देवबा तोंडना घास काढा रे बा
माय माय माय काय या दिन दखाले लावात रे बा तू .. काय हाल या आम्हना शेतकरीसन्या कयात रे देवबा ? परो संध्या कायले जसं कापरं भरनं व्हतं आम्हना आंगमा . दिन भर कायेकुट्ट ढगेसनं वातावरन व्हतं . तोच काया रंग आम्हना शेतकरीस ना तोंड ले फासा ले उना का कायजुन रे देवबा .. ? संध्याकायले सुरु व्हयेल तो दडक्या पानी तो पाऊस असा चालना माय माय तुम्हले सांगु अशी धार व्हती ती धार दखी दखी जीव बये वं माय ‘ नुसता जीव बये ‘ कव्हढी गार वं ? माय माय माय सोपारी ना आव्हढी गार व्हती ना वं माय ती . वावरेसमा आख्खा पीके आडा पडी ग्यात . वावरेस मझार पानी . हा इथल्लं पानी .. ते दखी दखी जीव नुसता बये वं माय जीव नुसता बये ” आनी असं म्हनीसन सोजा बोय रडालेच लागनी . तो अवकया पानी पडना नी आमन्या अवकया सुरू झायात . ”
सोजा बोय सांगी राहयंती हाई तिनीच हकीकत नई बठ्ठा शेतकरीसनी हाईच हालात झायी हो हाईच हालात झायी . काय करतस आते . नसीबना मव्हरे कोनं काई चालनं का ? आख्खा वावरेसमझार आख्खा पीके आडा पडी ग्यात . मक्की झोपी ग्या ‘ गहु ‘ हरभरा ‘ समदा पीके पानीमा सडी ग्यात . कोना केयी ना बागा खल्ले लागी ग्यात . द्राक्षासना मनी काढानी ये व्हती आख्खा जमीनदोस व्हई ग्यात . आख्खा शेतकरी रडी राहयंतात . आपला नसीबले कोसी राह्यतात . कर्ज काढी काढी बीवार ‘ मजुरी ‘ याना वर पानी फेरी गये .
रब्बी पीके बी झोपी ग्यात . तुमीन म्हंशात वावर कडे दखाले जीव बयेस शेतकरीना जीव बयेस . तोंड झोडी झोडी येडा व्हई ग्या तो . हाते तोंडे येल घास देवबानी हिसकाई लिना . हाई कर्ज कथाईन फेडाई हाई चिंता त्या शेतकरीले सताडी राहयनी . बरं हाई आपलाच जिल्हानी बात नई ‘ नाशिकना दराकशे आख्खा झोपी ग्यात . जयगावना केयी ना झाडे बठ्ठा आडा पडी ग्यात . काढेल कपाशी पानीमा सापडी गई . काय करी हो शेतकरी ? आते डोक्सावर हाऊ कर्जाना भार . घरमा सुतकी वातावरन शे . बीवारं पेरा पासीन ते पीकेसले वाढायेल व्हतं . ऊन वारा ‘ कसा कसानी परवा नई कई व्हती या पीके वाढावा करता रात दिन मेहनत लेल व्हती . पानी देवानं ‘ खत ‘ फवारनी वाढेल आवती भवती नं तन वाढु न देता निंदनी कोयपनी बठ्ठ बठ्ठ करेल पानीमा गये .
रातदिन वावरम्हाच राबेत . एव्हढ कष्ट करीसन हातमा काय ऊन ? आते शेतकरीले मरानीच पायी शे ना मंग ! कर्ज कथाईन फेडाई हाईच चिंता डोयास मव्हरे गर गर फिरी राहयंती . ईचार करी करी डोकं फिरानी पाई ई गयथी . भलती वाईट अवस्था आते आजना घडीले शेतकरीस्नी झायी हो . हाई कर्ज कथाईन फेडाई ? पोर डोका आव्हढी व्हई जायेल शे तिना हात यंदा पीव्या करानी तयारी सुरु व्हती . चांगला तिना करता स्थये बी दखी ठेल व्हतात . हाऊ पैसा येताच ती तयारीमा लागनार व्हतात . पोर नं वय व्हई गयथं . आजु बाजुना लोके लगेच नावे ठेवाले लागी जातस . ” काय रे भो ‘ आर काय डोया लाईसन बसनारे ‘ दखस का पोर पोर कव्हढी डोका आव्हढी व्हई गई ते ‘ बये पोरीसना प्रश्न बी भलता गंभीर व्हयेल शे हो . लोके आते मायन्यान भो त्यासनी चकारी सोडी देल शे असं दखास . काई माई बोलाले नको ‘ पन बोलनं मांगे बोलनं येस माम्हूर हुंडा बी मांगतस ‘ लगनबी काढी द्या ‘ नवरदेव ले स्कुटर काढी द्या . नवरदेव ले भारी ड्रेस ‘ सोनानी चैन ‘ आंगठी काढी देनी पडी बस्ताम्हाईन . नवरीना आंगवर सोनं चढावनं सांगतस मायन्यान कदी भो असं वाटस जाऊ दे मनं तोंड जास कथं मथं . आते तुमीनच सांगा आते शेतकरी काय करी बरं सांगा ते बरं ! आते शेतकरी काय करी ? कथाईन हाई कर्ज फेडी ? तुमीनच सांगा बरं ! ज्या पीक पानी ना भरोसा रात दखी नई ना पहाट दखी नई कदी वारा वावदन दख नई ‘ या पीकेसले आपला पोटना पोरेसना मायेक वागे लावं . पन या अवकायी पाऊस नी झोपाडी दिनं . आते थोडा दिनमा मार्केटम्हान लई जानार व्हतात . पैसा ईथीन ‘ कर्जाना हप्ता बी लावाई जाई . पोर बी छाती आव्हढी झायी . त्या चिंतामा त्याले जप बी लागत नई व्हती ना हो त्याले . आनी या अवकाळी पाऊस उप्पाडी घालं हो बये उप्पाडी घालं मायन्यान कदी भो . काय अवस्था करी टाकी शेतकरी नी . रडु म्हने ते रडता बी येत नई . हुदूंक बी दाटी येस . आवाज बी फुटत नई म्हंत . खेतमझार जावानी इच्छा बी व्हत नई . तठे पीके पूरा आडा पडेल शेत . वावरेलमा पानीच पानी दखास . पाय ठेवाले जागा नई . दखीसन त्यासना जीव नुसता बयेस . पीके बठ्ठा जर आडवा पडी ग्यात वावरेस्मा कसाले जातीन ? भयान भयान ! सोजा बाई ते हेर जोडे बशीसन रडी राहयंती . जसं तिनं कोनी घरमातलाच कोनी मरी जायेल शेत . बाया गंजच समजाडे . पन भलती नुकसानी व्हयेल हती . साहजीकच शे . रडु तर ईच ना ..! काय हो रडु ते ईच ना ! मंग बरं . . !
आखो गंमत ते गंमत तुमले सांगो मंडई ‘ अहो गोठा म्हातल्या गाई म्हशी ईज पडीसन मरी ग्यात . बोला आते . दुसकायमा तेरावा महिना असच म्हनो ना मंग ..! दुध दुभता जनावरे पडता पानीमा सापडनात झाडेसना खाले बांधेल म्हना गोठावर बांधेल म्हना अहो ईज कडाडीसन त्यासना आंगवर पडनी . हाई का साध नुकसान शे का ? सोजा बोय मातर भलती रडे . कोनी बी घर उन का तोंडच झाके . अहो ‘ काई तर बागा न् बागा नष्ट व्हई ग्यात . केळीन्या बागा पार थप्पी लागी ग्यात . केना झाडे बठ्ठा आडा पडी त्यात . ईजासना कडकडाट ‘ ढगेसना गडगडाट ‘ हाई मोठमोठी गार ‘ रात भर शेतकरी चिंतामा व्हता . तर मंडई ‘ शेतकरीसनी हाई व्हयेल दैना दखी ..
हाई नुकसान शेतकरीनं भरी येनं मुश्किल शे . आते याम्हाईन सरकारवर जबाबदारी ई पडस . शेतकरीना बांधवर जावा पेक्षा फोटो काढीसन चॅनल वर दखाडा पेक्षा त्या तठे पंचनामा कराले जोयजे . हाई अस्मानी संकट शे . हाऊ शेतकरी बळी राजा शे . त्याले दुनियानी चिंता ऱ्हास . त्याले या संकट म्हाईन सरकारनी वाचाडाले जोयजे . त्याले एकरी मदत देवाले जोयजे . याम्हाईन तो उठीसन उभा राव्हाले जोयजे एव्हढी सरकारनी त्याले मदत कराले जोयजे . आनी तशी सरकारनी ती जबाबदारी शे . आनी माले वाटस सरकार हाई मदत जरूर करी असं माले तरी वाटस . आनी तसच व्हवो . त्याले आधार दी सन उठाडाले जोयजे . तो खरा आपला पोशिंदा शे हाई जानीव ठी तरी भलतं नमरी व्हनार शे . . नई ते अशा गंजच सोजा बाई रडी राहयनात .. आनी म्हनी राहयन्यात ” अरे देवबा ‘ तोंडना घास काढा रे बा ss I
विश्राम बिरारी धुळे 9552074343
1 thought on “देवबा तोंडना घास काढा रे बा”
Comments are closed.