आते तठे से जावानं अहिराणी कवीता
आते तठे से जावानं
गयं चंद्र वर यान
आते चालनं सुर्यानं
कोठे चालनं इज्ञान
आते सोडा रे अज्ञान॥धृ॥
इज्ञानम्हा से भरेल
देखा कितलं रे ग्यानं
नही पोथी पुरानम्हा
आते तरी व्हा रे श्यानं॥१॥
जसं सुर्यानं उजायं
तसं उजयनं ग्यान
ग्यानी इज्ञानी उनात
जग कराले रे श्यानं॥२॥
सुर्य नही नारायनं
देखा सांगी आत्ये यान
देखा चालनं चालनं
आत्ये सुर्यानं बी यानं॥३॥
जुनं जाऊ द्या जुनाम्हा
आते शिका नवं ग्यान
सोडी द्यारे भाऊस्वन
तुन्हं मन्हं यानं त्यानं॥४॥
लयी गया देखा झेंडा
चंद्रवर चंद्रयान
सुर्यावर बी जायी रे
आते आम्हनं निशान॥५॥
झायं तैयार जावाले
सुर्यावर सुर्य यानं
सूर लागना सुर्याना
आते तठे से जावानं॥६॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जयगांव.
दूरध्वनी क्रमांक :- ९३७१९०२३०३.