आंधी नी गड जिका वं माय
” आंधी नी गड जिका वं माय ”
सद्या पोरीसना भलता बिकट प्रश्न व्हई जायेल शे . ती पोरगी पहिले ना पहिलेच म्हनस ” पप्पा मी वावरमा जावाव नई बरं पप्पा .. I ” बये कथाईन काढा रे हाऊ पप्पा ‘ सबद ‘ घरमा मंग उंदरे का फारकती मांगे ना .. पप्पा ‘ मम्मी … अरे माय म्हना रे आपलं आपलं . . . बये मंडई ‘ माय ‘ या सबद मा काय जिव्हाया ऱ्हास हो ? माडी .. वं माडी .. कितलं मस्त वाटस ? बये कोन सांगी या आत्ते ना पीढीले ? पन पोरे वाला बी सोय नई खातत ना ‘ त्याले गोरी च पोरगी जोयजे .
कायी पोर ठेंगनी पोर त्याले अज्याबात चालाव नई . पोरना बापले पन पोरगा भाहिर ना भाहिर पुना मुंबईलेच जोयजे . मंग तो कंपनी मा का व्हयेना . तो तथाच जोयजे . गाववर आनी खेडावर अजिबात नको . म्हंजे तथा न तथा काला मोडाले बरं व्हई जास . जाऊ द्या आपुन आते मुय मुद्दावर येवूत मंडई .एक गावमा एक पोर लगन करा जोगती ऱ्हास . पोर नाके डोये रंग रूप मा सुंदर व्हती हो . तिना बापले तिना लगीननी वज्जी चिंता व्हती . गंजच गावे फिरना तो . पन सुधबन पोरगा काई त्या पोर करता भेटे नई . काय करो तेच सूचत नई व्हत . त्याच गावमा एक बावर व्हट्या व्हता . त्याले त्याच नाव खाल हाका मारेत .
तो सोयरीक संबंध जोडाना काममा एक्स्पर्ट व्हता . गंजच लग्ने त्यानी त्याना हातना जोडायेल व्हतात . त्यासनी त्याले बलावं आनी त्याना कानवर हाई गोट टाकी .. तो म्हने चिंता करू नका . बये इतला दिन झाये तुमीन काय डोया लाई बसेल व्हतात का ? ” पोर ना बाप म्हने चुकायनं भो पन आते काय करस ? ” तवसामा तो म्हने ” तुमीन अज्याबात चिंता करू नका हो . ” मना आंगे लायी द्या . दखा मी कसा एक नमरी पोरगा लयस ते ” . बाबर भट्या या सोयरिक संबंध जोडाना काममा एक नंबर व्हता . बये काई बी व्हऊ द्या आथाईन तथाईन तो जोडीच आने . असंच एक स्थय त्याना डोकामा उनं . त्यासले त्या गाव तो लई ग्या भो . एक वाडा व्हता . चांगली मजबुत आसामी व्हती . वाडामा वट्टावर पोरगा ‘ पोरगाना चुलता ‘ बाप बीप बठ्ठा बठेल व्हतात . तवय काय मोबाईल बिबाईल नी फोटो दरवाडाना जमाना नई व्हता . पोरगा बी लाकडी पलंग वर बशेल व्हता . पोरगा दखाले गोरा व्हता . आवडना त्यासले त्यासनी आमंतरन दिनं . त्यासनी मोके चोके सांगी टाकं ” दखा मंडई ‘ तुमनं आमंतरन पहुंचनं ‘ आमीन पोर दखसुत . . .
पोर जर पसंत पडनी ते मव्हरल्या गोष्टी करसुत . पोरगा वालासनी बजाडी दिनं . बाबर व्हट्या बशेलच व्हता . त्यासनी सांग ” पन एक अट शे . पोर दखाले पोरगा येवाव नई . “हाई ऐकीसन त्यासले नवाईनच वाटनं . तरी पोर वाला बोलनातच ” अहो असं काय करतस ? पोरले पोरगा ले पसंत पडाले जोयजे का नई ? लगीन ते पोरगाले करानं शे ना ! त्याले तिना बरोबर आयुष्य कठाडनं शे ” . त्या वर त्या बोलनात ” मंडई ‘ तुमनी गोट रुपया रुपया खरी शे पन गम्मत काय शे आन्हना घरानामा आम्हना सारखा जेठा मंडई ले जी पोर पटनी ती त्याले पटालेच जोयजे . पोरगा आम्हना भाहिर नई . आमीन काई ग त्यानं नुकसान कराव नई . आम्हना आज्ञाना भाहिर पोरगा नई …. तुमीन ती चिंता करू नका . ” त्यासना तो रिती रिवाज ऐकीसन यासले बी अनभुक लागनं . पन आमंतरन दिसन मंडई बाबर भट्या ले लईसन गाव परतनी . मनमा न मनमा ईचार कराले लागनात ” बये काय घरानं शे मायन्यान कदी भो ‘ काय आज्ञाधारक पोरगा शे . . त्यासले बी हाई गोट शंभर आना पटी गयथी .
मंग ठरेल दिन पोरगा ना बाप ‘ चुलता ‘ त्याना आजला आजली बठ्ठा बैलगाडा जुपीसन उनात . तवय बैलगाडा वरच जानं येनं पडे . पोरना घर पाव्हना मंडई एकदानी उनी . बसनात ‘ पानी बिनी पिनात . अथा तथानी चर्चा झायी . पीक पानी ‘ तुमना सगा ‘ आमना सगा वयख पायख बठ्ठ्या एक मांगे एक गप्पा झायात . तो परत च्या झायी नई नी सोपारी पन फोडायनी नई . रित व्हती ती . पोर ले दाखाडा नी त्यासमा रित नई व्हती . त्यासनी मोक्य चोकं सांगी टाकं . हाई दखा ह्या तीन पोरी शेत मन्या . त्यासले हाऊ एकच भाऊ शे . ” मातर तीनी बहिनी गोऱ्या पान नी रुप सुंदरन्या व्हत्यात . नवरी पोर बाजुलेच बशेल व्हती . ती ते बठ्ठ्यासमा रुप रंगमा भारी व्हती . त्यासले भलती आवडनी . बाबर भट्या चर चर चालीच राहयंता . त्यानी सांगी टाकं हाई पोर शे समोरच बशेल शे . यासना घरानामा लपाडीसन काही राहत नई . हाई समोर पोर शे . च्या पानी देवानी पद्धत नई शे . हाई पोर शे पसंद पडनी का सांगा . सोपारी फोडूत आनी मंग रितसर च्या पानी लिवूत ” त्यासले पोर एकदम पटी गयी . एकमेकमा खुसुर खुसुर कई . ” जाऊ द्या आपुन बी कोठे पोरगाले लईनूत त्यासनी ऐकीच लिनं ना .. पोरगी आपले पसंत शे आपली रक्कम पसंत शे आपले मंग काय लेनं ? ” असं म्हनीसन सोपारी फोडी . देवपुढे रुपया ठेवा . च्या पानी झायी . लगननी तारीख तठेच ठरनी . बठ्ठ समोरा समोर व्हई राह्यंत त्या जोगे बठ्ठ जमी गये ते . पोर सोयता च्या देत नई हाई ह्यासनी रित व्हई असं म्हनीसन त्यासले बठ्ठ पटी गयथं .
पन पोरगानी माय मातर नसं नसं कराले लागनी व्हती . पन बाबर भट्यानी पटाडी दिनं ” पोरनी जात शे ‘ सरमावस .. सासु सासरा ज्या व्हनारा शेत त्यासना समोर कसं जावो बुवा . भलती संस्कारी पोरगी शे आत्या . तुमीन एकदम डोया लायी करी टाका . ” पोरगा ना मायले पटी गये ते पोरगा ना बाप म्हने ” व्वा चांगला ससकार ‘ शेत . . पोरगा ना बाप बी राजी व्हई ग्या .लगीननी तारीख ठरनी पक्क्या बोली बंधने झायात .लगीनना दिन नवरी नं वराड गाडासवर . नवरी पडदा ना छकडा गाडामा बसनी . दिनमावतले टायी लागनार व्हती . पाव्हना मंडई गावना लोके पंगती बसन्यात . पंगतमा तवय गुईना काया शिरा भलता पाप्युलर का म्हंतस ना ते व्हता .
कुवारी पंगत व्हई गयी दिनमावतले शेवंती उनी . बामन तयारच व्हता . साटा वाटे धावावर चढना . सूर्य डुबाना ये ले बामन मंगलाष्टके म्हने आनी दिवस डुबताच ईशारा करे . वाजा ताशा वाला बामन ना हातकडे ध्यानच राहे त्यासनं . आनी टायी लागनी . तवय मोठा मोठा पल्लासमा टोपलासमा लग्ने लागेत . टायी लागताच नवरीनं टोपलं उचलेत तथा ठेयेत . नवरदेवनं पन टोपलं उचलेत आनी दुसरा बाग ठेवेत . पोट झोड्या ना वाजा चालूच राहे . एकच धूम उडे . तांदुय नी अक्षता राहे . तवय लगननी रितच अशी व्हती . आते काय मोठ्ठा मंडप ‘ अलीशान खुर्च्या राहेत . आठे ते मंडप दोन चार टोकरे वर हयदी कपडा अंबाना डक्सा ‘ केयी ना खांब आनी वाजा वाजाले पोट झोड्या .. हाई वऱ्हाडनीसनी धूम राहे . नऊवारी लुगडा ‘ कल्ला तोडा ‘ कप्पाय वर मोठ्ठा कुकु अशा वऱ्हाडनी सना नवरदेव नी नवरी भवते गराडा राहे . नवरदेव नवरी ले मोठमोठा चमकी ना रंगीत कागद बारीक काच लायेल मोती लोमकेत असा मोठ मोठा बाशिंगे राहेत . नवरदेव नवरी नं तोंड बी दखाये नई . पन भलती न्यामी धूम राहे . खरं लगीन काय ऱ्हास हाई त्या जुना जमानामा दखाये .टायी ते लागी गयी . पन कलोंडन्यासना गराडा नवरदेव नवरी भवते व्हता . कलोंडन्या गाना म्हनेत . हासेत खिदयेत भलती रमूस व्हती . ह्यालेच खरं लगीन म्हंतस .
पन यामाबी एक गोम व्हती . लगीन ते मुहूर्त वर पार पडनं .. पन नवरी ना कलोंडन्यासले माहित व्हतं की ” आपली नवरी ते आंधी शे ” पन तिले गोरा पान नवरदेव भेटना . तिनी हाऊ गड मातर जिका हाई तव्हढीच गोट खरी व्हती . त्या कलोंडन्या कशा गाना म्हनेत ” आंधीनी गड जिका वं माय… आंधीनी गड जिका ” आंधीनी गड जिका वं माय आंधी नी गड जिका ” . ह्या असा काय गाना म्हनी राहयनात . नवरदेव न्या कलोंडन्या ऐकीसन सुकद व्हई ग्यात . त्या एकमेक ना तोंड कडे दखाले लागी ग्यात ‘ . मंग त्या पन कसं गानं म्हनेत ” चाली तवय खरं वं माय .. चाली तवय खरं . . चाली तवय खरं वं माय चाली तवय खरं । ”
तर मंडई हाऊ गप की गफोडा व्हता . एक निव्वय मनोरंजन व्हतं . गोठाड्या रातले खेडा गावसमा अशा पद्धतना गोट सांगेत आनी वावरेसम्हाईन थकी भागी येल बाईसनी अशा गोट सांगीसन करमवणूक करेत . तशीच हाई ऐकेल पारंपारिक गोट तुमना मव्हरे मी सादर कई .
राम राम ! विश्राम बिरारी ‘ धुळे . 9552074343