अहिरानी मायबोली कवीता सुपडं
सुपडं
सुप -धान्य पाखडण्याचे.(खानदेशी बोली भाषा)
{अहिरानी मायबोली}
अरे सुपडं सुपडं
फडफड पाखडस
काचा कुचा नि काचोया
बठ्ठ्या बाहेर फेकस ॥धृ॥
(बठ्ठ्या~सगळ्या, फेकस~फेकतो)
खडा बारिक सारिक
कसा मांगेच ठेवसं
दाना गहू बाजरीना
ताट मझार टाकसं॥१॥
उनं कथाईन ग्यान
तुले कोन शिकाडस
नही जातना पातना
काम आम्हना पडस॥२॥
अरे आम्हना करता
सदा झिंजसं झिंजसं
नही किदरसं तरी
कोपराम्हाच पडसं॥३॥
तुन्हा बिगर आडसं
याद तव्हयच येस
नही तर सांग तुले
कोन कव्हयं देखसं॥४॥
काम पुरता मामाले
आठे जग वयखसं
जग दुनिया नही रे
तुन्हा सारखं शिकसं॥५॥
निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जयगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.