मन्ही तापी मायना आटाई ग्यात आसु

मन्ही तापी मायना आटाई ग्यात आसु

खान्देशी अहिराणी कविता

मन्ही तापी मायना’
आटाई ग्यात आसू,

बराच दिन्हम्हा तापीना पान्थाले,
भेटनं माल्हे जावाले,
मन उसाई गे .देखीसीन,
करु ते काय करु,से उदासिन.१

तिन्ह भर हिवायाम्हा,
सुखायल पात्र देखीसीन,
कथी गयी मन्ही तप्तीमाय,
जी उंढायामाबी व्हाये जोरबन.२

आत्ते जोगेथून देखं ते,
जशी रस्ताना बाजूनी,
वावरम्हा व्हास तशी,
थयी व्हायी रहायनी!३

सुकायेल नदी लडी रहायंथी,
पानी भ्यात भ्यात उरेल,
रेती चोरायेल,पात्र चोरायेल,
म्हनून तिन्हा आसूभी आटेल.४

पानी कथं मांघे आडायी गये,
कोठे कोठे झाडेच तोडी टाकात,
मंगन काय ,पानी आथं येस,
बाकी तथ ,ती रहास धापा टाकत.५

पावसाया सरत नही तव्हलोंग,
डांगरटरभूजना मया पूरत पानी,
तिन्हाम्हा राहथ नही,
दखी मन्ही वल्ली व्हायी गयी पापनी.६

मयत जावो ते तोंड धोवाले,
तरी भेटे तापी मायनं,
थोडंफार रेतीम्हा आटकेल,
रेती चोरेस्ले तेबी नयी व्हत सैन.७

मन्ही तापी माय,धाय मोकलीसन ,
लडूबी नयी सकत,
मानूसनी बुध्दी भ्रष्ट व्हयी गयी,
सुधरानं नाव बी नयी लेत.८

कोल्ला आसू मायना डोयाम्हा दखीसन,
माल्हे गयरं गलबली उनं,
श्यानासुरतासले समजो म्हनून,
तिन्ह दुख माल्हे लिखनं पडनं ९

मझिसु प्रा.मगन सुर्यवंशी..

पातोंडा[अम्मयनेर]ह.मु.डोंबिवली.

1 thought on “मन्ही तापी मायना आटाई ग्यात आसु”

Comments are closed.