गयात त्या दिवस
गयात त्या दिवस
तो काळ चांगला व्हता
सालदार काम करे
बळी सुखी व्हता….
पिकले फवारा नही
शेणखतना जोर व्हता
गावरानी धन धान्य
दूध दुबताना पुर व्हता….
डोकावर पचपच तेल
तोंडवर फफुटाना चर व्हता
वाड वडिल ना धाक
बाईना डोकावर पदर व्हता….
जावा येवाले काटानी पांधी
पायना टांगा सस्ता व्हता
थळात आंबराई,चिचा
गाडाले बांधवरुन रस्ता व्हता….
लेकरू दिनभर उन्हात खेळे
हिवताप त्याना अंगात नव्हता
छोटा छोटा दुखणनाले
डाक्टर फोटोले सांगत नव्हता….
निवतनाले घरोघर न्हायी
कार्याले तरीना रस्सा व्हता
समदा गावले निवतन
गरीब लगन हिस्सा व्हता….
मजुरले हप्ताना पगार
भाजीपाला सस्ता व्हता
आठवडाले तेलमीठना बजार
फडकीमा लगनना बस्ता व्हता….
दरजा गावनी वळख
गाव एकीना गड व्हता
जत्राले तमाशाना फड
चौकात मुंजोबाना वड व्हता….
राम संगे रावण
सांबळवर नाचत व्हता
गावनी परंपरा,लोककला
भवाडा सांगत व्हता….
एक भाऊ नौकरीले
चार घर राबत व्हता
खटला ना घरात
एकोपा नांदत व्हता….
गावमा गाव व्हता
मोठाले भाव व्हता
कथं दवडी गये गाव
चोरं आते झायात साव….
विवेक पाटील
ममालेगाव (नाशिक)