अहिराणी अष्टाक्षरी कविता कष्टकरी

अहिराणी अष्टाक्षरी कविता कष्टकरी

संबंधित लेख
कष्टकरी


काळी भुईनी कुसमा
तान्ह गोंडस लेकरु
संगे बशेल जोडीले
धीट गायनं वासरु..!

दोन्ही मनना पौथीर
सच्चा निरागस बाय
दुन्या एकचं दोन्हीस्नी
माय नावनं आभाय..!

आजा आजलीना नातू
म्हातारपनना दोस्त
आंग खांद्यावर बठी
उड्या मारतस मस्त..!

कष्ट करीस्नी बापनी
थकी जास काया पुरी
पोरे धरी कड्यावर
जास थकवा ईसरी..!

ताई लाडका भाऊनी
मोठी वयले जराशी
पाठगोये त्याले धरी
फिरावस हाशीखुशी..!

गाय वासरु दखीनी
पान्हा दाटी हांबरस
दूध पाजताना मया
मुकी मायनी दिसस..!

शेती बाडीनं जीवन
सेवा शे नही तो धंदा
सोशी नदारीना भोग
जग पोसस पोशिंदा..!

देखा कवया उलुसा
दोन नवा कष्टकरी
खरा माटीना सोबती
बैल अनी शेतकरी..!

✍🏼सुगंधानुज✍🏼
नामपूर ता.बागलान जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.