अहिराणी सन्मान दिन आदिमाया बहिणाई

अहिराणी सन्मान दिन आदिमाया बहिणाई

आज ३ डिसेंबर खान्देश रत्न बहिणाबाई चौधरीस्ना स्मृती दिन. मन्हा कडथाईन, खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र कडथाईन, खान्देशनी वानगी त्रैमासिक कडथाईन तसज अहिराणी भरारी ग्रुप कडथाईन बहिणाबाईनी पाक पवित्र स्मृती ले नमन.

आदिमाया – बहिणाई


‘ यडीमाय ‘ हायी कविताम्हा बहिणाईनी आदिमायान गाण गायेल शे.माले तं वाटस ती आदिमाया म्हंजे खुद बहिणाबाईज शे.बहिणाबाईना वाटाले दुख उन,अडचणीस्ना डोंगर उभा -हायनात मातर ती बया डगमगनी नही.
इडापिडा संकटले देन्हा तुने टाया
झाल्या तुझ्या गयामंधी नरोडाच्या माया
अशी कशी येळी वो माय अशी कशी येळी ?
बहिणाबाई यक आंगठेबाज खेडूत बाई व्हती.काव्य कविता म्हंजे काय हायी तिले माहीत नव्हत.तरी तीन्ही ह्या गाणा कसा रचा व्हतीन ? कसा गाया व्हतीन ?
बरम्ह्या इस्नू रुद्रबाळ खेळडूले वटी
कोम्हायता फुटे पान्हा गाण आल व्होटी
आशी कशी येळी वो माय,आशी कशी येळी ?
लेकरवायी माय आपला लेकरुले पोटशे छातीशे लावस त्याना समधा आंगवरथाईन हात फिरावस.म्हंजे आम्हायस कोम्हायस तव्हय आपीआप तीले पान्हा फुटस,तिना तोंडवाटे गाण बाहेर पडस.गड्या हो सांंगा मंग हायी आदिमाया बहिणाबाई नही तं कोण शे ?
नशीबाचे नऊ गि-हे काय तुझे लेखी?
गि-हानाले खाईसनी कशी झाली सुखी?
आशी कशी येळी वो माये,आशी कशी येळी?
बहिणाबाईना आंडोर सोपान चौधरीनी तीन्ही कथा सांगेल शे.बहिणाबाईना नशीबम्हा सासरे गरीबी उनी,आईना तरोनपनम्हा घरधनी साथ सोडी देवघर गया.ह्या गि-हा नहीत तं काय सेत?मातर हायी बायी ह्या गि-हासले बी उरीपुरी निंघनी.म्हनीसन बहिणाबाईज आदिमायाना अवतार शे तिले मन्हा मनोमन दंडवत.
जयगावं पासीन एक कोसवर आसोदे हायी गावं शे.तठला महाजन घराणाम्हा बहिणाबाईना जनम व्हयना.तिन्हा बाप उखाजी महाजन मोठी जमीनदार आसामी.
गावामधी दबदबा बाप महाजन माझा
त्याचा काटेतोल न्याव जसा गावामधी राजा
सदा आबादी आबाद माझ आसोदं माहेर.

मन्ही बहिना
मन्ही बहिना