वल्ली बायंतीन एक अहिरानी कथा
” वल्ली बायंतीन ”
अहिरानी कथा . . . . . .
” वं ss सुपा दख वं ‘ दख वं ‘ हाई कोन उभी शे दख ते ‘ दख वं कोन शे हाई बिचारी ? माय माय माय वं ती ते पडता पानीमा उभी शे . दख ना कशी थुड थुड करी राह्यनी वं माय ? कोन शे बिचारी कोन जान ? ” सुपा आथी तथी दखी राहयंती तवसामा निंबी जिजी खवयनीच तिनावर ” वं येडांगी ‘ कथी दखी राह्यनी वं ? वं त्या निंबना झाड ना बाग दख ” .
पाऊस ‘ वारा ‘ नी जोर धरा व्हता . पाऊसनी धुवाँरी म्हान कोन उभं शे हाई काई दखाई नई राह्यंत . सुपा त्या झाड जोडे गयी . दखस ते काय एक गरीब बिच्चारी पोर निंबना झाडना आड आंग चोरीसन उभी व्हती . तिना आंगवर मयकं पातय ते पन कथं कथं फाटेल दखाई राह्यंत . पाऊसनी जोर धरा व्हता . थंडा वारा तिना आंगले झोंबी राहयंता . ती पोर कुडकुडी राहयंती . सुपा त्या पोर जोडे गयी आनी ईचाराले लागनी ” कोन शे वं बईन तु ? आनी आठे काबरं उभी शे ? सुपा नी दखं ते ती लेकरूले कवटाईसन उभी व्हती . ती पुरी वल्ली व्हयी जायेल व्हती . थंडी म्हान कुड कुडी राह्यंती .
” वं माय वं , तु ते लेकुरवायी शे . वं येडी मंग तु वट्टावर ते येती ना वं ? चाल वट्टावर चाल . आठे थंडी म्हान काय कुड कुडी राहयनी ? आनी खरच थंडा गार वारा धुवाँरी त्या वारामा पाऊस अथा तथा फाके आनी सूं सूं आवाज करी राहयंता .सुपानी तिना हात धरा आनी तिले वट्टा कडे लई ऊनी . निंबी जिजीनी तिले खाट वर बसानं सांग . ती बसाले सरमाये पन निंबी जिजीनी तिले बय जबरी बठाड्
चिंधी आपला लेकरूले ली सन खाट वर बसनी . पंधराच दिननी ती बायंतीन व्हती . निंबी जिजीना ध्यानमा हाई गोट येताच ती अल्लायनीच ” वं ss माय वं ‘ काय वं तु ते वल्ली बायंतीन शे वं माय ? ” चिंधी नी अवस्था कीव करा सारखीच व्हती . ” काय वं माय तु कोन शे वं बईन ? आनी कोनता गावनी शे तु ? आम्हना गावनी ते काय दखात नई तु ? ”
निंबी जिजीले तिना त्या फाटेल आनी मयकं पातय दखी सन आनी त्यामा ती वल्ली बायंतीन समजावर कीव उनी ‘ दया ऊनी . तिना जोडे बसनी . तिना डोकावरथीन हाथ फिरावा . . ” माय वं काय पोर शे वं तु ? . ” चिंधीले अशी माया असं प्रेम ना सबदे कदीसना भेटेल व्हतात . ते ऐकीसन तिले रडाले उनं . जिजी बोलनी ” माय रडु नको वं माय ‘ येडी शे का तु ? . ” निंबी जिजीनी सुपाले चुल्हा पेटाडा ले सांगा . च्या करी आनाले सांगा आनी दादरनी भाकर टाकीसन पानी नी भाजी कराले सांगी . सुपा घरमा गई . जिजीनी लेकरू ले आपला जोडे लिनं . ” काय मज्ज्यानी पोर शे नाके ‘ डोये आयाय माय ती ते मन संग हसाले लागनी … वयखस का तु ‘ का ss वं . . ‘ वयखस . . ?
असं म्हनीसन जीजी नी पटापट मक्कु लिदाद . . हाई दखीसन चिंधी ले रडाले ऊनं . अशी माया तिले कदीसनी भेटेल नई व्हती .तवसामा सुपानी गरम गरम च्या ना कप भरी आना . खेडा गावमा मोठा बंब भरी कोप म्हानच च्या देवानी रित शे . बये चिंगुसपना नईच ना हो . बश्शीम्हान वतीसन फुरक्या मारानी गंमतच न्यारी ऱ्हास . सुपानी गरम गरम च्या चिंधीले दिना . गुई साखर कालाईसन ‘ त्यां मा आलं घालीसन गरम गरम च्या चिंधीले दिना . च्या बश्शीम्हान वतीसन पेवाले लागनी तिना हात थरथर करी राहयंता . थंडी अजुन आंगम्हाईन जायेल नई व्हती . पातय अजुन वल्लं व्हतं .
गरम गरम च्या पोटमा पडावर चिंधीना आंगमा थोडी तरतरी ऊनी . निंबी जिजीना पिरीमना सब्देसना मोठ्ठा धिरावा तिले भेटना जो तिले कदी पासून भेटेल नई व्हतात .थोडा ये व्हवू दिना बागीच कनी निंबी जिजीनी तिना जोडे गोट काढी . तिले इचारं . चिंधी नी रडी रडी तिनी हकीकत सांगी टाकी . रडत जाये सांगत जाये . मझार मझारथीन लेकले दखत जाये बायतोड् गुंडाईसन तिले थापटीसन जपाडत जाये . सांगता सांगता तिना हुंदका दाटी ये. पन ती सांगत व्हती .
चिंधी नी हकीकत ऐकीसन निंबी जिजी आनी सुपाना डोया भरी उनात . ” वं माय वं ‘ काय राक्षस म्हनो का काय म्हनो वं माय तुना नवराले ? ” इतलं मारो ? इतलं ? दखना सुपा ‘ दख ते खरी या पाठवरना हिना वय ते दख . दखाड वं पोरी . . वं माय माय माय काय राक्षस ना जातना पैदा करी ठेल शे कान जान ? पन इतलं मारो का ? मारी मारी पाठ दख कशी सुजाडी टाकेल शे ? मरी जायजो तो हिव्वर ना जातना . ”
चिंधी उपाशी व्हती . लेकरू रडी रडी उठे . तिना पोटम्हान काई पडी ते ती लेकरू ले दुध पाजी ना .. म्हनीसन सुपाले तिनी वाढानं सांग . गरम गरम दादरनी भाकर ‘ मेथी नं पानी … नई ते वल्ली बायंतीन ले हाईच देनं पडस खावाले हाई जिजीले पक्क माहित व्हतं . तम्हान मान वाढी दिनं . ” उकाव वं माय रडु नको खाय ‘ .. या धाकली पोर कडे दख माय … शिलगाव तुन्हा नवराले . . मरी माय खाव त्याले . . उकाव जेव माय .. ”
चिंधी ना तम्हान म्हान काला मोडा आनी एक एक बलका तोंड म्हान टाकत व्हती . लेक कडे दखत जाये . डोया म्हाईन पानी तिना गालवर अजुन वघयी राहयंतात .निंबी जिजी समजाडा ना स्वर म्हान बोलनी .. ” पन मी काय म्हनस ‘ पोरगाच व्हवाले जोयजे हाई काय बाईना हात म्हातली गोट शे का बरं ? कितली येडी समजुत शे हाई ? कितला रानटी मानुस म्हनवा हाऊ ? ”
चिंधी काला मोडत जाये . रडत जाये आनी बलका तोंडमा टाकत जात व्हती . तिले धके नई . पन जिजी मव्हरेच बशेल व्हती . तसं दखाले गये ते चिंधी नं वय काईच नई व्हतं . माहेरले तिनं कोनीच नई व्हतं . बाप आनी माय दोनी करोनामा मरी गयथात . चुलता चुलती नी हाई ब्याद काढा म्हनीसन देवना मव्हरे तिनं लगीन लाई दिनं व्हतं . पोर ना चिंधी ना हसा खेया ना दिन व्हतात . पन तिना पन नाईलाज व्हता . ती पन काय करी ?
चिंधी आनी तिना नवरा बाजुना खेडाम्हान वावरमा एक झोपडामा राहेत . चिंधी ना नवरा जागल्या व्हता . तिनं हाई पहिलंच बायंतन व्हतं . कथी जंगलम्हान बायंतीन झायी पत्ताच लागना नई . जंगलम्हान कथाईन उनी सुईन नी बीईन ? सुखरूप बायंतीन झायी . पोर झायी . तिना वरच व्हती . नाके डोये .पन आथी पोर झायी हाई कयताच बये तिना नवरा ते कसा कसाच कराले लागना . भनकना तो . त्या जंगली ले डोकंच नई व्हतं . रोज दारू ढोसले आनी तिले गांजानी सुरवात कयी .
रोज मारे तिले . उना का मारेच . तठे जंगलमा कोन व्हता हो आवराले ? लेक ले ती कवटाये . तो डोकं फिरेल जंगली त्या नुकतीच जलमेल पोरले मारा करता टपेल व्हता . ” हाई दुव्वाड पोर मना डोया समोर नको ” दारू ढोसली उना का असंच म्हने . आनी तिले बदड बदड ठोके . लाथा बुक्का ‘ जे हातमा सापडे त्यानावर मारे . ती गन रावन्या करे . पाया पडे ” नका ना होss ‘ माले मारू नका ना ss ‘ पन तो ऐकनारा व्हता का ‘ त्याले पोरगा जोयजे व्हता . झोपडा म्हान ऊना का चिंधी ले आनी त्या पोरले तो डोया पुसी देखे . पोरले जीवत सोडाव नई . मारी टाकसु तिले असं दारूम्हान बडबडे तो .
एकदा दिनमावतले ढोसली उना . त्याले आवढी चढी जायेल व्हती त्याले चालनं सुधरत नई व्हतं . तो त्या पोरले मांगी राहयंता . ती काई त्याले हात लावू देत नई व्हती . त्यासना हिसकाडा . हिसकाडाम्हान त्यांना तोल गया नी तो जोरमा जिमीनले ठोकायना . घरमा बोरना झाडनं भलं मोठ्ठ लाकुडनं बुंधड् पडेल व्हतं ते त्यांना डोकामा पडनं तो तठ्ठेच आडा धट् पडी ग्या तिले तिना जीव वाचाडाना व्हता .
आनी या जग दुनियामा येल नवा जीव ले जीवदान देवानं व्हतं . म्हनीसन ती तव्हढा ये ले जथी वाट दखाये तथी पयत सुटनी . काय करी हो मंग ‘ त्यांना शिवा तिनापान दुसरा ईलाजच नई व्हता . पंधरा दिन पासीन ती पोर तो जीव जसा जलमाले ऊना तसा त्याना दारू ढोसलीसन दांगडो सुरू व्हता
पडता पानी मा वारा वाव्हदनम्हान ती पोरले बायतोडाम्हान गुंडाईसन जीव तोडीसन जथी वाट दखाये तथी पयत सुटनी . काय करी ‘ दुसरा ईलाजच नई व्हता . ईजा न्याऱ्या चमकी राह्यंत्यात . ढगसना गडगडाना आवाज भेसूर करी राहयंता . भाहिर वादय व्हतं तस्सच वादय तिना मनमा पन वादय सुरू व्हतं . ते वाव्हदन जीव तोडी लेकले लिसन पयी राह्यंती .
आनी या गावमा ती पहुंचनी या नवखा गावमा तिनं कोनीच वयखनं नई व्हतं . हाई तिनी कहानी ऐकीसन निंबी जिजीना ‘ आनी सुपाना डोया भरी उथांत . निंबी जिजी म्हंजी त्या गावमा जुनी धल्ली . असा गंजच पानकाया तिन्ही दखा व्हतात . अनुभव व्हता . तशी ती बोलनीच . ” अरे पोर काय नी पोरगा काय या जंगली लोके कधी सुधरतीन कोन जान ? पोर म्हंजी लक्ष्मी ऱ्हास ..
लक्ष्मी नं रूप ऱ्हास . काय सांगो माय या दुनियाले ? ” असं म्हनीसन निंबी जिजी नी त्या पथोरीम्हातल्या पोरले आपला छातीले लाईसन पटापट मक्कु लिनात . हाई दखीसन चिंधीना डोया भरी उनात . चिंधी ले बय मियनं असच समजा . आनी वाडाले लागीसनच वाडगा जोडना पतराना घरमा चिंधी ले आसरा दिना . मायनी माया तिले भेटनी व्हती . आखो काय जोयजे व्हतं बरं !
विश्राम बिरारी ‘ धुळे . . .
9552074343 . . . . . .