अहिराणी कविता बाप
अहिराणी कविता बाप
न्हई उमजना बाप
न्हई उमजना बाप
माय समजनी तुल्हे
न्हई उमजना बाप…
कोन्ही नजेरमा दिसें
हाऊ उशाखाले साप………1
माय पाह्येटमा म्हणे
रोज घट्याव्हर गाना…
अरे घट्यामा ती टाके
कोन्ही कमायेल दाना……..2
शेके तावाव्हर सूर्या
चांद डालकीमा रचे….
बये तावाखाले धूड
फक्त राख त्येनी बचे ……..3
त्येना आंतरनी हौस
जाये घामम्हाच ईरी…
पण लेकरेस्ना साठे
टाके कलेजाबी चीरी………4
माय छपऱ्यानी दांडी
बाप धीरावाना खाम…
भार सौसारना तोला
मोजा हयातीना दाम………5
माय लेकरूनं नातं
दाये बेंबूटनं नाये…..
सात जलमाना ठेका
कुकू कपायना दाये………6
तोडी कसाईनी बेडी
बाप यमुनाले चिरे…..
अरे डालकीना देव
कोण्हा जिवव्हर मिरे………7
कर बापनंबी मोल
त्येले तराजूमा तोल…..
ढूक फराकनं बुंग्रं
दिसी कलेजानी ओल……..8
कवी… प्रकाश जी पाटील (पिंगळवाडेकर)
बाप हाऊ बापच रहास
दि.१६/६/२०२४
बाप हाऊ बापच रहास
कव्हयच तो डगमगना नही
कितला भी उनात संकटे
कोणा पुढे झुकना नही…!
बाप रातदिनआपला साठे
करस पयापय कयना नही
कधी भुके झोपू दिनं नही
पोरेसना हात सोडा नही…!
डोकावर हात फिरावा शिवाय…!
बाप स्वता:कधी झोपत नही
बाप कसा घरना धीर से
कधीच कमी पडू देत नही…!
बाप हाऊ सागर बाप समुद्र
बाप सर्व पोटमा समायस
म्हणीसन जगमा से महान
बाप हाऊ बापच रहास…!
कवी.दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७३