खान्देसन्या लगीनन्या चालिरिती
“खान्देसन्या लगीनन्या चालिरिती”
भाऊ बहिनीसहोन … आपल्या खान्देसन्या लगनन्या चालिरिती … आपुन खान्देसी लोके म्हंजी आपले सन आनी उत्सवना भलता आलोखा सलोखा … आपन म्हने आरयेसना वंशज शेत म्हने आगीन देव ‘ आसरा ‘ गंगा नदी ‘ यमुना ‘ सरस्वती म्हसोबा ‘ कानबाई ‘ ज्याबी ग्रामदैवत व्हतीन त्यासले मनपाईन पूजा अर्चा करनारा आपुन लोके . बरबर ना मंडई .. ? आपला लग्नेसना ह्या देवतासले पूजानी परथा से . नवरदेव ले हयद लागा नंतर आगीन देवले चुल्हाले आपुन गाना म्हंतस . ” चुल्हा म्हने मी चूलदेव … चुल्हा चंदन खापाट्या ‘ आन शिजे सव्वा खंडी त्या आननी किर्ती मोठी लोक जेवती लोकपती नवरदेवना बाप दुनियादारी चारी पंगती दिन्यात भारी . अखंड तुपन्या लायात धारी … कांजील म्हने कांजील पानी … नवरदेवले पीव्वय कांगन हातले बांधतस तवय सवासिनी हाई गानं म्हंतस . नवरदेव खाले मान घाली बसेल ऱ्हास बिचारा .. बाईसना गराडा मा काय करी ? तवसामा ते आत्या बाईना आवाज कानवर ऊना ” चला ‘ वं पोरीसव्हन नवरदेवले तेलन पाड़ाई गये . . तुम्हना गाना व्हई ग्यात . आते चला पाची सवासिनी नावे ल्या गड्यासहोन . ” तितलामा ते सकवारनी व्हवु कशी म्हनस ” वं आत्या बाई ‘ आमले नाव बीय नई येतत बरं ‘ सांगी देस माय ” …. तितलामा ते आत्या कशी म्हनस तिले ” काय बोलनी तु ? आथी तोंड कर बरं । ” ” नावे येतत नई म्हने ” … ” ते काई नई ‘ नावे लेना पड़तीन म्हंजी लेनाच पडतीन … ” ” वं माय वं ‘ आत्या बाई ‘ हाई ते मंग जबरदस्तीच झायी ना मंग ! ” ” वं जबरदस्ती वाली नवरानं नाव ले उगी मुगी ” कावं , घरमा त्याना संगे रातले कशी ‘ गुलू गुलू ” बोलस . तवय वं ? ” ” आयाय माय ‘ आनी आत्या बाई ‘ आनी कवय उन्थात तुमीन ऐकाले ? ” समद्या पोरी बाया हासतीस .. खिदी खिदी . ” वं ‘ कल कल नका करा वं …. ऐका वं पोरीसव्हन ऐका कान दी .. मोठाईन नाव लेवं पोरी .. ऐका वं कान दी ” बठ्ठासले ऐकाले येवाले जोयजे . तव्हढामा दुसरी मझारमाच टपकनी ” वं लेत नई उकावत नई आव्हढा काय ईचार करस ? ” . ” गप बसा वं … ऐका ss ” . सकवारनी व्हऊ लाजीसन नाव लेस ” त्यासना येवा .. त्यासना जावा … त्यासना येवा त्यासना जावा … नी त्यासना … मझारच एक जन बोली पडनी ” नाव लेवं नाव ” ” रामराव म्हाजन ना बोंबीवर शेनना दिवा ” हाई नाव ऐकताच बठ्ठ्याच पोरी हासाले लागन्यात . . तव्हढामा आत्याबाई खिजाईनीच तिनावर … ” वं ss तुले काई जननी का मननी ‘ अं ss तु खुश्शाल मना पोर्याना बेंबी वर शेन ना गोया ठेवस वं ..? ” ” आख्ख्या बाया ‘ पोरी आनखी जोरजोरमा हासाले लागन्यात . ” चाल ‘ उकाव तू नाव ले वं संगी … माय माय माय .. काय लाजनी वं तु ? नको इतरावू उकाव ‘ .. नाव ले . . ऐकावं पोरीसव्हन .. ” ” वं ss इतल्या काय कलकल करतीस वं ? तिले नाव वे लिवू द्या .. ” लेव वं ‘ मन ध्यान महुरत दरी राह्यनी का ? उकाव नाव ले पटपट . आठे ये व्हई ग्या .. नवरदेव कवयसन बसेल शे बिचारा . ” दुसरी बोलनीच तिले ” उकाव संगी नाव ले . ऐकावं पोरीसहोन ” . हं ss ले . . . ‘ हयद लावू ‘ कुकू लावू आरती करू त्यासनी … हयद लावू .. कुकू लावू .. आरती करू त्यासनी … काय करू माय माले याद उनी रामभाऊसनी .. ” बट्ठया हासतीस फिदी फिदी फिदी फिदी .. त्या पोरी इतल्या हासी राहत्यांत … थांबानं नावच नई लेत त्या .. तव्हढामा आत्या बाई खेसकनीच ” वं गप बठा वं ..! ” तव्हढामा ईमल तिले बोलनीच ” काय वं रांडे ‘ गावना रामभाऊ ते रामभाऊ ‘ .. तुना बी रामाभाऊ च का ? येडी कथानी ? ” आखो पोरी फिदी फिदी हासा ले लागन्यात . तव्हढामा आत्याबाई बोलन्यात ” कावं आते कोन शे बाकी नाव लेवानं ? ” ” आत्याबाई ‘ हायद लावाई जायेल शे . काकन हातले बांधाई जायेल शे . ” बाकीसन्या सव्वासनी राहू द्या .. ” ” असं म्हनस ! ‘ हं ! ” ” उकावा वं पोरीसव्हन पाच सव्वासिनी मव्हरे या नीट उभ्या राहा . ‘ संगी तु नीट उभी राह्य . आत गाना म्हनाना शेत गड्यासहोन . म्हना ते ” .. म्हना वं । ” ” आनी मंग नावे लेना पडतीन बरं । नई ते मंग मुक्का पोरे व्हतीन तुमले सांगी देस मी . ” तवसामा ते एक पोर कशी म्हनस ? ” व s s माय वं ‘ ह्या आत्या बाई ना काईबी भ्याव दखाडतीस माय । ” ” चला मंग म्हना गानं ” मंडई ‘ अशी हाशी मजाक चालु ऱ्हास … लगीनन्या बठ्ठ्या रिती भाती नेंबन पार पडतीस … लगीन ते धुमधडाकामा पार पडस हो .. आत्या फुया मावश्या ‘ पाव्हना ‘ सग्या साल्या ‘ साल्या सन्या साल्या ‘ मोठमाया बठ्या बठ्ठया व वऱ्हाडनी नवरदेव ना .. भोवताले जमेल ऱ्हास . आपला या लगीनना गाना बाकी भलता भारी ऱ्हातस हो . हाई ते हाईच दखा … नवरदेव नवरी पाटवर जवय बसेल ऱ्हातस तवय हाई गानं नीट कान दी ऐका .. ” नवरा नवरी गं कशा न्हाती .. तेल पानी गं बने जाती . बनेचं पानी गं मोर पिती म्हंजी नवरदेव नवरीसनं तेल लाईसन गरम पानीवर हयद नं आंग धोवाई राह्यनं . आख्ख्या सव्वासिनी सना त्यासना भवते गराडा पडेल शे . . त्यासनं आंगन पानी बन मा जाई राह्यना .. आनी तठे झाडवर मोर बसेल शे . तो मोर ते पानी पी राहयना ” अशी कल्पना करेल शे . मोर तिथून उधईला .. ” आंब्या चाफ्यावर बसविला .. आंब्या चाफ्याची हिरवी काडी .. नवरी नेसली हिरवी साडी मंडई ‘ हासी मजाक ते चालूच ऱ्हास . भलती रमूस ऱ्हास हाई लगीननी . खान्देसन्या लगीननीच गोट न्यारी ऱ्हास मंडई . पुढना भाग मा दखुत आखो काई गंम्मत आनी गाना … तो लोंग राम राम …
विश्राम बिरारी’
धुळे .
9552074343 ……
1 thought on “खान्देसन्या लगीनन्या चालिरिती”
Comments are closed.