घुम्या-सुमकुंडऱ्यांस्ना रस्ते
नानाभाऊ माळी
अशी कशी रें खोल बुद्धी
तुन्ही आक्कल वयखी नई
येडा बांग्यास्ना खांदवर
तुन्ही शक्कल जिकी गई!
आथ तथ झामली झुमली
भुंजी खापर पुरनपोई
चटका बठनातं बोटेस्लें
धुडकं वापरं खोसा खोई!
चेंदी खुंदी पाट पोटलें
अफाट माया गोया कई
चिता रचेल उब्यामां रें
कुडीन्हा काया कोयसा नही!
खलबत्ताम्हा कुटीस्नी बुद्धी
तुन्ही कोल्ली टेक गई
घुम्या व्हयी सुपडा कायेज
कोनती वल्ली मेक कई?…….!
मन्हा व्हयखनां दोन-चार लोके सेतस!त्या इतला हुशार सेतस,बस्स त्यास्नागंम दखत ऱ्हावो!माले तें त्यास्ना सभाव आजून कयना नई!तोंडं आसी करतीनं जशी बठ्ठ दुःख यास्नावर यीं जायेल सें!इतलं
व्हयीस्नी त्यास्नी माले चांगलं जानी-पर्जानी लेयेलं सें!खोल बुद्धीनां लोकेस्न खोल दपाडेलं,व्हयखू येतं नई!समजी-उमजी भी येत नई!कव्हयं टांग मारी निंघी जातीन,सांगता येत नई!मीं त्याम्हायीन जायेल सें!आनभवनं शानंपन मोठ्ठ ऱ्हास!तरीभी या घुम्या-सुमकुंडऱ्या नेम्मन डाव साधी लेतसं!आपून खोल दयडानां
चिखूलम्हा फसतं ऱ्हातंस!त्या खिदिखीदी हासत ऱ्हातसं!’कसं… बांग्या लें बांग बनाडं ‘ अश्या खुशीम्हा ऱ्हातसं!यास्नी मन्ह रंगत न टोचता काढेल सें!त्या बह्यकाडतं ऱ्हातसं!आपुन बह्यखी जातंस!कानबाना व्हयी जातंस!त्यास्ना नांदे लागतंस!पायवर दगड पाडी लेतस!
घुम्या सबद कतायींन उना व्हयी बरं?सुमकुंडऱ्यां आनी घुम्या मांगलां
जनमम्हा येरायेरनां शेजार-पाजारी व्हतीन!या अथांनी कानगी तथी लागू देतंस नई!तथानीं उडतीन उतारी डबोलं उडायी लयी पयतसं!!घुम्या भलता खोल बुद्धीनां ऱ्हातंस!आंगे पांगेनास्लें भी थांग पत्ता लागू देतंस नई!आपले चत्रायवार कानगी न लागता,काढी फेकी देतंस!घुम्या बुद्धीनां मानसे उज्जी मव्हरे जायेलं ऱ्हातसं!यांस्ना नांदे लागनारा कव्हय पयभारा इकायी जायी,पत्ता भी लागत नही!कव्हयं माज रस्तावरचं फस्कारा करी,टांग मारी निंघी जातंस!आपले ध्यानमा येत नई!या पक्का येडी मत्थी घुबेडनां चाया वाला ऱ्हातसं!
घुम्या सबद कानवर पडना का नेम्मन गंजज लोके डोयांमव्हरे यीं हुभा ऱ्हातसं!व्हटम्हा तोंडं दाबीस्नी निस्ता गालमा नं गालमां गुलुगुलु हासी
ल्हेतसं!दुसरास्ले घुमाडी भवडायी
धीरेस्करी गर्दीम्हा हात सोडी देतंस!आपुन येडा व्हयी,काकूंयदी करी भवडत ऱ्हावो!आपले पत्ता सापडत नई!या पाटी काढी ठेवतस!चत्रायवार आपली गंम्मत दखत बठतंस!मज्या दखत बठतसं!आशा पाताळ धुंडी लोकेस्ना भरोसा देता येत नई!बांगं बनीस्नी दुसरास्ले वांगं खावाडनारा धीरेस्करी,चोरी-दपी,आंग चोरी निंघी जातंस!आपले आनबक वाटसं व्हयी!या ताकनां बदलाम्हा गावरानं तूप व्हडी खातसं!!आपन ताकवर धकाडी लेतस!ताक आमृद सें आसी मननीं समजूत काढी लेतस!
आपन गंजजं काकूंयदी करी घुम्यास्ना ठाक लेवानां प्रयत्न करत ऱ्हातंस!हिरदथून गंजजं धुंडतसं!यास्ना तय काय सापडतं नई!आपुन यास्नी पानीम्हा पडेल खोल बुद्धी सापडांगुंता बिल्लाडीवरी हालायी हुलायी दखतं ऱ्हातसं!निरानाम हाते काही लागतं नई!खंदी खंदी निस्त चिखूल चेंदतं ऱ्हावो!तरी भी यास्ना ठाक लागतं नई!दुन्यानी बट्ठी परेड या आयकतीन!मातर सोतानां गयापावूतं येलं खुश खबर,व्हटम्हा दाबी धरतसं!आपले दखी पापन पाड्यांगंत तोंडम्हा न तोंडंम्हा हासी मोक्या व्हतस!
घुम्यास्नासंगे ज्यास्ना सबंधं येल व्हयी ‘त्या’ यास्ना रस्ते जावाउत नईतं!नांदे लागाउत नहीत!नाव भी काढावूत नईतं!ज्यास्ले आक्सीनां माव्हरां सें,त्या मातरं चार हात पऱ्हा ऱ्हातसं!गुप मारी चूप ऱ्हायींस्नी,आपुन भलं,आपलं काम भलं,आसं वागी मव्हरे निंघी जातंसं!घुम्या कव्हयं उलटं टांगी दितीन,सांगता येत नई!
मी ते पहीलाफाइन पक्का बांगा सेंचं!बांगा सें म्हनीस्नी या घुम्या खोल बुद्धीनां लोके हातें लागतसं नई!या बांग्यास्लें तें पुरा बांगा करी टाकतस!आखो सांगानीं गोठ अशी सें…यासले रावनायी करी,साखर व्हयी,पघायालें सांगो!गोड ऱ्हावानं सांगो!समजाडी सांगो!पन कसलं काय?अप्लावरचं डाव उल्टाइ ढागें ढागं निंघी जातंस!चिंनंगी-फुंनंगी लायी शेंडीले तूप लायी निंघी जातंस!यास्लें कोर लायी बोली दखो,उपेग व्हतं नई!यास्ना शेंडीम्हा जोर ऱ्हातं नयी!यास्नी शेंडी तट्ट व्हतं नई!पन सल्यांमायेक तट्ट व्हतं ऱ्हातसं!यास्ले कायेजथून राग येतं नई!शांना सुरतांगतं आपले चित करी निंघी जातंस!घुम्या लोके ज्यास्तीं उमटतंस नई!पन चांगलंज काम दखाडी निंघी जातंस!कोनतं भी आपोर-सपोरं खेंट,आंगवर ढकली निंघी जातंस!आपुन आते यास्लें घाबरी तोंडं झाकी लेवो!आपला रस्ता आपुनचं सुधारतं ऱ्हावो!त्या घुम्या, आपुन बांगा,मज्याना सज बठू देवो!मव्हरे जात ऱ्हावो!घुम्यास्पायीन दूर ऱ्हावो!
… नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धूळे)
ह.मु. हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०८फेब्रुवारी २०२४