अहिराणी बोली कविता मन
मन आसं मन तसं
नही दिसत व मन
तरी कशी मी नाकारु
मन देखस सपन
आशा म्हनस साकारु॥धृ॥
मन पाखरु पाखरु
म्हने आभायम्हा फिरु
येस फिरी फारीसनी
जसं धाकलं लेकरु॥१॥
जास इतलं बी दूर
याले कशी मी पुकारु
कशी पुकारु नि कशी
याले हाका बी वं मारु॥२॥
मन सारखं न व्हस
मंग लागे कुरकुरु
कशी याले समजाडू
उमजेना काय करु॥३॥
मनमानी तसा धंदा
कधी म्हनस व करु
कधी मानी ल्हेस कधी
रागे म्हनस वं भरु॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.