मन्ही खान्देशी बोलनी अहिरानी म्हाईन सांग निरोप भाऊले कविता
सांग निरोप भाऊले
दिवायीले दिवा बये
घरदार उजायाले
पाया काय सरा लेबी
हाऊ उना उजायाले॥धृ॥
दिवा भाऊना घर बी
मन्हा जाय उजायाले
सांग निरोप कव्हयं
यीशी ताईले लेवाले॥१॥
वाट देखस बहिना
आसू आनस डोयाले
आडकना हुंदका बी
सोनसरी ना गयाले॥२॥
माय सारखी वह्यनी
यीसू तिले बी भेटाले
गोड धोड दोन घास
तिन्हा हातना जेवाले॥३॥
गोष्टी सासर घरन्या
मनम्हान्या बी सांगाले
सुख शांतीना दिवा बी
भाऊसाठी ववायाले॥४॥
–निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जयगांव.
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
शब्दार्थ:- भाऊले=भाऊला, दिवायीले =दिवाळीला, बये=जळे, उजायाले=उजळायला, सरा=छत, भाऊना=भाऊच्या, मन्हा=माझ्या, कव्हयं=केंव्हा, यीशी=येशिल, ताईले=ताईला, लेवाले=न्यायला, वाट देखस=वाट पहते, आसू=अश्रू, आनस=आणते, डोयाले=डोळ्यांना, आडकना=अडकला, गयाले=गळ्याला,
यीसू=येईन,तिले बी=तिलाही, भेटाले=भेटायला, तिन्हा =तिच्या, जेवाले=जेवायला, घरन्या =घरच्या, मनम्हान्या=मनातल्या, ववायाले=ओवाळायला.
1 thought on “मन्ही खान्देशी बोलनी अहिरानी म्हाईन सांग निरोप भाऊले कविता”
Comments are closed.