अहिराणी कविता
नवं आखा रे धोरनं
आठे तठे पानी पानी
नही खान्देसम्हा पन
पानी साठी फिरतस
आम्ही बठ्ठा वनवन॥धृ॥
पानी बिगर जीवन
नही जीवन मरन
जुनं पानं सोडी द्या रे
नवं आखा रे धोरन॥१॥
नवं आखाले धोरन
एक व्हा रे बठ्ठा जन
अन्न जल पुरोठाना
बलावा रे मंत्रीगन॥२॥
पानी येस आणि जास
त्याले नही आडकन
पानी आडावाले बांधा
नवा तलाव धरन॥३॥
पानी साठी एक व्हारे
धरी बसा रे धरनं
चित्र देखा रे पुढेनं
पानी बिगर मरन॥४॥
निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
ahirani kavita
पानी पाहिजे येवाले
लागी कितला टाईम
तुले पाऊस येवाले
देख जीवन आम्हनं
आत्ये तुन्हाच हवाले॥धृ॥
भोया भाव लोकेसना
देख लागना व्हावाले
लोटा भरी भरी पानी
दगडना देवताले॥१॥
ज्यानी डोकावर धरी
आख्खी गंगा नी धाराले
लोटा भर पानी आखो
त्याले लागस कसाले॥२॥
देख धरती मायले
भेगा लागन्या पडाले
जित्ता जीवले बी पानी
आठे नही से पेवाले॥३॥
ऐन उंढायान्या देख
ऊन तान न्या झयाले
सव दिनम्हा भेटस
पानी नयनं पेवाले॥४॥
पानी आडवा जिरवा
जोतो म्हने याले त्याले
पानी आडावाले पन
पानी पाहिजे येवाले॥५॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जि.जयगांव.