बाप कोठे काय करस
बाप कोठे काय करस खर शे तो कोठे काय करस,
तू भर्ती व्हवाले १६०० मिटर ना राऊंड मारस,
उभं आयुष्य बाप तुले तारस पण तो कोठे काय करस. !!१!!
जव तुना वावरमा पाय नही टिकस,
तो लंगडी लंगडी पाय टेकस आणि कामना दिवस भरस ..
पण तो कोठे काय करस.. !!२!!
तू रातले ठोल्या पोरसमा फिरस,
तव तो रातना बारा धरस पण खरं हे भाऊ तो कोठे काय करस…!!३!!
तू दिनले झोपा झोडस,
तरी तुनसाठे तो रात – दिन डोया फोडस आणि तुले घडस..
हा पण तो कोठे काय करस….!!४!!
तू पाहिजे त्या कपडा घालस,
त्यानं चड्डी वाटी गुडघ दिखस म्हणून तो आखडी आखडी चालस..
आन कोणलेच नही बोलस तरी तू म्हणस तो कोठे काय करस…..!!५!!
तुले लगन- यावं मरण – धरण ले पुढे करस,
कारण तो लोकणाकडे साले भरस..
आणी नातेवाईक सोबत हारस पण खरं हे तो कोठे काय करस……!!६!!
तुन मायले लेन- देणं कम करस ,
आन तुनी हौस मौस पुरी करस,
तुले एक वस्तू जर नही भेटणी ते तू कुरु कुरु करस…
पन तो बिचारा ठायके कुडापा करस तरी तू म्हणस तो कोठे काय करस…….!!७!!
तू बोली दावस बाप कोठे माल प्रेम लावस,
तो सर्व मनमा ठेवस कारण तो फक्त तुलेच जीव लावस.…
बर हे भो तो कोठे काय करस……..
!!८!!
तू साखर झोप पुरी करस ,
तव तो शेण ना टोपल्या भरस,
त्यान भी झोपुशी मन करस ,
पण तो तुनी झोप पुरी करस ..पण हा तो कोठे काय करस ………!!९!!
तू फोन मा काड्या कोरस तरी तो तुन मन धरस,
मन पोरगं धाकल हे म्हणस तुले एक नही तानस,
तरी तू तुनतूना कणस पण तू ते तेच म्हणस बाप कोठे काय करस……….
!!१०!!
तू शंभर नी कटिंग पन्नासनि दाढी करस,
तो तुना खर्चा ना हिसब नही करस, वाटीमा पाणी आणि हात मा साबण धरस,
फक्त दोन तीन बरामाठा हात तो मारस…
तरी तू म्हणस तो का काट कसर करस खर हे बाप कोठे काय करस………..
!!११!!
लगीन- सराई सण – सडावन तुना फॉम ऱ्हास,
त्यान चड्डीले ठिगय फराक ले बुंग्रा वरून बटन तुटेल ऱ्हास,
तू धष्ट पुष्ट दिखस पण आंगवर त्यान नही मास ऱ्हास…
तुन एकच रडणं ऱ्हास बाप कोठे काय करस…………!!१२!!
भाऊ शेवटी लगीन तुन व्हस,
आणि बायकोना स्वाधीन तू व्हस,
आते त तू बापनी आंगठी सोडस आन बायकोना हात धरस,
तरी तो तुना लेकरे कड्यावर धरस आणि त्याले रडाले दिन नही पुरस…
तुले एवढा करावर काय त्त्यानं मांगे उरस,
तू तेच म्हणशी बाप का हायती ले पुरस तो कोठे काय करस………….
!!१३!!
जाऊदे तो आयुष्यभर तुनासाठे डोया फोडस,
तो मरावर तू फक्त एक फोटो मडस,
तू फोटो ले आगारी दावस आणि वरीसभर बिचारा कोपरामा पडस…
तुन लेकरू धिरे धिरे वाढस मंग तुनवर भी हाऊच दिन पडस की,
बाप कोठे काय करस,
मना बाप कोठे काय करस…………..!!१४!!
खान्देशी अहिराणी कविता
बापावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व –
हेमंत पाटील