कईताना मथया ahirani shayari on life
(हाई आपला भारतम्हातली हारेक माय-बहीननी करम कहानी मोठीच न्यारी से!
सौंसाररुपी घट्याम्हा भडलाई, चुरडाई निंघस ती ह्या भारतनी नारी से!!)
(कईताना मथया)
काय मन्हासाठे कयं ते ते सांगा?
आस्तुरी म्हने तिन्हा दादल्याले!
काय मन्हासाठे कयं ते ते सांगा?
मंगयपोतबी से फुटका मनीसनी!
दोन सरीसना कच्चा काया धागा!!
…..काय मन्हासाठे कयं ते ते सांगा?
कप्पायनं कुकू तुम्हनाज नावनं!
तुम्हना आंड्रोसले पोटम्हा मीच ते वागा!!
जीवम्हाईन जीव काढी हातम्हा दीधा!
सांगा मन्हा कैवार कोन्ही ल्हिदा?
…..काय मन्हा साठे कयं ते ते सांगा?
वावर-मयाम्हा राब राब मी बी राबनू पन
सातबारावर बाप नि आजलाच लावा!!
घर दारवर नई हाक्क कौडीना दावा!
करु मी सांगा आते कोन्हा धावा?
…..काय मन्हासाठे कयं ते ते सांगा?
लेक्रेबी सेतस तुम्हनाच नावना!
मी ते निस्ती नामधारी से सो.चंद्रभागा!!
कोन्ही मन्हासंगे कसंबी वागा!
मार ठोक करीसनी स-याले टांगा
…..काय मन्हासाठे कयं ते ते सांगा?
दोन टाईमना मेंगडलाना साठे!
चुल्हाजोगे जलमभर हात मीच बाया!!
दिवसले राबीसन वर रातलेबी उजाग्रा!
तरी जथा दखो तथा तुम्हनाच गाजा-वाजा
…..काय मन्हासठे कयं ते ते सांगा?
म्हनाले ते, मी से आर्धांगिनी तुम्हनी!
नावनी लक्षुमी झाडानी झाडनी जसी!!
हातवर भलेज नाव नवरानं गोंदा
तरी बाईना माज पानीम्हान बुडता डोंगा!
…..काय मन्हासाठे कयं ते ते सांगा?
पर्नीसन लयनात वज्जी थाटमाटम्हा!
खकाना कया आख्खी जिनगानीना!!
सवासिनपनेज मिटोत ह्या डोया!
यान्हाथीन दुसरं काहीच नको देवबाबा!
…..काय मन्हासाठे कयं ते ते सांगा?….. सांगाना?
शिवाजी साळुंके, ‘किरन’
हल्ली मुक्काम- C/of गणेश साळुंके,
शिव श्रेष्ठ कॉलनी अशोक नगर, नासिक.
(फासीना डोंगरजोगे, फिल्टरटँक नासिक)