नवा साल ले येऊ दे खान्देशी अहिरानी बोली भाषेतील कविता      

नवा साल ले येऊ दे खान्देशी अहिरानी बोली भाषेतील कविता

नवा साल ले येऊ दे

दोन हजार तेविस
नको नाचू थयथय
गन झायं तुन्हं आत्ये
वावधन धुमाकुय॥धृ॥
नवा सालनं येऊ दे
नवं सोनानं उजायं
जावो नवं साल आत्ये
सोनाथिन बी उज्जयं ॥१॥
नवं सालं नवाईनं
ऊन येऊ दे कव्वयं
थोडं धव्वयं धव्वयं
देख सुर्यानं पिव्वयं ॥२॥
लयी जायं आतंकनं
कायं कुट्ट रे धुक्कयं
तुन्हा संगे लयी जाय
दु:ख-दारिद्र्य दुस्कायं ॥३॥
नवा नवलाईनी रे
नवी व्हवू दे सक्कायं
पानी पाऊस येऊ दे
भिजो माटीनं ढेक्कायं ॥४॥

अहिरानी बोली भाषेतील कविता      


निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.
गन झाया=पुरे झाला, धुमाकुय =धुमाकूळ, उजायं =उजेड प्रकाश, सोनाथिन=सोन्यापेक्षा,उज्जयं =उजळ, कव्वयं=कोवळं, धव्वयं =शुभ्र सफेद, कायं=काळं, धुक्कयं =धूर,दुस्कायं =दुष्काळ, सकायं =सकाळ, माटीनं=मातीचं, ढेकायं=ढेकाळं,