मी मी करीस्नी संपी ग्यात

मी मी करीस्नी संपी ग्यात

” खानदेश नी वानगी “

मी मी करीस्नी संपी ग्यात

जगन आते कठीन लागस….
मरा ले भी जीव घाबरस…
दुनिया ले राहु दे बा…
आते आपला लोकेस्ले पन जीव घाबरस….. १
तुन्हं मन्ह करीस्नी….
आते कटाया उन्हा….
मी तुले सोडावु न्हायी. …
हायी शब्द भी कंटायी गया….. २
कीतला लोकेस्नी….
दुश्मनी निभाडी…
कीतलाक दुश्मनी मा वाया ग्यात….
मी मी करीस्नी अहंकार मा….
संपी ग्यात….. ३
जगान का मरान काही…
समजत न्हायी …..
कारण दोन्ही मा काही फरक…
दखास न्हायी…..
जगाता जगता मरी राय्हनात लोके…..
एकमेक ना आसु कोन पुसी बरे? ४
अहंकार, गर्व, समदास्ले मारी…..
आनंद मा नाची राहीनात……
म्हणून आते मराले पन….
जीव घाबरी राहीना… ५…… S……