अहिरानीमायना जागलकरी भावड्या
भावड्यासहोन नमस्कार!
आज मी भू दिवसना बादम्हा जराखा न्याराच विषयवर तुम्हनामव्हरे मन्हा
आपला खानदेस भागनी जवयजवय दहा बारा भाषासनी मिईसनी बनेल हाई अहिरानी मायबोलीना बाबतम्हा बोलाले हिम्मत जुगाडी र्हायनू.
तुमीन महाराष्ट्र, गुजरात मध्यप्रदेश, छत्तीसगड, मराठवाडाफाईन ते पार तथा तेलंगना, आंध्रप्रदेश, तमीलनाडू आन कर्नाटकलगून भिडी जायेल दखावतंस माले. दखावतंस आसं मी दावाखाल यान्हासाठे म्हनस का मन्हा आंडोर, व्हवू आन नातूबी तथाच स्थाईक व्हई जायेल शेतस. त्या जव्हय आम्हनासंगे बोलतंस आन विडियो कॉल करतंस ते त्या पिव्वर आहिरानीम्हानज बोलतंस आम्हनासंगे, नि तथा सिंगापूर, लंडन, पॕरीस, अमेरिका, रियाद आन दुबईफिबईम्हानबी आपली अहिरानी मायनाच डंका वाजी र्हायना. हाई, मी तुम्हले बठ्ठास्ले डंकेकी च्योटपर कहता हूँ! हौ
भावड्यासहोन मन्हा लिखाम्हा आश्या समद्याच भाषा लिखाले माले आवडतीस. कारन माले ह्या समद्या येरायेरन्या बहिनीससारख्याच वाटतीस. मन्हा आमेरिकाले र्हास तो नातू आम्हनासंगे आर्धा आर्धा तास अहिरानीम्हाज चावयस-बोलस आन फेसबुक, व्हाट्सअपना पाटलावर अहिरानी इन टू इंग्लीश, इंग्लीश इन टू अहिरानी (Ahirani-cum- English) पटंपटं लिखंसबी तो!
बरं ते जाऊद्या तथा पन कालदिनफाईन मी आपली मायबोली अहिरनीना उठसुट पाटा पाडन्हारा आसा कितला पाटा (पाटला) शेतंस हाई मोजी र्हायनू पन सली त्येसनी टोटल काही माले नेम्मन कराकरी लावता ई नई र्हायनी!
आपीन आते आसं करुत! त्या पाटलासवर म्हना का त्या ग्रूपेस्वर म्हना एक नजर भवडाईच ईवूत बरं! चला ते मंगन व्हा रेडी!
त्या पाटलासना ज्या कोन्ही जवाबदार अॕडमिन बिडमिन जर व्हतीन ते त्येसनी मन्हासंगे हुज्जत-बिज्जत आजिबात घालानी नई, हाई मी तुम्हले समदासले पह्यलेन पह्यलेच हात जोडीसन जताडी देस हौ!
हां चला त्या पाटलासना नाये दखा।
१) मन्ही खान्देश वाहिनी. (नेम्मन वाचज्यात. वाहिनीले वहिनी नका समजज्यात)
२) खान्देश भूषन समाज भूषन.
३) अहिरनी कस्तुरी परिवार.
४) अहिरानी बोली.
५) कानबाई /कुलदेवी/जत्रा.
६) शेकोटी अहिरानी कवी संमेलन.
७) २०२३ खानदेश महोत्सव.
८) खान्देश साहित्य संमेलन २०२२.
९) खान्देश साहित्य मंच.
१०) खानदेश साहित्य संघ काव्य.
११) खान्देशी रेड्यु.
१२) आगामी अखिल भारतीय अहिरानी संमेलन.
आझून मन्हा दोन खटला (बायका नका समजज्यात बरं! तुम्हनी मावशी एखलीच सग्गीसम्हातली सग्गी बायको शे माले हौ!
१३) परिमल साहित्य कला मंच.
१४) शिवाजी साळुंके, चाळीसगाव, जि. जळगाव.
ह्या ज्या खालना दोन पाटला सेतस ना, तेसनावर कोन्हीज अहिरानी साहित्यप्रेमी अहिरानी साहित्य चुकीसनबी धाडतंस नई, हाई गोट मात्रम न्यारी शे बर का! त्येले जवाबदारबी मीच शे!
सलं! एखांदी गोट पटाडी सांगालेबी वज्जी कुटाना करना पडंस याने की बहुत पापड बेलने पडते है! बोलो हैना?
आते खासम खास मुद्दानाकडे तुम्हले मी बागे बागे बागे ल्ही चालनू.
मुद्दा आसा शे का ह्या नारा नारा जितलाबी खटला शेतसना ह्या वज्जी भारी शेतस! आपली मायबोली अहिरनीना खराखुरा जागलकरीच शेतंस आसं समजी ल्याना तुमीन. आन यासम्हा निसता लिखन्हाराच शेतंस आस नई शे! ह्या बाल कलाकार, नैतरना, आरदवयना, गायक, लेखक, कवी, गझलकार, लावनी लिखन्हारा, त्याले नैतरन्या पोरीसले नाचगानाम्हा, तालसुरम्हा बठाडनारा दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, संगीतकार, नाटककार, मिमीक्री कलाकार, किर्तनकार, भजन करन्हारा, गोंधळी, तो पोयतंवाला दासभो प्रवीनदादा माळी, शिव कथाकार डॉ.सदाशिव सूर्यवंशी, सुमाषदादा अहिरे, आप्पासाहेब विश्राम बिरारी, रमेशदादा सूर्यवंशी अजय बिरारी कुमावत भावड्या, आसा एकथीन एक शेरले सव्वाशेर रत्तन, मोती हिरासनी जसीकाय खानंच शेना हो. शिरपूरवाला चौधरी दादानत्यासनी ते स्पेशल मनोरंजन पार्टीच शे!( समदा नाये वुना नथीन त्येसनाबी नाये शेतंसच आसं समजी ल्या.)
यासन्हाबाराम्हा मी काय बोलू हाईच माले सुचत नई!
ह्या समदाना समदा कोनताना कोनता खटलासम्हा सक्रीय शेतसच शेतंस! एकते गुतेल तरी शेतंस नई ते गुताडी तरी देयेल शेतंस!
ह्या बिलंदरेसनी नजर दाट झुडूपम्हा दपी बठेल वाघनामायेक भल्तीच तेज शे! यान्हा आंदाज लावनं भू म्हंजी भू कठीन शे हो! भूच कठीन शे! मायन्यान भो!
तिरोन सात तारीखले मी च्याईसगावना पलाटफारम नंबर दोनवर एक भावड्याले जाता येता प्रवासी गाडीसम्हातल्या प्लास्टीकन्या पिसोड्या सोडीसनी त्याम्हातलं जे उरेल सुरेल उस्टमिस्ट आन्न काई त्या फयेमिये आस मस्तपैकी रावबहाद्दरना ठठाराम्हा खाताना दखं, आनी मन्ह टक्कोरं गयं फिरी. मी त्येन्हावर भारतना विकास हावू लेखच लिखी काढा. सात तारीखनी रातले लिखेल लेख रातभर लिखत र्हायनू, त्येले सुधारत सुधारत मस येय व्हई गयंन्था. आखिरशेवट तो लेख मी फेसबुकवर आन व्हाट्सअपवर वाटे लाई दिधा. दुसरी रोज आठ तारीखले दखस ते खान्देश वाहिनीना पाटलावर तो लेख मन्हा मव्हरे ऐटखाल हुबा दखावताच तो लेख छापी काढन्हारा भावड्याना आभार कसा मानो हाईच माले समजेना. आहो तारीखबी पलटनी नई व्हती ना! तिरोन ते तिरोन बैजू आजबी माले तसाज आनभव वना! नानाभाऊ माळीना लाह्या हावू कवितासंग्रहवर चार सब्दे काय लिखात, ते त्या भावड्यानी लगेजना लगेचच दखल ल्हीसनी छापीबी काढं ते समीक्षन! आते माले तुमीन एक सांगा का आपलाकडे दररोज कितला पेपरे येतंस? आन त्या पेपरेस्म्हा महत्वान्या बातम्या जर सोड्यात, त्या लाच ल्हेनारा-देन्हारा, चोरी चपाटी करन्हारा-करु देन्हारा, मंत्री संत्री खासदार-आमदारेस्न्या हागेल-मुतेलन्या वायबार बातम्या सोड्यात ते काय दम र्हास त्या पेपरेस्म्हा?
तठे आम्हनासारखासना एखांदा तरी लेख दखावस का? म्हनीसनी ह्या अहिरानीमायना या जागलकरी भावड्यासले मी एक नंबर देस. का त्या दिन दखतंस नई का रात दखतंस नई. त्या झुडूपम्हा दपी बठेल वाघ सारखा जागता पहारा ठीसनी कोन काय आन कसा लिखी र्हायना यान्ही नेम्मन दखल ल्हीसनी त्येले प्रसिद्धी दी सनी सार्वजनिक करतंस! आवढं मोलनं काम करन्हारा या बठ्ठा भावड्यासले मन्हा मान सन्मानना मुजरा करंस! आरस्तोल करंस!!
आज नानाभाऊ माळीना ढिंडरं फुंडक खाईससनी डेडोरना मायेक फुगीसनी गधडा हाकली या हो! हावू कितला मज्याना लेख टाकेल शे. आन तो दुसरा लेख दखाना पोट फाटे आन मया सुटे!याले म्हनतंस एखांदी भाषाले हुबारी देवानी धम्मक!
बरं भावड्यसहोन तुमीन तुम्हनी हाई अहिरानी मायबोलीनी सेवा आशीज रातदिन सुरु ठेवा. दखा एक दिवस आसा ई का ह्या सरकारले आपली अहिरानीमायनी दखल ल्हेनी पडी म्हंजे ल्हेनीच पडी. आन आपली अहिरानी मायनं अखिल भारतीय अहिरानी साहित्य संमेलन सोता पैसा खर्चीसन भरावनच पडी!
बंरं भेटूत आसच कधय मधय!
अहिरानी मायना जागलकरी भावड्यासना पाटलावर!
शिवाजीआप्पा साळुंके,
च्याईसगाव, जि. जयगाव.
मायबोली अहिरानीना जागलकरी भावड्यासहोन काय बिलंदर शेतस रे बाप तुमीन! मी नानाभाऊ माळीदादाले फोन करीसन तुम्हना म्होरक्या का परमुख, टंकलेखक, नईते संपादक, आयोजक कोन शे त्येसना माले मोबाईल नंबर धाडी द्म्हनतं.नानाभाऊन त्यासनी नंबर धाडाना पह्यलेच मी हाऊ लेख पोस्ट करी दिधा. तुम्हना आभार मानाना पह्यलेच तुमीन तो डायरेक छापी काढा! शेतंस बाप धन्य शेतंस तुमीन !
खूप चांगल काम करी राह्यनात भाऊ तुम्हीन,
मी गुजराथ बदोडामा ऱ्हास, माले अहिराणी खूप गोड लागस्, माय सारखी माया से अहिरणीमा.
मूळ ते कृष्ण भगवान नी भाषा से त्यामुये ज्यास्तस गोड से.
आपला लोक सुधरी ग्यात अस दाखाडाले मराठी मा बोलतस, त्यासले अहिराणी बोलाले लाज वाटत.
तुमिन चांगल भारी काम करी राहेनात सेत. मना अभिनंदन से तुमले.
रामराम