ज्योशिबा संस्कार म्हनतंस लोके आज जो तो लेस म्हने येरायेरले नाडी
म्हनतंस लोके आज जो तो लेस म्हने येरायेरले नाडी
जठे आदर, निष्ठा जपीन ज्ञान, भान नी आत्मसन्मान देत पटाडी…
तठे कसं काय गई मंग, बावचायनी हाई आजनी पिढी,
इबाक तिबाकथीन लयनात, झटपट पटपट करी ह्या शिक्षननी खिचडी..
जि. प. शाळा करी दिन्यात बेभाव, शिक्षण दिनं नासाडी..
शिकाडाथून ह्या त्या कामे लाईन, नुस्ता ठेवतंस आथा तथा रवाडी…
गुरुजी नावना व्हता धाक आजभी ठेवाना व्हई ते, द्या त्यासनावर सोडी,
आदर्शवत नवा युगनं शिकाडी सवारी लावथीन त्याज परत गोडी,
देत पिढी घडावानी जबाबदारी,इतर कामे काढी, त्यासनावर विश्वास ठेवना पडी,
जवय उमजाडीभी समजे नही, तवय काम करे मुद्दाबन छडी,
तवलगून व्हता शिका करता कटबन धाक, मनेमन हलपल हरघडी,
विस्कटी गई आज मानमर्यादानी घडी आनी आदरयुक्त गोडी,
काहिमाही पॅटर्ननी राबाडीनी,आख्खा लाईन दोरा दिना चुकाडी,
जुनं ते सोनं व्हतं, त्या परत करी छडी, जी परत दि गोट आजूक सजाडी…
तीना धाक जो बिघाडी त्यालेज दि, खराखाती शिकाडीन समजाडी…
संस्कारी ह्या विद्या मंदिरे फुलू द्या, जठे मूल्य शिक्षनथून वाढी गोडी…
लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले.