रामलल्ला

रामलल्ला


ईके बजारम्हा दाढी
मन्हा रामजींना झेंडा…
त्येना कायेजले ढुसी
मारे कुरापती गेंडा ……….1

अरे, दाढीवाला मियाँ
झेंडा रामजीना ईके…
कशी दिशाभूल करो
दुन्या तुन्हाफाई शिके……….2

पानायेल डोया देखी
त्येना थरथरे व्हट…
दिसें वारगानी दिशा
लावा सबूदले वट……….3

दौड वारगानी देखी
नाचे डोकाव्हर शेंडी…
कान गिलकाना फोडे
भर बजारम्हा भेंडी……….4

पूसं पपनीनं पानी
बोल उमटना खोल…
जाणे आतडीना धर्म
फक्त बलकानं मोल……….5

न्हई भाकरले ठाव
रंग धरमना आठे…
रंगे आतडीना संगे
फक्त ढेकरना साठे……….6

भरं झेंडा ईकी पोट
करे मेहर्बानी लल्ला…
देस आतडीले घास
मन्हा तोच खरा अल्ला………7


कवी.प्रकाश जी पाटील…(पिंगळवाडे)