अहिराणी कवीता फुट्रा दिन नींघतं जास

अहिराणी कवीता

फुट्रा दिन नींघतं जास


कोठे मैत्रीण भेटनी का
हातमा गुलाब ऱ्हास!
साली भेटनी का हातमा
गुलाबनीं जुडी ऱ्हास
दिनभर मांगेमांगे चालणारी
बायकोनां कटाया ऱ्हास!

कव्हयं मव्हयं ‘त्या’ भेटावर
जीव निस्ता हुरहूर करस
‘हायी लेवू का तें खावाडु’
घोडं निस्त फुर्फूर करस
‘कोथमेर जुडी लयीया हो’
‘तीं’ सांगावर घुरघुर करस!

‘त्या’ भेटावर मनम्हानं मनम्हा
गुलाबी गुदगुद्या व्हतं ऱ्हातीस
….. कव्हयं मव्हयं रातले ‘त्या’
आर्धीमर्धी रातले सप्पनम्हा येतीस
जपम्हा रागेरागे बोली पडस ‘तीं’
‘या कोन हाभा-डाखीन सेतीस?’

रोजनां आलनं मचकलें म्हनें
खरी तीं चव काय भेटत नयी
यें परसंगलें तिखट मीठ शिवाय
या चटोरी जीभलें रेटत नही
चबढब्यालें घरतीन सांगेल तीं
कोथमेर मातरं भेटत नही…

हासरां खुसरां दुन्याम्हा ह्या
जिंदगी मव्हरे व्हडतं ऱ्हास
कालिकुलीं आलनं खारं बठ्ठ
जिंदगी साटावर चढत जास…

… नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
       ७५८८२२९५४६
दिनांक-२० जुलै २०२४