खान्देशी अहिराणी कवीता अहिराणी कवीता त्या दिन ग्यात माव्वी
त्या दिन ग्यात माव्वी
जसा बुडबुडा येस
दम कोंडीसन वऱ्हे…
उनी आठवन तसी
कसं दीऊ तिले तऱ्हे……1
डाव दिखस डोयाले
फिस्कं गये जरी साव्वी..
येस आंगव्हर काटा
दिन ग्यात जरी माव्वी….2
रोज गांजायेल भूक
कशी आतडास्ले खेटे…
थंडा पडेल चुल्हाम्हा
न्हई सनकाडी चेटे…… 3
सदा कावकाव करे
पोटम्हाना भुक्या हाड्या.
त्येना आवाजले भ्यायी
आखडेत सम्द्या नाड्या..4
काय भेटे कन्टोलम्हा
कारटले,किलो..किलो…
ज्येले खायेना डुक्कर
आसं भेटे ईलो..मिलो… 5
व्हये गावम्हा कत्कार्य
उष्ट जाये डालकाम्हा…
तरी नदारीनी ख़ुशी
दौड धरे त्या बल्काम्हा…6
न्हई पोटले तुकडा
न्हई चटणीले तेल…
सदा आसूस्लेबी र्हाये
दोन्ही डोयास्मा रे जेल.. 7
आग थंडी करासाठे
बासी तुकडा भुंजेत…
कोपराम्हा बसी बसी
कसा पोटले पुंजेत…. 8
सरी ग्यात त्याबी दीन
कुत्रं ढुके ना तुकडा…
कन्टोलम्हा नदारीनी
लावा सर्कारी उखडा….9
कवी
प्रकाश जी पाटील.
पिंगळवाडेकर.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मा.प्रकाशदादा पाटील पिंगळवाडेकर सन्मानित कवी प्रकाश जी पाटील
संमेलन नगरी अमळनेर आठवनी मनी धरती फेर Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2024 यालाच तर मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते