रानपरी आदिवासी पोर नी कयी दिवायी साजरी Khandeshi Adivasi Diwali
आदिवासी शे मी पोर
कयी साजरी दिवायी
पाने फुलेस्नी सजाडी
मन्हा आंगने रांगोयी..!
जरा आगया वेगया
पैसा ईना मन्हा सन
हेवा वाटी दुनियाले
अश्या मन्हा कलागुन..!
दोन दिनना तुम्हना
तेल तुपना फराय
बारा महिना चाखस
रानमेवा मी रसाय..!
दारे निर्जीव दिवास्नी
निस्ती तुम्हनी आरास
मन्हा झापवर देखा
चंद्र चांदन्यास्नी रास..!
घर दारमा तुम्हना
आगरबत्तीना वास
मन्हा झापना मव्हरे
जाई जुईना सुवास..!
नादारीनं जीनं तरी
नही मनमा उदाशी
पोर मी या सह्याद्रीनी
रोज र्हास हाशीखुशी..!
जुनी अंगी घालीस्नीबी
खयी गाले शे हसरी
सांगा कशी शे बरं मी ?
रानम्हानी रानपरी..!
कवी-देवदत्त बोरसे
(माध्य.शिक्षक)
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय.
पिंगळवाडे ता.बागलाण जि.नाशिक
मो.नं.९४२१५०१६९५.