दिवाई ना दिन अहिराणी कवीता

दिवाई ना दिन अहिराणी कवीता

दिवाई ना दिन
धाबे धाबे दिवा
भाऊ कसा म्हणे
आज बहीण ना येवा

दिवाई दसरा
खेती बाडीना पसारा
भाऊ कसा म्हणे
बहीणी दिवाई इसरा

दिवाई ना दिन
मना ताटमा नथ
ओवाइज उनू
मन धनभर गोत

दिवाई ना दिन
मना ताटमान येलया
ओवाईज उनू
पिता तून्या बोरसान्या गल्ल्या

दिवाई ना दिन
मन ताट जड जड
नवस्या बंधू मना
टाके येलीसना जोड

दिवाई ना मूय
वाटे लाई दया सासरा
मना भाऊस्ले ओवायाले
सन नहीरे दुसरा

दिवाई ना मूय
नका फिरवा सासूबाई
बंधूले ववायाले
सन दुसरा नही

दिवाई ना मुयी
वाटे लाई दे सासूबाई
भावू मना फिराले फिरीजाई
माय मनी मंगला वाट पाही

सासू आत्याबाई
पाय पडू दया भागात
दिवाई न मूयी भाऊ
मना फिरी गया रानात

माय तव माहेर
बाप तव येरझार
भाऊ भावजाईन राज
वाट दखू मी निराधार

मायबापन राज
पाणीमा चाले जहाज
भाऊ भावजाईन राज
लेकी मनले समज

मायबापन राज
खाऊ शिखावरल दही
भाऊ भावजाईन राज
ताक पाणी नी सत्ता नही

Ahirani Kavita