अहिरानी इनोदी रचना

अहिरानी इनोदी रचना

अहिरानी इनोदी रचना

भास

ऱ्हांदी ऱ्हांदी रोज ऱ्हांदू मी काय
तान मन्हा डोक्साले व्हैनावं माय||ध्रु||

पाह्येटे ऱ्हांदी व्हती उडीदनी दाय
दाद्या मन्हा नाकतोंड मोडे वं माय
रागे रागे म्हन्नू मी खाशीन ते खाय||१||

दिमयले ऱ्हांदी व्हती कांदानी पात
दाद्यानी घाली तशी कंबरम्हा लात
नको नको म्हनी तेन्हा पडू मी पाय||२||

एकदिन ऱ्हांदा मन्ही पिठलं नि भात
पिठलांम्हा काढा लंबा डोकाना बाल
झिपोट्या धरी म्हने करू का वं टाल||३||

दाद्याले खावलाना भराई गया वाय
खावाले लागस रोजनं चिकन फ्राय
किद्री ग्या जीव मन्हा ऱ्हांदाले माय ||४||

घरम्हाच बठी नुस्ता करस खावखाव
पोटम्हा कोकायेत हाड्या कावकाव
बोंबीलना बट्टावर वज्जी मारस ताव||५||

जपेल व्हतू खाटवर जपम्हा भरझाप
गुंडाभर पानी टाकं तिनी कय हो पाप
देखी ऱ्हांयतू सपन वचकावनू ओबाप||६||

भाऊ इतकं सोपं नही हाऊ शे वनवास
जे भेटनं माले ते आवडी आवडी खास
कधीमधी व्हतस माले कसामसा भास||७||

ऱ्हांधी ऱ्हांधी आशी तू वं काय बी ऱ्हांद
खायी लिसू गोड करी करावं नही नांद

ऱ्हांदी ऱ्हांदी रोज ऱ्हांधू मी काय
तान मन्हा डोक्साले व्हैनावं माय

विजय निकम चाळीसगाव

अहिरानी
अहिरानी