दगड Ahirani Kavita
मन्हाच गावनं कुत्र जवय मन्हावर भुकस, हातमा लिसन दगड मी भी त्याले हानी फेकस.
आडमार्गे जवय मन्हं येस पोट आट मारी, भागाडी लेनं पडस तवय आपलं काम दगडवरी.
हातमा लिसन दगड आम्ही चिचा बोरे कैऱ्या पाडूत, तोच दगड डोकं फोडे ढोरनामायक आम्ही रडूत.
घरमा दगडना वरोटा लागस कोल्ला समार वाटाले, सवान जागावर बसाडे माय दगडना त्या पाटाले.
झाड सावलीनं दखीसन माले भयान वाटस खुशी, घडीभरना लेस इसावा दगडनी मी करस उशी.
गावनं आंतर सांगाले तो वाटवर हास हात जोडी, वाटवरला मजुर त्याले पोटनागुंता टाकस फोडी.
दगडलेभी हातोडाना सोसना पडस भलता घाव, मंदिरमा बसस तवय मनमा लोकेसना येस भाव.
आक्कलहुशारी नव्हती तवय माय माले दगड म्हने, भोळी भाबडी मन्ही माय देवंसमजार माले गने.
दगडमा देव -हास भावना पाहिजे आपला मनात, मनले शांती तठेच भेटस भवडू नही राना वनात.
कैलास संतोष भामरे (वाखारी) लासलगाव ता. निफाड जि. नाशिक मोबाईल नंबर ९४२०७२७२८८