अहिराणी कवीता बोटले सुई टुचनीबोटले सुई टुचनी
कवी – नामदेव ढसाळ
यास्नी कविताना आहिरानी आनुवाद…
बोटले सुई टुचनी
जीव कितला कयवयस,
सुरा तलवारी खसाखस खुपसतस
कसं वाटत आसी.
साधा चटका बसना
मानुस कितला घाबरस,
साला,जिवंत जायीसन मारतस
कसं वाटत आसी.
साधा पदर ढयना
तरी बाई कितली सरमावस
साला,नंगी धिंड काढतस रे
कसं वाटत आसी.
कितल्या यातना कितला आपमान
कितल्या येदना
कसं सोसत आसी.
आमनी हरेक पिढी
त्यासना अत्याचारी बलात्कारम्हा
कुथत उनी
परिवर्तननी लढाईम्हा
प्रतिगामीस्नी आवलाद
निरदयी पनाम्हा मुतत उनी.
कितला काय हायी आसच चालानं
कितला काय हायी समध उगमुग झेलानं.
आते ठरायं
ठेयेल हत्यार खोलानं
मासेजम्हातल जनावर आरपार सोलानं
कराना सेत मानसे
मझार बाहेर सुद्ध,
आनि जगाडा से हरेक मनम्हा
यक बुद्ध.
नामदेव ढसाळ यांची कविता
बोटाला सुई टोचली
जीव किती कळवळतो ,
सुरे, तलवारी खसाखस
भोकसतात
कसं वाटतं असेल ?
साधा चटका बसला
माणूस किती घाबरतो,
साले, जिवंत जाळून मारतात
कसं वाटत असेल…?
साधा पदर ढळला
तर –
बाई किती शरमते,
साले, नग्न धिंड काढतात रे
कसं वाटतं असेल…?
किती यातना, किती अपमान
किती वेदना
कसं सोसत असेल…?
आमची हर एक पिढी
त्यांच्या अत्याचारी
बलात्कारात कुथत आली,
परिवर्तनाच्या लढाईवर
प्रतिगाम्याची औलाद
निर्दयीपणे मुतत आली….!
किती काळ हे असंच चालायचं
किती काळ हे सारं निमूट झेलायचं…..
आता ठरवलंय….
ठेवलेलं हत्यार खोलायचं
माणसातलं जनावर
आरपार सोलायचं…
करायची आहेत माणसं
आतून बाहेरून शुद्ध
आणि –
जागवायचाय प्रत्येक मनात
एक बुद्ध…
कवी – नामदेव ढसाळ
आनुवाद – रमेश आप्पा बोरसे
आध्यक्ष सहावे अ.भा. आहिरानी साहित्य संमेलन धूय्ये.