तुकोबा

तुकोबा


बरं झाये तुका बाबा
ईवानम्हा तू बसी ग्या…
तुना अभंगले बोलें
तोच बिचारा फसी ग्या……….1

सध्या टिंगलीस्ना घरे
ग्यात गलोगली वाढी …
व्हडे शेजारीस्ना पाय
दिन्हा फर्याम्हाई काढी ………2

दया, माया येस माले
देस टुक्कारस्ले तऱ्हे…
कडे-खांदे कर्ता कर्ता
पुर्रा चढी ग्यात वऱ्हे………..3

आसा बाट्टोडस्ना माथे
तूच हाणू जाणे काठी…
कसं जमाडे तू सांग
दिसू खोबरानी वाटी……….4

काठी आते तिबाक शे
ज्येना देव्हाराम्हा खैस…
बिना चारा टाकी धोये
त्येना खुटा चाटे म्हैस……….5

मेणपेक्षा नरम मी
कसा “वज्र” पेलसू भो…
मन्ही जंगाटेल ढाल
मार कसा झेलसू भो……….6

न्हई इंद्रायणी लेये
जरी बुडायेत गाथा…
आम्ही बुडतस रोज
वऱ्हे पाय खाले माथा……….7

म्हणे, “शुद्ध बिजापोटी
आठे शुद्ध वैखी कोण…?
सोनंसुद्धा रोज खास
कथीलन्या लाथा दोन ………8


कवी… प्रकाश जी पाटील (पिंगळवाडे)