या अन्नधान्य वापरीसन करेत.
त्या कायले वह्या पेन्सिल मोबाईलना जमाना नही होतात. पण आपली नवी पिढीले आपला वाडवडीलस्न नावे आणि तेस्नी परिवारसाठे देयेल योगदान नवी पिढीले समजाले पाहिजेल, याद राव्हाले पाहिजेल यासाठे घरना समदा धाकला मोठास्ले एकत्र करीसन चार पाच पिढीस्न नाव व तेस्न कार्य याद करी करी घास आंगारी टाकेत.
जो पर्यंत या आपला वाडवडीलस्नी आपली परंपरा संस्कृती जोपासी तो पर्यंत घरलेघरपण होत. संस्कार संस्कृती होती. आणि आतेनी पिढीले बापना बाप कोन आणि गावशिव सुरत , मुंबई ,पुणे सारखा शहरस्न शिवाय दुसर काही सांगता येत नही. त्या कायन्हा मायबाप, ती पिढी पुस्तकी साक्षर नव्हतात . पण बुध्दिमान होतात , धोरणी होतात म्हणीसन एक पिढी कडथाईन दुसरी पिढीले चांगली परंपरा संस्कारनी शिदोरी या सणवार साजरा करत देत गयात.
पण जो अस्सलपणा होता तो कमी व्हत गया. जसा दुश्काय, गरिबी वाढनी तसा सुखनी लालसाम्हा “निसर्गनी नैसर्गिक वाट चुकत अंधश्रध्दाम्हा ३३ कोटी देवस्ना पाय धराले लागनां. पण हायी त्रिवार सत्य शे आजबी खान्देशकरस्ना मुख्य सण आखाजीच शे आणि आजबी हावू सणले आपला पुर्वजस्ले याद करतस आणि शंकर पार्वती-गौराईनीज आराधना करतस!
बुध्द म्हणजे काय जेनी दुःखवर विजय मिळावा. आणि त्यासाठे तेस्ले जे ज्ञान प्राप्ती व्हयनी तेन्हां सदउपयोग तेस्नी आख्ख विश्वन कल्याणसाठे कर. बुध्द न्हा धम्म म्हणजे काय ? धम्म म्हणजे बदल आसा बदल स्विकारानं की जेन्हमुळे आपला सकट आख्ख विश्वनं कल्याण , हित होनार शे .त्या त्या चांगल्या गोष्टी ज्यामुळे मैत्री , प्रेम भावना वाढनार शे. शांतताता नांदनार शे. जे करामुळे कोनंही कोनता प्रकारनं आर्थिक , मानसिक , शारिरीक नुकसान ‘कोनताबी माणोस, पशु प्राणी, निसर्गानी होणार नही शे. तर ज्या परंपरा संस्कृती चालिरीतीस्मा या गोष्टी शेतीस तो म्हणजेच धम्म!
आणि महत्वानं म्हणजे हजारो वरीस पासून आपला खान्देशना माणोस हावू निसर्गनी आराधना करनारा होता. म्हणीसनज खान्देशमां बौद्ध धम्मन्हा प्रभाव जास्त होता.
(आते प्रश्न आसा की आस कस काय?)
आज आपले खान्देश माहित शे तो फक्त साडे तीन जिल्हा पुरताच.
आणि *सरकार दरबारी खान्देशले उत्तर माहाराष्ट्र करी टाक . त्यांम्हा जिल्हा शेतस धुये, जयगाव , नंदुरबार , नाशिक आणि अहमदनगर.
पण खरा खान्देश या पाचही जिल्हा आणि गुजरातना काही भाग आणि मध्य प्रदेश व मराठावाडाना काही भाग पर्यंत आसा मोठा भुभागमां पसरेल होता. पण खान्देशना तुकडा तुकडा तोडी तोडी दुसरा भाग मोठा व्हयी गयात…..असो .हावू विषयवर माल्हे सविस्तर लिखानंज शे….
तर विषय आसा शे की इतिहासमां नोंद असनारा खान्देश भागमांज बौध्द लेण्या ह्या जास्त बांधायन्यात आणि ह्या बौद्ध लेणी पहाडमां कोरनारा हा लोहार , सुतार , महार, चमार,माळी , कोळी ,कुणबी, भिल्ल,पावरी,कुंभार…आसा ह्या काम करनारा बारा बलुतेदार होतात.या लेण्या उभ्या करासाठे हजारो वरिस पयले या सर्व समाजन्या पिढ्यानी पिढ्यास्नी योगदान देयेल शे.
त्यामुळे आजना नवबौध्द हावूच बौद्ध आणि धम्म पायनारा शे आस नही शे जे जे चांगल आणि मंगलमय करनार , विश्वशांती , भाऊबंधकी वाढावासाठे योग्य असेन ते स्विकाराव. त्या गोष्टीस्ले वैज्ञानिक दृष्टीथीन स्विकारा . मंग तो कोणताही सण आसो की परंपरा !बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले एक महत्वानी गोष्ट सांगी गयात. “शिका आणि संघटीत व्हा!
पण आपण निस्तच पुस्तक शिकनुत, संघटीत होवांन मात्र सोडीज दिन्ह, समदा बहुजन समाजनी आणि त्याम्हा पुढाकार खान्देशना लोकस्ना….म्हणीसन देश स्वतंत्र होवाले पंचाहत्तरी ओलांडी राहयना .पण समदा भागस्तुन खान्देश आज अविकसितज राहेल शे. कारण आम्ही जात पातम्हाज अडकेल शेतस. फक्त मंन्हा भागनी बोली म्हणजे अस्सल अहिरानी मिरावामांज आम्ही मगन शेतस,आस म्हणत साडे तीन जिल्हा उरेल खान्देशलेबी “बोली वादमां दिड जिल्हानां खान्देश करी राहिनूत.
फक्त बोली-भाषा वादम्हा राव्हा पेक्षा सध्याना पाचही जिल्हास्ले अखंड *खान्देश भाग म्हणीसन व्यवहारम्हां येवो यासाठे खरा प्रयत्न होवाले पाहिजेल. कोकणले कोकण, विदर्भले विदर्भ म्हणतस .तर शासन दरबारम्हा खान्देशले उत्तर महाराष्ट्र काबर म्हणतस? यासाठे खरा प्रयत्न होवाले पाहिजे. शेवटी खान्देशनंसंगे आपली नाळ जुडेल शे.त्यासाठे खान्देश अहिराणी कस्तुरी मंच प्रयत्नशील शे. आपला खान्देश हावू स्वाभिमान जपत समदास्नीज एकोपाथीन काम करानी गरज शे.
माणूसकी हावूच फक्त धर्म शे.
चांगल कर्म हावूच खरा धम्म शे.
माल्हे प्रिय शे मन्हा वाडवडीलस्नी संस्कृती, मन्ही मायबोली! भलेच तिन्हा लहेजा येगयेळा असतीन!
लेख मनोगत मांडनारी- *विजया सुरेश मानमोडे
अध्यक्षाः खान्देश अहिराणी कस्तुरी मंच पुणे महा.राज्य
मो. नं. 9823113177