अहिराणी रचना विडंबन बदल
बदल एक विडंबन
काल्पनिक अहिराणी रचना
मजुना डोळा नवा तमाशा , कायं कायं घडत राही
गावगाडा ना पाटील तात्या, गावमा दखात नही
मायले माय बापले आण्णा , कुणी म्हणत नही
मायले मम्मी बापले डॅडी , त्यासले काय कळत व्हई
कडा गयात पाटल्या गयात , हात भोंगळा राही॥
हातभर चुडा पायमा तोडा, गावगाडा मा दखात नही
एक घरणां दोन दारं, कधी व्हयेत नही
शिकेल ताईबाई वणी गावमा , घर दारमा झगडा लाई
डोकावरं पदरं घरणां आदरं, कुकुले मान राही,
कुकु गया टीकली वनी कपाळले दखात नही
खोड गये झाड गये , आंबानी आमराई गई
चिरेबंदी वाडा मामा ना भाचाले दखात नही
कदर व्हती व्हता आदर , कधी बांगडीनी किन किन नही
नवी पीढी शिकेल जमाना, रोज तमाशा राही
मोठीमायं मनी मोठमायं , काकू बायजा राहीनी नही
गावगाडा ना जुना माणूस , तात्या दखात नही
गावगाडाकार साहेबरावतात्या नंदन ताहराबादकर नाशिक