अहिराणी भाषा कविता माय

अहिराणी भाषा कविता

  माय अहिराणी भाषा कविता

माय म्हणजे काय र्हास….?
माय म्हणजे मायच र्हास ……
कोण म्हणे दूधनी साय…
कोण म्हणे इठ्ठलना पाय…
कोठे दिसें वाढगानी गाय…
पण मी सांगस….
माय म्हणजे मायच र्हास…..
उब्याना धाकम्हा सायसुद्धा चटकी जास…
दोन्ही सांजा माय चुल्हाले लटकी जास…
नदारीनापाये तठेसुद्धा खटकी जास…
तरी पीठ रगडस माय …
कणीकोंडा,दाय-साय…
म्हणे  उधारीले   हाय… कारण….
माय ती मायच र्हास….
जव्हयं….
आभायनी इन्ज धाबाव्हर पडे…
मावठीना खाम चिताव्हर चढे…
पपनीले बिलगी जीन्हं नशीब रडे…
ती अभागीन दादा…
कोन्हीतरी मायच र्हास…….
ती आनपूर्णाना हात र्हास…
ती देव्हारानी वात र्हास….
डोया टपकणारी झडीनी रात हुई ती…
पण
लेक्रेसले पखाम्हा लिसनी उब देणारी,
ममतानी जात र्हास माय…..
माय म्हणे काय….?
अरे माय म्हणजे मायच र्हास…
माय   देवथून  मोठी..
मान्य   करतस   देव……
तीन्हा पायजोगे देखा
दीसी  तिर्लोकनी ठेव…..

कवी  प्रकाश जी पाटील (पिंगळवाडेकर)

अहिराणी भाषा कविता
अहिराणी भाषा कविता माय