चाकण नगरीना खरा किल्लेदार फिरंगोजी नरसाळ
चाकण नगरीना खरा किल्लेदार
नाव शोभे फिरंगोजी नरसाळ…
मर्द मराठा लढाऊ विर योध्दा
व्हता मोगल शत्रूना गर्दनकाळ…!!
खानना डाव मोडी काढा
मोगल सलनतना फास रोखा…
फिरगोजी धिफ्फाड मानूस देखता
मोगल चाकननी माती मजार रोखा…!!
ऐढा देत खानानी दोन गोटा सापडावा
म्हणे किल्ला मजार लिऊ ताबामा…
औरंग्याले ठाऊक नाही करामतनी
वाघ उभा किल्लावर मोठ्या खुन्नसमा…!!
शाहिस्तखाननी करतुत देखा
काबीज कराले निंघना भुईकोट किल्ला…
दुरथीन डरकाळी फोडिसन म्हने फिरंगोजी
बाप तुना उभा किल्लाले वापस जाय दल्ला…!!
संग्रामदुर्ग गडन काबिज स्वप्न देखत
शाहिस्त्या पुढे सरकाले लागना…
फोडि काडा शाहिस्तना घाम
फिरंगोजीनी सडोकि पडो करी सोडाना…!!
हुशारीना दिना इशारा शेतकऱीसले
धनधान्यधा साठा लई चला चांगलीजागाले…
मावळासना मनमा घर तयार करनारा
रयतेना रक्षण करता किल्लेदार भेटला स्वराज्यले…!!
✍️PSI विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =०८-११-२०२३