अहिराणी कवीता माले काही उमगत नही

अहिराणी कवीता माले काही उमगत नही

कविता नाही एक मुक्त चिंतन


माले काही उमगत नही
आते काबर आसं ?
धाकलपणे दखूत कव्हयबी
घर मानसेस्न भरेल -हाये
बोलणं चालणं रड़ण हासणं
जसं जसं घर डोलत -हाये.
आते दखो चार मानसेस्न
घर दखास नुसत भणंग
तठे नही हासणं तठे नही बोलणं
जो तो ज्यान्हा त्यान्हा जगम्हा दंग
माले काही उमगत नही
आते काबर आसं ?

धाकलपणे दखूत नदी नाला
बारमहा खयखय करी व्हायेत
वावूम्हा कच्चाबच्चा मस्त खेयेत
डूहम्हा ढोरेपोरे मनसोक डुबक्या मारेत.
बायाबापड्या नदीवर धोनं धोयेत
सालदारमहींदार सकायम्हा शेवडीवर पाणी भरेत.
कथी गयी वावू कथ गय पाणी
नडी -हायनी का ? मानोसनी करनी
माले काही उमगत नही
आते काबर आसं ?

हिरव शिवार पिके डोलेत
वावर जसं जसं बोलाले करे
हगामम्हा मोतीसन्या रासी पिकेत
कोन्हीज नही भूक्या मरे.
गावम्हा शिवम्हा झाडेस्नी गर्दी दाटे
झाडवनं फुलेफयेस्न दान देये
वाडग गाईम्हशीस्न भरेल -हाये
दुधदुभताना जसा पूर व्हाये.
खाईपी मानसे लालबुन दिखेत
रोगराईले नही जुमानेत
आते बादल्या धुई च्या करतस
दुध समध डेरीम्हा घालतस.
माले आते काही उमगत नही
आते काबर आसं ?

रानेवने जंगली जनावरे डरकाया फोडेत
पक्षी किलबिलाट करेत गाणा गायेत
पक्षी आते बिर्लाबाजी दखावतस
जंगली जनावरे वस्तीम्हा घुसतस
कथा गयात झाडेझुडपे कथा गयात पशुपक्षी
कोन्ही गया कापा ? मानुसज त्यान्हा साक्षी.
महीना महीना पाणकयानी झडी चाले
हेरी वसांडेत फुटे पान्हा धरती मायले
कथा गया पाणकया कथा गयात झिरपा
मान्सूनबी पयस तिरपा तिरपा.
माले काही उमगत नही
आते काबर आसं ? आते काबर आसं ?

रमेश आप्पा बोरसे
धुळें
अध्यक्ष सहावे
अ.भा. अहिराणी साहित्य संमेलन धुळें.